' महाराष्ट्राप्रमाणे देशातही नवी युती पहायला मिळणार का? कमेंट करा – InMarathi

महाराष्ट्राप्रमाणे देशातही नवी युती पहायला मिळणार का? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारणात नेमकं काय घडेल याचा अंदाज बांधणं भल्याभल्यांनाही जमत नाही. महाराष्ट्रात भल्या पहाटे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल, त्यानंतर राजकीय वर्तुळात वादळ येईल आणि अवघ्या काही तासात ते सरकार बरखास्त होत मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या बाकावर बसतील याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसावा.

 

ajit pawar devendra fadnavis inmarathi

 

मात्र यापेक्षाही मोठी अनपेक्षित घटना म्हणजे महाराष्ट्राची सूत्रं शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या हाती गेली. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कॉंग्रेसचा वेळोवेळी समाचार घेतला, त्याच कॉंग्रेसशी शिवसेनेने हातमिळवणी केली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केलं.

सत्ता मिळवण्यासाठी ही तडजोड केली असल्याबाबत शिवसेनेला अनेकदा टिकेला सामोरं जावं लागलं. त्यानंतर विरोधक भाजपने वारंवार हे सरकार टिकणार नसल्याचा अंदाज वर्तवला गेला, मात्र अडीच वर्षांनंतरही महाविकास आघाडी सरकार सत्तेत कायम आहे.

त्यामुळे ‘युती’ फॉर्म्युला यशस्वी ठरतो असंही म्हटलं जातं. महाराष्ट्रात युतीचं राजकारण यशस्वी ठरलं असलं तरी देशातील इतर राज्यांमध्ये अशी अनपेक्षित युती पहायला मिळेल का?

 

mahavikas aghadi inmarathi

 

सध्या उत्तर पर्देशासह पंजाब, गोवा या राज्यांमध्ये कॉग्रेस पिछाडीवर आहे. पंजाबमध्ये आलेली आपची त्सुनामी तर उत्तर प्रदेशात भाजपचं फुललेलं कमळ यांमुळे कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळालेलं नाही. कॉंग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही या निवडणूकीत दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

त्यामुळे सत्तेच्या आशेपायी कॉंग्रेस आता महाराष्ट्राप्रमाणेच इतर पक्षांश युती करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

election im

 

एकाही राज्यात कॉंग्रेसला बहुमत न मिळाल्याने सत्तेची खुर्ची हवी असल्यास कॉंग्रेसला इतर पक्षांची मदत घेईल का? तुम्हाला काय वाटतं? येत्या काळात कॉंग्रेस कोणती खेळी खेळेल? कुणाची मदत घेईल? तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?