' ज्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतात, त्या ‘बाबा वांगा’ नेमक्या आहेत कोण? – InMarathi

ज्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतात, त्या ‘बाबा वांगा’ नेमक्या आहेत कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून त्यात आतापर्यंत हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. नाटो सदस्य राष्ट्रांनी युक्रेनला शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देश आता हळूहळू चर्चेसाठी सहमत होत असले तरी अनेक तज्ञांनी या लढाईला तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात मानले आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे का, या युद्धाची भविष्यवाणी अनेक दशकांपूर्वीच झाली होती आणि ती भविष्यवाणी आता खरी होतांना ही दिसत आहे. त्यामुळे ही भविष्य सांगणाऱ्या बाबा वांगा यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

russia baba vanga im

 

बाबा वांगा यांचा जन्म १९११ मध्ये बुल्गेरिया या देशातील स्ट्रुमिका येथे झाला होता आणि त्यांचे खरे नाव व्हेंजेलिया गुश्तेरोवा होते. बाबा वांगा यांनी त्यांच्या मृत्यूचे भाकीत अगदी खरे केले होते, १९९६ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्याने असा दावा केला होता की देवाने त्यांना एक अनोखी भेट दिली आहे ज्याच्या मदतीने ते भविष्य पाहू शकतात.

वयाच्या १२व्या वर्षी एका भयानक वादळामध्ये ते अडकले होते आणि त्या वादळात त्यांच्या डोळ्यात भरपूर माती गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली. बाबा वांगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी ५०७९ सालपर्यंतची भविष्यवाणी केली होती.

बालपणी व्हेंजेलिया ही तपकिरी डोळे आणि सोनेरी केस असलेली एक सामान्य मूलगी होती. तिचे वडील मॅसेडोनियन क्रांतिकारी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते, ते पहिल्या महायुद्धात बल्गेरियन सैन्यात भरती झाले होते. युद्धामध्ये स्ट्रुमिका सर्ब, क्रोएट्स आणि स्लोव्हेन्स ही राज्ये यूगोस्लाविया या देशाने मिळवली. यानंतर युगोस्लाव्ह अधिकाऱ्यांनी तिच्या वडिलांना अटक केली आणि सोबतच त्यांची त्याची सर्व मालमत्ता जप्त केली, यामुळे तिच्या घरात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले.

 

baba wanga IM

 

बाबा वांगाची आई पण तिच्या लहानपणीचं मरण पावली होती. यामुळे वांगा तिच्या लहानपणी बराचसा काळ शेजारी आणि जवळच्या कौटुंबिक मित्रांच्या काळजी आणि दानावर अवलंबून राहिली. काही वर्षांनी जेव्हा तिच्या वडिलांची सुटका झाली तेव्हा त्यांनी दूसरे लग्न केले होते.

१९२५ मध्ये वांगाल स्लोव्हेन्समधील झेमुन शहरातील अंधांच्या शाळेत नेण्यात आले, जिथे तिने तीन वर्षे ब्रेल लिपी च्या मदतीने शिक्षण घेतले, तसेच या शाळेमध्ये तिने पियानो वाजवणे, विणकाम करणे, स्वयंपाक करने आणि साफसफाई करणे शिकून घेतले. तिच्या सावत्र आईच्या मृत्यूनंतर, तिला तिच्या लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी घरी परत जावे लागले. घराची परिस्थिती खुप हलाखीची असल्याकारणाने तिला दिवसभर काम करावे लागत असे.

वांगाने एका बल्गेरियन सैनिक दिमितर गुश्तेरोव्ह याच्याशी लग्न केले होते, परंतु १९४७ मध्ये त्याला एक आजाराने ग्रासले होते, यादरम्यान तो दारूच्या आहारी गेला आणि अखेरीस १ एप्रिल १९६२ रोजी त्यांचे निधन झाले. तर बाबा वंगा यांनी १९९६ मध्ये देहत्याग केले.

बाबा वंगा ने अनेक भाकिते वर्तवली होती, जसे की :-

बाबा वांगा यांनी अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन-अमेरिकन बनेल असे सांगितले होते आणि झाले ही तसे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. झार बोरिसच्या मृत्यूची तारीख, चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन, लेबनॉनमध्ये दंगल (१९६८), निकाराग्वामधील युद्ध (१९७९). सायप्रस विवाद (१९७४), इंदिरा गांधी पंतप्रधान होणे आणि त्यांची हत्या, सोव्हिएत युनियनचे विघटन, युगोस्लोव्हाकियाचे विभाजन, पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्र येणे चेरनोबिल मध्ये आण्विक अपघात, स्टालिनची मृत्यूची तारीख, असे त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत.

तसेच येणाऱ्या २०२२ नंतर काय घडेल यावरही त्यांनी अनेक भाकित वर्तवली आहेत.

 

 

१) पृथ्वीवर समुद्राचा विस्तार

बाबा वनगा यांच्या भविष्यवाणीनुसार २०३३ पर्यंत पृथ्वीवरील बर्फाचा प्रचंड थर वितळेल. परिणामी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल आणि यामुळे समुद्रकिनारी असलेल्या अनेक शहरांचे अस्तित्व धोक्यात येईल.

 

earth inmarathi

 

२) कृत्रिम सूर्य पृथ्वीला प्रकाशित करेल

२१०० पर्यंत कृत्रिम सूर्य पृथ्वीच्या संपूर्ण भागाला एकाचवेळी प्रकाशित करु शकेल. सध्या रात्रीचा अंधार घालवण्यासाठी विजेचा वापर केला जातो. पण बाबा वंगा म्हणाले होते की एक असा कृत्रिम सूर्य बनवला जाईल जो पृथ्वीचा संपूर्ण भाग एकाचवेळी प्रकाशमय करेल, ज्यामुळे रस्त्यावर दिवे लावण्याची गरज पडणार नाही.

 

sun IM

 

३) मानव आणि यंत्रमानव सारखेच असतील

२१११ पर्यंत रोबोट माणसाप्रमाणे काम करु लागतील. त्यांना सायबोर असे म्हटले गेले आहे. जगातील अनेक देशांमध्ये रोबोट तंत्रज्ञानावर काम केले जात आहे आणि मानवाने यामध्ये मोठे प्रमाणात यश मिळवले आहे.

४) तसेच बाबा वंगाने सांगितले आहे की या शतकात, टाइम ट्रेवल करणे शक्य होईल, तसेच अंतराळात असलेल्या इतर ग्रहांवरील येणे जाने सोपे होईल.

 

robot inmarathi 2

“फक्त आणि फक्त पुतीनच साऱ्या जगावर राज्य करतील” बाबा वांगांची पुन्हा भविष्यवाणी

”येत्या काळात जगावर…” बिल गेट्सच्या नव्या भविष्यवाणीने झोप उडवलीय

तर ही आहेत वंगा यांच्या काही भविष्यवाणी. भाकितांच्या तारखांबाबत अनेक मतमतांतरे असली तरी काही घटना सांगितलेल्या वेळेपूर्वी घडल्या आहेत, तर काही घडल्याचं नाहीत किंवा उशिरा घडल्या आहेत, तर काही घटना अंशतः खर्‍या ठरल्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?