Site icon InMarathi

राजकारणात आक्रमक, वादग्रस्त असलेल्या पुतिनचं प्रेमप्रकरणही तितकंच वादग्रस्त आहे

putin affair im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येक व्यक्तीची एक सामाजिक प्रतिमा असते आणि एक त्याचवेळी तो एक व्यक्तिगत आयुष्य सुद्धा जगत असतो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं नाव सध्या जगभरात चर्चेत आहे.

 

daily express

 

युक्रेन विरुद्ध युद्धाचं रणशिंग त्यांनी फुंकल्याने त्यांची प्रतिमा सध्या एक विद्रोही, आक्रमक आणि नकारात्मक व्यक्ती, नेतृत्व म्हणून देखील कुप्रसिद्ध होत आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल आणि कथित गर्लफ्रेंडबद्दल कुतूहल म्हणून जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पुतीन यांचं व्यक्तिगत आयुष्य

पुतीन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी सोविएत युनियन मधील लेनिनगार्ड येथे झाला. आपलं शालेय शिक्षण त्यांनी बास्कोव्ह लेन येथे पूर्ण केलं. ज्यूडो कराटेची आवड असलेल्या पुतीन यांनी १९७५ मध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग त्यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएत युनियन’ या राजकीय पक्षात त्यांनी प्रवेश केला.

 

 

आपल्या करिअरची सुरुवात पुतीन यांनी ‘केजीबी’ या गुप्तचर संस्थेसाठी ‘इंटेलिजन्स ऑफिसर’ या पदापासून केली. १६ वर्ष या पदावर काम केल्यानंतर ते १९९६ मध्ये ते मॉस्को येथे स्थलांतरित झाले.

राजकीय कारकीर्द

‘बोरिस येल्त्सिन’ यांनी स्थपित केलेल्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेस’ सोबत डायरेक्टर या पदावर काम करण्यासाठी आणि त्यासोबतच ‘सेक्रेटरी ऑफ सिक्युरिटी कौन्सिल’ हे पद सुद्धा त्यांनी भूषवलं. १९९९ मध्ये ‘बोरिस येल्त्सिन’ यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्यावेळी पुतीन यांना पहिल्यांदा ‘ऍक्टिंग प्रेसिडेंट’ म्हणून त्यांची पहिल्यांदा निवड झाली.

 

 

आपल्या कामाच्या पद्धतीमुळे पुतीन यांना रशियाच्या लोकांचं समर्थन मिळालं आणि ते चार महिन्यातच झालेल्या निवडणुकीत ते ‘प्रेसिडेंट’ म्हणून निवडून आले. २००४ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांनी आपलं ‘प्रेसिडेंट’पद त्यांनी राखलं आणि रशियाच्या राजकारणावर त्यांनी आपली पकड मजबूत केली.

वैवाहिक जीवन

१९८३ मध्ये केजीबी गुतचर संस्थेसोबत काम करत असतांना त्यांची ओळख लिउदमीला ष्क्रेबनेवा यांच्यासोबत झाली आणि लवकरच ते विवाहबंधनात अडकले. मारिया आणि येकातेरीना ही पुतीन यांच्या दोन मुलींची नावं आहेत. व्लादीमिर पुतीन आणि लिउदमीला यांचा संसार ३० वर्ष चालला आणि २०१३ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

 

 

रशियाची ‘प्रथम स्त्री’ म्हणून मान मिळवलेल्या लिउदमीला या फार क्वचित प्रसार माध्यमांसमोर आल्या. पण, त्यांनी नेहमीच सामाजिक कार्यात आपलं योगदान दिल्याचं सांगितलं जातं.

कथित गर्लफ्रेंड

पुतीन यांची राजकीय कारकीर्द बहरत असतांना, संसार सुरळीत सुरू असतांना त्यांचं नाव हे ‘अलिना काबाएवा’ या जिम्नॅस्टिक खेळाडूसोबत जोडलं जायचं. पुतीन यांनी हे नातं कधीच कबूल केलं नाही, पण कधी त्या नात्याचा विरोध देखील केला नाही.

२००८ मध्ये एका रशियन वर्तमानपत्राने हे देखील छापलं होतं की, पुतीन आणि अलिना यांचा साखरपुडा झाला आहे. रशियातील काही वृत्तपत्र संस्थांनी असाही दावा केला आहे की, पुतीन आणि अलिना यांना दोन जुळ्या मुलीदेखील आहेत ज्यांना कधीच प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊ दिलं गेलं नाही.

 

अलिना काबाएवा हिने आपल्या जिम्नॅस्टिक कारकिर्दीत रशियासाठी अथेन्स ऑलम्पिक मध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. सिडनी ऑलम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकलं होतं.

अलिना काबाएवाचा जन्म १२ मे १९८३ रोजी मॉस्को येथे झाला होता. आपल्या जिम्नॅस्टिक कारकिर्दीत एकूण ४१ पदकांची कमाई केलेल्या अलिनाचं पुतीन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नेहमीच कौतुक केलं. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यामुळेच अलिनाला ‘स्टेट ड्युमा डेप्युटी’ या पदावर विराजमान होण्याचा मान मिळाला.

जिम्नॅस्टिक मधून निवृत्ती घेतल्यानंतर अलिना काबाएवा हिने मीडियामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पुतीन यांनी सर्वतोपरी अलिनाला मदत केली आणि तिला ‘नॅशनल मीडिया ग्रुप’ मध्ये सहभागी होण्याची संधी दिली. २००५ मध्ये अलिना हिला ‘पब्लिक चेअर ऑफ रशिया’चा सदस्य करण्यात आलं. २००८ मध्ये ती ‘नॅशनल मीडिया ग्रुप’च्या चेअरवूमनपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

 

 

सप्टेंबर २०१४ मध्ये अलिना यांना नॅशनल मीडिया ग्रुपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये समाविष्ट करण्यात आलं. राजकीय पदांवर काम करत असतांना त्यांना मिळणारा पगार आणि त्या कामाचा अजिबात नसलेला अनुभव हा नेहमीच चर्चेचा विषय होता.

२०१९ पर्यंत अलिना या सार्वजनिक कार्यक्रमात दिसायच्या. पण, त्यानंतर त्यांनी स्वतःला प्रसारमध्यमांपासून नेहमीच दूर ठेवलं. पुतीन ज्याप्रमाणे सध्या युक्रेनबाबद्दल एकही शब्द कोणाचा ऐकून घेत नाहीयेत त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा त्यांना अलिना या विषयावर विचारलं जायचं तेव्हा ते “हा व्यक्तिगत विषय आहे” असं सांगून विषय टाळायचे.

 

zeenews.india.com

 

२०१६ मध्ये सार्वजनिक ठिकाणी अंगठी घालून दिसलेल्या अलिना काबाएवा या आता कुठे आहेत ? हे पुतीन यांच्याशिवाय कोणालाच माहीत नाहीये. पण, या दोघांच्या नात्यांमुळेच अलिना इतक्या मोठ्या पदावर इतक्या कमी वयात पोहोचू शकली हे पूर्ण रशियाला माहीत आहे.

पुतीन लवकरच हे युद्ध थांबवून पुन्हा एकदा मुत्सद्दी राजकारणी आणि रोमँटिक मनुष्य म्हणून जगाला दिसतील अशी इच्छा जागतिक शांततेसाठी व्यक्त करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version