Site icon InMarathi

पुतीन यांचा उजवा हात चालताना का हलत नाही?

putin 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे नाव माहीत नसेल असं कुणी आता अभावानेच आढळेल. युक्रेन-रशियातील तणावपूर्ण परिस्थितीचे परिणाम बाकी देशांनाही नाहकच भोगावे लागत आहेत. कित्येकांचं आर्थिक नुकसान झालंय. अनेकांचे जीव अजूनही धोक्यात आहेत. ही सगळी परिस्थिती जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे तर घेऊन जाणार नाही ना अशी भीती जगभरात निर्माण झाली आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पुतीन यांचा दरारा अजून काय काय बघायला लावणार आहे हे येणारा काळच ठरवेल. परिस्थिती कमालीची गंभीर आहेच. मात्र या सगळ्यात केवळ बघ्याच्या भूमिकेत असलेल्या तुम्हाआम्हाला समोर येणाऱ्या बातम्या पाहत राहण्याशिवाय दुसरं काही करता येणं शक्य नाही.

 

daily express

सध्या पुतीन यांच्याविषयीची बरीच माहिती या सगळ्या परिस्थितीच्या निमित्ताने समोर येते आहे. एका हलक्याफुलक्या नोटवर पुतीन यांच्यावरच्या मिम्सनी सोशल मीडियावर एव्हाना चांगलाच धुमाकूळ घातलाय. सोशल मीडियावर त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी व्हायरल होत असताना अशीच एक मजेशीर गोष्ट लोकांच्या निदर्शनास आली आहे. ती म्हणजे ‘पुतीन’ यांच्या चालण्याची विशिष्ट लकब!

पुतीन जेव्हा चालतात तेव्हा त्यांचा उजवा हात हलत नाही. केवळ डावाच हात हलवत ते चालतात ही गोष्ट काही युट्युब व्हिडियोजमधून आपल्या समोर आलीये. व्लादिमिर पुतीन अशा प्रकारे चालण्यामागे नेमकं काय कारण असावं?

 

 

व्लादिमिर पुतीन हे रशियाच्या ‘केजीबी’ या गुप्तचर संस्थेचे माजी सदस्य होते. या गुप्तचर संस्थेत मिळालेल्या प्रशिक्षणाच्या पुतीन यांच्यावरील प्रभावामुळेच पुतीन उजवा हात अजिबात न हलवता केवळ डावा हात हलवतच चालत असावेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

काही टीकाकार असा दावा करतात की पुतीन यांना पार्किन्सन्स हा आजार झाला असून त्यामुळे ते चालताना त्यांचा उजवा हात हलवू शकत नाहीत. पण जर आपण ‘केजीबी’च्या ट्रेनिंग मॅन्युअलवर विश्वास ठेवला तर त्यातल्या गोष्टी विज्ञानाला थोड्या अधिक धरून असल्याचं दिसतं.

‘केजीबी’ या गुप्तचर संस्थेत शस्त्रास्त्रांचं फार कडक प्रशिक्षण दिलं जायचं. पोर्तुगाल, इटली आणि नेदरलँड्समधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ‘केजीबी’च्या ट्रेनिंग मॅन्युअलनुसार, या प्रशिक्षणाच्या वेळी ‘केजीबी’तील सैनिकांना उजव्या हातात छातीजवळ शस्त्र पकडायची सूचना दिली जायची आणि फक्त डावा हात हलवत ते सगळे चालायचे. रशियन सैन्याच्या मते शत्रूने अचानक वार केला तर पटकन उजव्या हाताने शस्त्र/बंदूक काढून शत्रूवर पलटवार करण्याची पद्धत फायद्याची आहे. पुतीन यांच्या अशा विशिष्ट चालीमागे हे कारण असू शकतं.

 

 

पुतीन यांच्या अशा प्रकारे चालण्याला जगाने ‘अल्फा मेल वॉक’ असं नाव दिलंय. याखेरीज ‘द युनायटेड किंगडम’चे माजी परराष्ट्र सचिन लॉर्ड डेव्हिड ओवेन यांनी पुतीन हे स्टिरॉइड्स वापरत असल्याची शक्यता वर्तवली आहे. स्टिरॉइड्स घेतल्यामुळेच पुतीन यांच्या चेहऱ्याचा आकार बदलला आहे असं लॉर्ड ओवेन यांनी ‘टाइम्स रेडियो’ ला सांगितलं. ते एकतर ऍनॅबॉलिक स्टिरॉइड्सवर किंवा कॉर्टिकोस्टिरॉइड्सवर असावेत, कदाचित हे दोन्ही स्टिरॉइड्सही घेत असावेत असं ते म्हणाले. यामुळे तुमची प्रतिकारक्षमता कमी होऊन तुम्हाला कोविडचा धोका अधिक संभवतो.

लॉर्ड ओवेन यांच्या म्हणण्यानुसार ऍनॅबॉलिक स्टिरॉइड्समुळे माणसातली संतापाची भावना वाढते. व्लादिमिर लेनिननंतर व्लादिमिर पुतीन यांनी रशियावर दीर्घकाळ राज्य केलंय. आपल्या सार्वभौमत्त्वाला धक्का पोहोचेल असं काहीही पुतीन घडू देत नाहीत.

 

zeenews.india.com

 

चालणं ही खरंतर किती साधीशी कृती! पण उजव्या हाताने सगळ्या गोष्टी करणाऱ्या अनेकांमध्ये डावरी व्यक्ती जशी पटकन लक्ष वेधून घेते तशाच प्रकारे, मात्र फार वेगळ्या कारणामुळे पुतीन यांचं चालणं लक्षवेधी ठरतंय. वरकरणी अगदी छोट्या वाटणाऱ्या कृतीमुळेदेखील लोकांच्या मनात किती कुतूहल निर्माण होऊ शकतं हेच आपल्याला पुतीन यांच्या या विशिष्ट प्रकारे चालण्याच्या उदाहरणावरून लक्षात येतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version