Site icon InMarathi

IMDb ची रेटिंग पद्धत कशी असते आणि ती विश्वसनीय आहे की बोगस? जाणून घ्या

IMDB works featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणता सिनेमा बघायचा की नाही हे आपण कसं ठरवतो? सिनेमाच्या विषयाबद्दल ऐकून किंवा ट्रेलर बघून आपलं एक मत बनलेलं असतं की हा सिनेमा मी बघावा की नाही. हा सिनेमा ‘माझ्या लेव्हल’चा आहे की नाही आणि मी माझा अमूल्य वेळ या सिनेमाला द्यावा का? हा निर्णय आपल्या मनाने फार कमी वेळात घेऊन टाकलेला असतो.

सिनेमा प्रदर्शित झाल्यावर वर्तमानपत्रात आलेले सिनेपरीक्षण, रेटिंग्ज हे केवळ आपल्या मताशी साधर्म्य ठेवतात की नाही हे आपण तपासत असतो.

‘आयएमडीबी’ रेटिंग ही उपलब्ध असलेल्या सर्व रेटिंग पैकी अधिकृत मानली जाते असं सिनेरसिकांचं मानणं आहे.

 

 

याचं सर्वात ताजं उदाहरण म्हणजे बहुचर्चित विवादीत ‘द काश्मिर फाईल्स’ हा सिनेमा. या सिनेमाचं मेन स्ट्रीम मीडियाने काहीच प्रमोशन केलं नाही, तरी केवळ माऊथ पब्लिसिटीवर त्याने दमदार सुरुवात केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी रिलीजपासूनच या सिनेमाचं IMDB रेटिंग १० पैकी १० होतं. दुसऱ्या दिवसांपासून सिनेमासाठीच्या स्क्रीन्स वाढवल्या आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कल्ला करायला सुरुवात केली.

अचानक ३ दिवसांनी या सिनेमाचं रेटिंग १०/१० वरुन थेट ८.३ वर आलं होतं, जेव्हा हे रेटिंग खाली आलं तेव्हा IMDB ने खुद्द साईटवर मान्य देखील केलं की काही ‘unusual traffic’ मुळे सिनेमाचं रेटिंग कमी झालं आहे.

 

 

अर्थात सिनेमाचं रेटिंग करण्यामागे कोणाचा काय उद्देश आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, पण IMDB ची रेटिंग सिस्टम कशी काम करते त्याविषयीच आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!

आयएमडीबी ही आंतरराष्ट्रीय संस्था प्रत्येक सिनेमाला एक रेटिंग देत असते. पण, असं असेल का की त्यांच्याकडे एक मोठी समीक्षकांची फौज बसली आहे जी रोजच्या रोज प्रत्येक भाषेत प्रदर्शित होणारे हजारो सिनेमे, वेबसिरीज बघत असतील आणि मग आपलं मत देत असतील? आयएमडीबी आपली रेटिंग कोणत्या गोष्टींच्या आधारे देत असतील? जाणून घेऊयात.

‘आयएमडीबी’ म्हणजेच ‘इंटरनेट मुव्ही डेटाबेस’ हा मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, कलाकृतींचा एक ऑनलाईन डेटाबेस आहे ज्यामध्ये प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपट, टेलिव्हिजन सिरीज, विडिओ गेम्स यांच्याबद्दल माहिती संग्रहित करून ठेवण्यात आली आहे.

 

 

१९९० मध्ये ही संस्था अस्तित्वात आली होती. १९९३ मध्ये या संस्थेने ऑनलाईन स्वरूपात काम करण्यास सुरुवात केली होती. १९९६ मध्ये इंग्लंडमधील कर्नल नीडहॅम यांनी आयएमडीबी लिमिटेड या कंपनीची अधिकृत नोंदणी केली होती.

१९९८ मध्ये आयएमडीबी ही कंपनी ‘अमेझॉन’ने विकत घेतली. ‘आयएमडीबी’ कडे स्वतःचे असे कोणीच समीक्षक नाहीयेत. त्यांच्या वेबसाईटवर आपल्यासारखेच प्रेक्षक आहेत जे की प्रत्येक कलाकृती बघून झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया रेटिंग नोंदवत असतात.

आपल्याला दिसणारी रेटिंग ही या सर्वांची सरासरी असते. प्रत्येक सिनेमाला ते १ ते १० मध्ये रेटिंग देतात आणि मग त्याची जगभरात चर्चा होते. हीच पद्धत ते मोशन पिक्चर्स, वेबसिरीजसाठी सुद्धा वापरत असतात.

१९७२ मध्ये रिलीज झालेला ‘द गॉडफादर’ हा सिनेमा आयएमडीबीवर ९.८ इतकी सर्वात जास्त रेटिंग असलेला सिनेमा आहे.

 

 

आयएमडीबीची रेटिंग ही प्रेक्षकांचं मत, मत देणाऱ्या व्यक्तीचं वय, लिंग यावरून हा सिनेमा नेमका कोणाला आवडतोय ही माहिती देखील पुरवली जाते.

आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक कलाकृतीची योग्य रेटिंग मिळावी यासाठी आयएमडीबी नेहमीच आपल्या अल्गोरिदम वर काम करत असतात. कोणत्याही सिनेमाची रेटिंग आयएमडीबीवर टॉप २५० मध्ये प्रकाशित होण्यासाठी ते कमीतकमी २५००० लोकांच्या प्रतिक्रियेची वाट बघत असतात.

आयएमडीबीच्या रेटिंगनुसार एका खराब सिनेमाची रेटिंग ही शून्य ते तीन इतकी असते. सर्वसाधारण सिनेमाची रेटिंग ही ३ ते ७ च्या मध्ये असते. एखादा सिनेमा खूप जास्त चांगला आणि ‘बघावाच’ असा असेल तर त्याची रेटिंग ही ७ ते १० च्या मध्ये असते.

 

 

आयएमडीबीवर उपलब्ध असलेल्या ‘बॅजेस’ या प्रकारामुळे एखाद्या सिनेमाबद्दल किती प्रेक्षकांनी मत नोंदवलं आहे हेसुद्धा बघता येतं.

काही वर्षांपासून आयएमडीबीने ‘आयएमडीबी प्रो’ हे एक फिचर सुरू केलं आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष कलाकार, दिगदर्शक आपल्या कामाची माहिती अपलोड करत असतात. आयएमडीबी या सेवेसाठी प्रत्येक लॉगिन आयडी साठी वार्षिक १५० यूएस डॉलर्स इतकी फिस घेत असते.

आपल्या डेटाबेसच्या आधारे आयएमडीबीने टीव्ही चॅनल देखील सुरू केलं आहे. सिनेरसिक आणि अभ्यासकांसाठी आयएमडीबीची वेबसाईट ही एक पर्वणी आहे.

लोकांनी लोकांच्या माहितीसाठी सुरू केलेली सेवा अशीच सुरू रहावी आणि त्याद्वारे लोकांचा अनावश्यक सिनेमा बघण्याचा वेळ वाचत राहो अशी आशा व्यक्त करूयात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version