Site icon InMarathi

युक्रेन रशियाच्या वादामुळे हताश झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रा पुढे सरसावलेत

mahindra im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रशिया – युक्रेन महायुद्धामुळे येणाऱ्या काळात अनेक नवीन प्रश्न उभे राहणार आहेत. युद्धाचा भडका उडाल्याने खाद्यतेल, लोखंड अशा रोजच्या वापरातल्या अनेक गोष्टी महाग झाल्यात. भविष्यातही होणाऱ्या अनेक घडामोडींवर या युद्धाचा प्रभाव असेल. परंतु या युद्धाचा सर्वात जास्त फटका परदेशी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी रशिया, युक्रेन, चायना यांसारख्या देशात जातात. भारतात असलेली मेडिकल शिक्षणाची अनास्था याला कारणीभूत म्हणता येईल. कमी कॉलेज संख्या, भरमसाठ फी, आरक्षणामुळे गुणवत्तेला प्राधान्य न मिळाल्याने नाईलाज म्हणून विद्यार्थी परदेशाची वाट धरतात.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात आले असताना एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येवर एक ToI अहवाल ट्विट केला, “मला कल्पना नव्हती की भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची इतकी कमतरता आहे.” त्यांनी टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ सीपी गुरनानी यांना महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वैद्यकीय अभ्यास संस्था स्थापन करण्याच्या कल्पनेवर विचार करण्यास सांगितले.

 

mygoodtimes

 

यावर ट्विटवर अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून काही लोकांनी या कोर्सची फी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातली ठेवण्याची विनंती केली आहे. तर एक युजर म्हणतो की, ‘ दर वर्षी नऊ – दहा लाख विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी देशाबाहेर जातात. ही संख्या खूपच मोठी आहे. जर तुमच्या सारख्या अब्जाधीश उद्योजकांनी देशातच ह्या विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध केल्यास देशाच्या जीडीपीला हातभार लागेल ‘.

 

 

रशिया – युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून युद्धाच्या आठवणींनी शेयर करताना सांगितले की ते त्यांच्या बालपणात २ युद्धांतून जगले आहेत आणि रशिया-युक्रेन संघर्षाने त्यांच्यासाठी त्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत.
महिंद्रा यांनी युक्रेनच्या ल्विव्हमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवल्याचा व्हिडिओ रिट्विट केला आणि लिहिलं की १९६५ आणि १९७१च्या भारत-पाक युद्धांची आठवण झाली.

“माझ्या लहानपणी मी दोन युद्धांतून जगलो आहे: ‘६५आणि ‘७१. आणि मला आठवते की मुंबईत हवाई हल्ल्याचे सायरन वाजले की पूर्ण शरीर थंड पडायचे. या आवाजाने त्या भयानक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या,” असे त्यांनी ट्विट केले.

 

indiatoday.intoday.in

रतन टाटांनंतर समाजउपयोगी कामांमध्ये जर कोणती व्यक्ती येत असले तर ती म्हणजे आनंद महिंद्रा, देशातील लोकांच्या टॅलेंटला ते कायमच शाबासकी देत असतात, तसेच वेळ पडलीतर मदत देखील करत असतात. सध्या भारतातील मेडिकल शिक्षण हा विषय गाजतोय, त्यामुळे येत्या काही वर्षांत त्यात बदल होईल का हे येणार काळच ठरवेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version