आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राजकुमार हे हिंदी चित्रपटातलं असं नाव आहे की हे नाव उच्चारलं तरिही एक राजबिंडं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं रहातं. त्याचं संपूर्ण आयुष्यच त्याच्या नावाला साजेसं जगला तो!
गंमत अशी की एरवी या इंडस्ट्रीचा नियम हा आहे की, इथे तुमचा चित्रपट फ्लॉप झाला तर तुमची किंमत उतरते मात्र राजकुमार हा असा अभिनेता होता जो त्याचा चित्रपट फ्लॉप झाला तरिही पुढच्या चित्रपटासाठी तो आपली फी एक लाखानं वाढवत असे.
या फी वाढीवर त्याचं स्पष्टीकरण असं असे की, माझे चित्रपट फ्लॉप होतात मी नाही. हम सुपरस्टार थे, हम सुपरस्टार है और मरते दम तक सुपरस्टारही रहेंगे. असा माज असणारा असा हा हिरो त्याचं नाव त्याच्या वर्तवणूकीतून सिध्द करत असे.
मुळात राजकुमार त्याच्या अभिनयापेक्षाही त्याच्या या माजातल्या जगण्यामुळेच जास्त चर्चेत असायचा. अर्थात असा माज करणं त्याला शोभूनही दिसत असे. छाप पाडणारचं राजबिंडं व्यक्तिमत्व, दमदार संवादफेक यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
चित्रपट काही कारणानी फ्लॉप झाला तरिही आपल्या नायकावरचं चाहत्यांचं प्रेम तसूभरही कमी होत नसे. याची पूर्ण जाणीव आणि खात्री असणारा राजकुमार म्हणूनच प्रत्येक चित्रपटागणिक आपलं मानधन वाढवत असे.
राजकुमारनं त्याच्या पूर्ण कारकिर्दीतच आपल्या अटिंवर चित्रपट स्विकारले आणि त्यात काम केलं. जिथे पटलं नाही तिथून क्षणाचाही विचार आणि विलंब न करता तो निघून जात असे. सुपरस्टारचे नखरे काय असतात याचा अनुभव निर्मात्यांना राजकुमारसह काम करताना येत असे.
बेताज बादशहा दरम्यान घेतलेल्या एका मुलाखतीत राजकुमारने जे सांगितलं ते त्याच्या स्टाअरडमचं सार मानायला हरकत नाही.
—
- गोविंदाने भेट म्हणून दिलेला टी-शर्ट रुमाल म्हणून वापरणारा विक्षिप्त ‘राजकुमार’!
- मुंबई पोलीस ‘सब इन्स्पेक्टर’ असा बनला पडद्यावरचा, “जानी ऽऽऽ”
—
बेताज बादशहा मधे शत्रुघ्न सिन्हा आणि मुकेश खन्ना असे नामांकीत कलाकार होते मात्र मल्टिस्टारर असूनही हा चित्रपट चालला नाही. याच दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमारला या फ्लॉपबाबत आनि चित्रपट फ्लॉप होऊनही पुढच्या चित्रपटात तो वाढवत असलेल्या मानधनाबाबत प्रश्न विचारला गेला.
यावर त्यानं आपल्या नेहमीच्या स्टाईलमधे उत्तर दिलं, चित्रपट फ्लॉप होण्याची अनेक कारणं असतात. माझी भूमिका मी प्रत्येक चित्रपटात त्याच मेहनतीनं आणि मन लावून करत असतो.
फ्लॉप झालेल्या चित्रपटांचा मी विचारही करत नाही कारण त्याची अनेक कारणं असू शकतात. मला इतकंच कळतं की, फिल्म फ्लॉप हो सकती है, मैं नही. म्हणूनच वाढवलेलं मानधन हे राजकुमारचं मानधन असतं आधीच्या फ्लॉप झालेल्या चित्रपटाच्या नायकाचं नाही.
राजकुमारचा जन्म एका कश्मिरी पंडीत कुटुंबात ८ ऑक्टोबर १९२६ साली बलूचिस्तानमध्ये (आताच्या पाकिस्तानात) झाला. राजकुमारचं खरं नाव होतं, कुलभुषण पंडित आणि त्याला त्याचे निकटवर्तीय लाडानं, “जानी” म्हणून हाक मारत असत!
१९४० साली कुलभुषण मुंबईत आला. चित्रपटांत येण्यापूर्वी राजकुमार पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते. १९५२ साली चित्रपटात नशिब अजमवायला तो आला आणि हिंदी चित्रपटातला राजकुमार बनला.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.