' ८००० चा पगार ते ५० लाखांचा मालक, भारी नशीबवान माणसाची गोष्ट! – InMarathi

८००० चा पगार ते ५० लाखांचा मालक, भारी नशीबवान माणसाची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज प्रत्येक तरुणाला वाटत की आपल आयुष्य सेट असावं, छान मोठ्या कंपनीत आपण काम करावं, चांगला पगार हातात पडावा, चांगली गाडी आपल्या घराखाली असावी असं प्रत्येक मिडलक्लास माणसाला वाटतं पण प्रत्यक्षात आपण त्यासाठी किती झटतो??

 

Beautiful-Houses-with-the-car InMarathi

हे ही वाचा – ५० पैसे ते २ लाख : पतीच्या अत्याचारांना झुगारून, शून्यातून विश्व उभारणाऱ्या स्वावलंबी महिलेची कहाणी

हा प्रश्न आपण स्वतःला विचारायलाच हवा! की आपण हे सगळं मिळवण्यासाठी काय  प्रयत्न करतो??

नोकरीची गरज प्रत्येकालाच आहे. कारण काम केलं तर पैसा मिळणार आणि मगच पोट भरणार. पण बहुतेक जणांची एक तक्रार असते की मनासारखी नोकरी मिळत नाही. मनासारखी नोकरी केवळ नशीबवान लोकांनाच मिळते असंही ऐकलंय.

आणि मनासारखी नोकरी प्रत्येकालाच मिळते अशातला भाग नाही, त्यामुळे सतत हातच सोडून पळत्याच्या मागे लागणे कधीही वाईटच, आणि सतत नोकरी बदलणे हा सुद्धा सध्याचा ट्रेंड असला तरी प्रत्येकाच्या बाबतीत तो लागू होतोच अशातला देखील भाग नाही!

असो, पण कोणतीही व्यक्ती घ्या एका नोकरीमध्ये संतुष्ट राहू शकत नाही. कधी न कधी त्याला त्या ठराविक नोकरीचा तसेच कामाचा कंटाळा येतोच आणि मग सारख्या नोकऱ्या बदलण्याची सवय लागते. काही काही जण तर ३-३ महिन्यांमध्येच नोकरी बदलत असतात. तर अशाच असंतुष्ट लोकांसाठी आहे ही श्याम कुमारची गोष्ट.

 

shyam-kumar-marathhipizza01

 

१० लोकांच्या भल्या मोठ्या कुटुंबासमवेत श्याम १० बाय १० च्या खोलीत राहत होता. वडिलांच्या आजारपणामुळे श्यामला शाळा सोडून काम करणे भाग होते आणि पुढे एखादी चांगली नोकरी मिळवण्यासाठी श्याम खटपट करू लागला.

याचवेळी २०१० मध्ये श्यामची ओळख जितेंद्र गुप्ता यांच्याशी  झाली. जितेंद्र यांनी मोबाईल वॉलेट स्टार्टअप कंपनी- Citrus Pay सुरु केली होती. आणि अमरीष राऊ हे त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते

 

citrus-pay-logo

भारतात त्यावेळी E-Commerce नव्यानेच सुरु झाले होते आणि तसला व्यवसाय एवढा प्रसिद्ध नव्हता. यावेळी जितेंद्र आपल्या कंपनीचा जम बसावा यासाठी प्रयत्न करत होते. २०१० मध्ये श्याम जितेंद्रच्या कंपनी मध्ये ८००० पगारात Peon च्या नोकरीला लागला. त्यावेळी त्या कंपनीमध्ये ५० पेक्षा कमी कर्मचारी होते.

 

 

citrus pay fouders

हे ही वाचा – हा फास्टफूड प्रकार “पौष्टिक” बनवून खायला लावणाऱ्या तरुण भारतीय उद्योजकाची कहाणी!

दररोज सकाळी १० वाजता सायट्रस पे च्या संताक्रुज च्या ऑफिसमध्ये जाऊन एक खोली उघडायची, आणि तिथे जाऊन नुसतं बसून राहायच जोवर कुणी काही काम सांगत नाही तोवर, ही श्यामची दिनचर्या होती! कधी कधी कंपनीचे सीईओ जितेंद्र गुप्ता सुद्धा काही मिटिंग्स च्या कारणास्तव ऑफिस मध्ये नसायचे!

तेंव्हा श्याम ऑफिस बंद करून दुपारीच  १ वाजताच घरी जात असे, त्याच्या आधीच्या नोकरीपेक्षा इथे ८००० रुपयांच्या मानाने चांगलीच पगारात वाढ मिळाली होती!

हा सगळा प्रकार बघता, हा नक्की कसला बिझनेस आहे ही शंकेची पाल सुद्धा श्याम यांच्या मनात चुकचुकत होती, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले!

 

shyam-kumar-marathhipizza02

 

५ वर्षानंतर कंपनीमध्ये Sequoia Capital, Ascent Capital, eContext Asia आणि Beenos Asia यासारख्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आणि २०१६ मध्ये कंपनीसोबत श्यामचे नशीब तेव्हा बदलले जेव्हा Pay U ने Citrus Pay कंपनी  १३० मिलियन डॉलर मध्ये खरेदी केली.

कारण कंपनी विकली गेल्याने आता श्यामच्या स्टॉक्सची किंमत ५० लाख रुपये झाली होती.

कंपनीच्या मालकाने स्वतः श्यामला ही आनंदाची बातमी दिली. परंतु जो पर्यंत शामच्या खात्यात ५० लाख रुपये जमा झाले नाहीत तो पर्यंत श्यामचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.

आज श्याम झोपडपट्टी सोडून १ बीएचके फ्लॅट मध्ये राहतो आहे. स्वत:चे घर असावे असे श्यामचे स्वप्न आहे. आपल्या दोन्ही मुलांनी शिकून डॉक्टर व्हावे अशी त्याची दाट इच्छा आहे.

shyam-kumar-marathhipizza03

 

तर आशा या श्यामच्या थक्क करणाऱ्या प्रवासापासून आपण सुद्धा बरच काही बोध घेऊ शकतो, खरंच जर नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ठीक आहे, पण उठसूट आहे त्या नोकरीला शिव्या घालायच्या याला काही एक अर्थ नाही, दुसऱ्यांचा पगार इतका आणि माझा कमी का??

असं म्हणून जर नोकरीला शिव्या देत असाल, तर मात्र तुम्ही थोडा संयम बाळगण्याची खरंच गरज आहे. कारण प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचं फळ नक्की मिळतं, पण त्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज असते.

वरील गोष्टीत जर श्यामने देखील कंटाळून आपली नोकरी २-३ वर्षांत सोडली असती तर आजही तो त्या १० बाय १० च्या खोलीतच अडकला असता, पण त्याने आहे त्यात संतुष्ट राहून तब्बल ५ वर्षे कमी पगारात काम केले आणि त्याचे फळ म्हणून तो आज आहे.

तर मित्रांनो आपलं नशीब आपल्याला कधी साथ देईल आणि तुमच्यावर देव छप्पर फाडून संपत्तीचा वर्षाव करील याचा खरं काही नेम नाही, त्यामुळे नेहमी आशावादी राहा.

आपल्या हातात असेल ते, आपल्या वाट्याला आलेलं काम, निष्ठेने, मन लावून आनंदाने करणे हाच योग्य मार्ग आहे असं वाटतं…

===

हे ही वाचा – पैसा टिकवणं अवघड असतं; या टिप्स वाचल्यात तर पैसा फक्त टिकणारच नाही, वाढतही राहील

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?