' प्रथम ऑनस्क्रीन चुंबन देणारी, यूसुफ खानला दिलीप कुमार बनवणारी ही अभिनेत्री कोण? – InMarathi

प्रथम ऑनस्क्रीन चुंबन देणारी, यूसुफ खानला दिलीप कुमार बनवणारी ही अभिनेत्री कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय चित्रपट रसिकांसाठी ड्रीम गर्ल म्हणलं की हेमा मालिनी हे समिकरण आज जरी रुळलं असलं तरिही या किताबाची पहिली मानकरी आहे देविका राणी. सौंदर्य आणि अभिनय यांचा अनोखा मिलाप म्हणजे देविका राणी होत्या.

आज अनेकांना देविका राणी हे नाव माहितही नाही मात्र एकेकाळी चित्रपट सृष्टीवर राज्य केलेली ही अभिनेत्री त्याकाळातली अत्यंत बोल्ड ॲण्ड ब्युटीफ़ूल अभिनेत्री म्हणून ओळखली जात असे.

 

devika rani IM

 

देविका राणी यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी विशाखापट्टण येथे झाला. गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांची त्या नात. देविकाचे वडील कर्नल एम एन चौधरी हे मद्रासचे पहिले सर्जन जनरल होते. लहानपणापासूनच देविका अत्यंत मोकळ्या वातावरणात वाढली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांनी लंडनमधून थिएटरचे शिक्षण घेतले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. दहा वर्षांची कारकीर्द असणार्‍या देविका यांनी अवघ्या पंधरा चित्रपटांत भूमिका साकारल्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या चित्रपटात भूमिका साकारुनही हिंदी चित्रपट इतिहासात अजरामर झालेलं नाव म्हणजे, देविका राणी.

देविका राणी यांनी १९३३ साली कर्मा या चित्रपटातून पदार्पण केलं. हा पहिलाच इंग्रजी भाषेतील चित्रपट मानला जातो जो भारतीयानं बनविला होता आणि या आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी तब्बल चार मिनिटं लांबीचं चुंबन दृष्य दिलं.

 

devika rani kiss IM

 

सध्याच्या सिनेमात, वेबसिरिजमध्ये आपल्याला सर्रास प्रणयदृश्य, नग्नता, समलैंगिकता बघायला मिळतं, पण एवढ्या जुन्या काळातसुद्धा देविका राणी यांनी थेट ऑनस्क्रीन चुंबनदृश्य देऊन चांगलीच खळबळ माजवली होती.

करिश्मा आमीरच्या राजा हिंदुस्तानीमधल्या चुंबनदृश्याला यापूर्वीच मागे टाकणारा हा सीन फारसा कुणाला ठाऊक नाही!

 

aamir karishma inmarathi

ज्या काळात स्त्रिया पडदा पध्दतीतून बाहेर आल्या नव्हत्या, पतीचा हातही चारचौघात धरणं जिथे शिष्टाचाराला धरून मानलं जात नव्हतं तिथे देविका राणीनं चुंबनदृश्य देऊन खळबळ माजवली.

यापूर्वी अशा प्रकारे चुंबनदृश्य चित्रीत केलं नव्हतं. अपवाद मूकपट सीता देवी आणि चारू रॉय यांच्यावर चित्रीत झालेल्या मूकपटातील चुंबनदृश्य. मात्र या सिनेमाची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा देविका राणी आणि हिमांशु रॉय यांच्या पडद्यावरील चार मिनिटं लांबीच्या चुंबनाची झाली.

भारतीय चित्रपट इतिहासातील हे आजवरचे सर्वात दीर्घ चुंबनदृष्य मानले जाते. मात्र वास्तविक पहाता पडद्यावर हा प्रसंग जसा घडतो ते पहाता हे रुढार्थानं चुंबन नव्हते. या चित्रपटातील हिमांशु जे पात्र साकारत होते त्या पात्राला साप चावला असता त्याला शुध्दीवर आणण्यासाठी देविका राणींचं पात्र चुंबनांचा वर्षाव करतं.

 

devika rani and himanshu rai IM

 

हे करत असतानाच ओठांचं चुंबनही घेतलं जातं. हे दृश्य त्या काळात पडद्यावर बघून प्रेक्षकांचे श्र्वास थांबले होते. या दृश्यावर टिकाही भरपूर झाली कारण त्या काळात खुलेआम अशा प्रकारचा प्रणय दाखविणं समाजमान्य नव्हतं.

देविका राणींच्या खात्यात आणखिन एका गोष्टीचं श्रेय जातं आणि ते म्हणजे त्यांनी भारतीय चित्रपसृष्ट्रीचा ट्रॅजेडी किंग, दिलिप कुमार अर्थात यूसुफ खान शोधला आणि या हिर्‍याला कोंदणात बंदिस्त केलं.

दिलिप कुमार यांना चित्रपटात आणण्याचं श्रेय देविका राणींना जातं. शिवाय यूसुफ खानचा दिलिप कुमारही देविका राणीनीच केला.

 

devika rani dilip kumar IM

 

१९२८ साली देविका आणि हिमांशू यांची भेट झाली आणि त्याच वर्षी त्यांचा विवाहही झाला. यानंतर या जोडप्यानं बॉम्बे टॉकिज नावाच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करुन अनेक गुणी कलाकारांना प्रेक्षकांसमोर आणलं.

बोल्ड ॲण्ड ब्युटीफ़ूल या उक्तीला जर मानवी चेहरा दिला तर तो देविका राणी असेल. आपल्या कारकीर्दीत आणि नंतरही निर्माती म्हणून देविका राणींनी खबळळ उडवून दिली होती.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?