' सकाळचा नाश्ता म्हणून सर्रास चहा-पोळी खाताय? थांबा हे आजार उद्भवू शकतात! – InMarathi

सकाळचा नाश्ता म्हणून सर्रास चहा-पोळी खाताय? थांबा हे आजार उद्भवू शकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अन्न हे पूर्णब्रह्म! भारतीय संस्कृती मध्ये अन्नाला देवासमान मानले आहे. त्यामुळे जेवणाआधी ‘वदनी कवळ घेता’ म्हणत देवाचे आभार मानून अन्नग्रहण करण्याची प्रथा आहे. जसे अन्नाचे महत्व आहे तसेच ते ग्रहण करण्याच्या पद्धतीचेही महत्त्व आहे.

पुराणांमध्ये सांगितले आहे की, ‘सकाळची न्याहरी ही राजासारखी असावी, दुपारचे जेवण हे राजकुमाराप्रमाणे असावे तर रात्रीचे जेवण हे गरीबा सारखे असावे’. म्हणजेच जेवणापेक्षाही सकाळची न्याहरी जास्त महत्त्वाची आहे.

 

lunch breakfast dinner IM

 

रात्रीचे आठ ते दहा तास पोटाला आराम मिळाल्यानंतर सकाळचा नाश्ता हे पोटात जाणारे दिवसभरातील पहिले अन्न असते. त्या अन्नातून आपल्या शरीराला दिवसभराची ऊर्जा मिळण्यासाठीची आवश्यक पोषणमूल्ये मिळणे गरजेचे असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही लोक सकाळी नाश्ता म्हणून चहा चपातीची निवड करतात. परंतु सकाळी चहा चपाती खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कारण चहा चपाती एकत्र खाल्ल्याने त्यामधून शरीराला फार पोषकद्रव्य मिळत नाहीत म्हणून नाश्त्याला चहा चपाती खाणे हा पर्याय फारसा आरोग्यदायी नसल्याचे चिफ डाएटिशन सुनिता रॉय चौधरी यांनी म्हटले आहे.

 

chai chapati IM

 

तसेच चहा हे कॅफिनयुक्त पेय असल्याने दिवसाची सुरवात त्याने करणं आरोग्यदायी नाही. तसेच चहा चपाती या कॉम्बिनेशनमधून आयर्न आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषले जात नाही.

सकाळच्या नाश्त्यामधून काबोर्हायड्रेट आणि प्रोटीन घटक मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा चपातीमधून ही गरज पूर्ण होत नाही. परिणामी शरीराला उर्जा आणि पोषणद्रव्य यापैकी काहीच मिळत नाही.

काही लोकांना चहा आणि बिस्कीट खाण्याची सवय असते. परंतु पोळी ऐवजी चहाबरोबर बेकरी उत्पादने खाणेही लाभकारक नसते.

वजन वाढू नये म्हणून अनेकजण चहासोबत हेल्दी बिस्किटे, हाय फायबर बिस्किटे व साधे टोस्ट असे पर्याय शोधतात, पण रात्री दहा-बारा तास काहीही न खाल्यामुळे घडणारा उपवास चहा-बिस्किटे किंवा टोस्ट खाऊन सोडल्याने शरीराला योग्य पोषण मिळत नाही.

chai biscuit IM

 

त्याचबरोबर पित्ताचा त्रास होण्याचीही शक्‍यता वाढते. बिस्किटे व टोस्ट यांमध्ये मिठाचे व साखरेचे प्रमाण अधिक असते. तेही शरीरासाठी हितावह नसते. म्हणून सकाळी चहा-टोस्ट किंवा चहा-बिस्कीट हा पर्यायही योग्य ठरत नाही.

तर सकाळच्या नाष्टासाठी हेल्दी पर्याय कोणते?

तुम्ही चहा चपाती ऐवजी भाजी चपाती खाऊ शकता. तसेच दूध ,अंडी, पनीर, ओट्स असे पदार्थ सकाळच्या न्याहरीत समाविष्ट करू शकता. कांदेपोहे, उपमा, आप्पे असे पदार्थ तर शरीरासाठी उत्तमच.

इडली सांबार हा सकाळच्या नाश्त्याला एक उत्तम आणि परिपूर्ण पर्याय असून यातून शरीराला पोषकद्रव्य मिळण्यास मदत होते.

 

idli sambar IM

 

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्याला दलिया किंवा नाचणी सत्त्व हे पदार्थ खाऊन पाहा. वरील कोणताही हेल्दी पदार्थ सकाळच्या नाश्त्यात पोटभर खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात उत्साहाने करू शकता.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?