' ठाकरे सरकार संकटात : काँग्रेसच्या २५ आमदारांचे बंड, सोनिया गांधींकडे मागितली वेळ – InMarathi

ठाकरे सरकार संकटात : काँग्रेसच्या २५ आमदारांचे बंड, सोनिया गांधींकडे मागितली वेळ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सत्तेमधील नेतेमंडळी गेली अडीच वर्ष सरकार स्थिर आहे असे सांगत असतात आणि एकीकडे विरोधी पक्ष मात्र सरकार काही दिवसात कोसळेल अशी भविष्यवाणी करताना दिसून येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकार मधील नेत्यांच्या मागे एकतर ईडी नाहीतर CBI यांच्या धाडी पडताना दिसून येत आहेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले खरे मात्र त्यातीलच काही नेतेमंडळी नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी अगदी उघड्पणे मांडली आहे. शिवसेनेत सर्वात जास्त धुसफूस आहे हे त्यांच्या नेतेमंडळींनी स्वतः सांगितले आहे, नुकताच अर्थ संकल्प जाहीर झाला त्यात शिवसनेच्या वाट्याला कमी निधी मिळाला म्हणून शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भर सभेत आपली नाराजी व्यक्त तर केलीच शिवाय राष्ट्रवादीवर देखील टीका केली.

 

mahavikas aghadi inmarathi

 

शिवसेनेतील नेतेमंडळींनी नाराजी तर आपण बघितली मात्र याच आघाडीमधील तिसरा भाऊ म्हणजे काँग्रेस पक्ष, या पक्षाकडे कायमच दुर्लक्षित केले जात आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून चर्चेत कायम पवार आणि ठाकरे ही दोन नावे कायम समोर आली आहेत. काँग्रेसकडून फक्त नाना पटोले प्रतिनिधित्व करताना दिसून येत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याच पक्षातील नाराज  २५ आमदारांनी कंटाळून शेवटी पक्ष श्रेष्टी सोनिया गांधींना पत्र लिहून भेटीची परवानगी मागितली आहे. गेले काही वर्ष काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी प्रवक्ते म्हणून दिसले होते, मात्र महाराष्ट्रातील आमदारांनी राहुल गांधी ऐवजी थेट सोनिया गांधींची भेट घेण्याचे ठरवले आहे.

 

sonia inmarathi

 

काय आहे मागणी?

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील त्यातही काँग्रेसमधील नेतेमंडळी सरकारवर नाराज आहेत. तीन पक्षाचे सरकार जरी असले तरी काँग्रेसला कायमच डावलले जात आहे अशी खंत या मंडळींना आहे तसेच मतदार संघातील कामांच्या मागणीकडे जर सरकारमधील मंत्र्यांनी दुर्लक्ष केले तर याचा परिणाम येत्या निवडणुकांमध्ये दिसू शकतो.

सरकारमध्ये जे पक्ष आहेत त्यात समन्वयाचा अभाव असल्याचे देखील एका आमदारांनी सांगितले, ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसच्या प्रत्येक आमदारांच्या समस्येसाठी तीन आमदारांची नियुक्ती करण्यात आली होती जी आम्हाला अडीच वर्षांनी कळली.

 

ajit pawar and uddhav thackeray inmarathi

 

शिवसेने प्रमाणे काँग्रेसच्या आमदारांना देखील निधी वाटपामध्ये असमानता दिसून आली आहे, त्यांचे म्हणणे आहे की अजित पवार त्यांच्या आमदारांच्या भेटी घेतात तक्रारी ऐकून घेतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यापुढे गेला आहे. तसेच हाच पक्ष आमच्याविरोधात मोर्चे काढत आहे, हे जर असेच सुरु राहिले तर इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील काँग्रेस अवस्था तशीच होईल.

 

ajit pawar inmarathi

अटलजींचा आवाज दाबण्यासाठी इंदिराजींना बॉबी सिनेमाचा आधार घ्यावा लागला होता!

कितीही टीका करा, मोदी-शहांचे नेतृत्व आणि कार्यक्षमतेला काँग्रेसकडे उत्तर नाही

एकीकडे विरोधी पक्ष रोजच्या रोज अधिकच आक्रमक होताना दिसून येत आहे, त्यातच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. महविकास आघाडीमधील धुसफूस आणि पुढील आणखीन अडीच वर्ष खरे तर तारेवरची कसरत आहे त्यामुळे येत्या काही काळात नवे कोणते राजकीय भूकंप पहिला मिळतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?