इतिहासातल्या या सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे असलेल्या संपत्तीचा आपण विचारही करु शकणार नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुमच्या आमच्या सारख्या सामन्यांना श्रीमंताबद्दल फारच कुतुहूल असतं नाही का? आणि आपल्या देखील मनात नाही म्हटलं तरी एक छुपी इच्छा असते की, ‘कदाचित मी देखील एवढाच श्रीमंत होईल’.
असो, प्रत्येकजण तर श्रीमंत होणार नाही, अगदी नशीबववानच त्या पदाला पोचतात. सध्याच्या युगातले नशिबवान म्हणजे सर्व अब्जाधीश लोकं, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे.
काहीच्या बाबतीत असंही ऐकलंय की त्यांनी मिनिटाला लाखो रुपयो उडवले तरी त्यांची संपत्ती काही संपणार नाही. यात किती तथ्य ते जो तो अब्जाधीशच जाणो.
तुम्हाला माहीतच असेल की फोर्ब्स सारख्या मासिकात दरवर्षी जगातील सर्वात श्रीमंत माणसांची यादी प्रसिद्ध केली जाते.

बिल गेट्स गेली कित्येक वर्षे या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याची संपत्ती देखील तेवढी आहे म्हणा, त्यामुळे तुम्हालाही असेच वाटत असेल की आजवर त्याच्याएवढा श्रीमंत व्यक्ती झाला नसेल तर तुमचा अंदाज चूक आहे, कारण बिल गेट्स पेक्षाही अतिश्रीमंत व्यक्ती होऊन गेलाय.
आजपर्यंत पृथ्वीवर होऊन गेलेल्या मानवांमधे सर्वात श्रीमंत व्यक्तीचा हा मान जातो टिंबकटू राजधानीचा राजा “मन्सा मुसा” कडे.

बाराव्या शतकात आफ्रिकेतील माली राजघराण्यात मुसाचा जन्म झाला. ” मन्साचा” अर्थ आहे राजांचा राजा. सोन्याच्या खाणींची मालकी आणि जगातील जवळपास अर्धा मिठाचा व्यापार मन्सा मुसा नियंत्रीत करत होता.
मन्सा मुसा धार्मिक मुसलमान होता आणि त्याने केलेली हज यात्रा आजही प्रसिद्ध आहे. ६०००० नोकरचाकर घेऊन मन्सा मुसा हजयात्रेला निघाला.

प्रत्येक नोकराकडे जवळपास दोन किलो वजनाची सोन्याची लड मुसाने ठेवली होती. याशिवाय ८० उंटांच्या पाठीवर शंभर शंभर किलो सोने दानधर्मात वाटण्यासाठी होते. प्रवासात लागलेल्या प्रत्येक गाव शहरात मुसाने गरीबांवर सोन्याची खैरात केली.

या सोन्याच्या दानधर्माचा परिणाम असा झाला कि त्या प्रदेशात सोन्याचे भाव कोसळले. आपल्या परतीच्या प्रवासात मुसाने सावकारांकडून जवळपास सगळे सोने अत्यंत चढ्या व्याजावर गोळा करून नेले व त्या उपखंडातील सोन्याचे दर निश्चित करू लागला. आजवरच्या इतिहासात सोन्याचा भाव नियंत्रीत करणारा एकमेव एकटी व्यक्ती म्हणुन मुसाची नोंद आहे.

आजच्या भाषेत बोलायचं तर बिल गेटस्, वॉरेन बफे, सॅम वॉल्टन या तिघांच्या एकत्रित संपत्ती पेक्षा कितीतरी पट अधिक संपत्तीचा मालक मन्सा मुसा होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.