भारत-रशियातील वैद्यकीय शिक्षणात फरक काय? नक्की कोणते शिक्षण चांगले? जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध हे दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत आहे. युक्रेनमध्ये काल एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वच भारतीयांना त्या देशांमध्ये अडकलेल्या मित्र, नातेवाईकांची फारच काळजी वाटत आहे. सोशल मीडियाद्वारे रशिया आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी एक वर्ग सरकारवर दबाव टाकायचा प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे, एक वर्ग ही चर्चा करण्यात वेळ व्यर्थ घालवत आहे की, भारतात सर्व शिक्षणाच्या सोयी असतांना लोक आपल्या मुलांना रशियाला एमबीबीएस करायला पाठवतातच का?
काही व्यक्तींनी तर इतक्या असंवेदनशील प्रतिक्रिया दिल्या आहेत की, “या लोकांवर भारत सरकारने पैसे खर्च करू नये.” रशिया, युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी हे जन्माने भारतीयच आहेत. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी घेऊन ते रशिया मध्ये गेले आहेत.
भारताची कितीही प्रगती झालेली असली तरीही मेडीकल क्षेत्राशी संबंधित असलेल्या सेवा, सुविधा कमी दरात पुरवण्यात आपण रशियापेक्षा मागे आहोत याचा ज्यांनी अभ्यास करून मान्य केलं आहे ते लोक या विषयावर सावध प्रतिक्रिया देत आहेत.
रशियात जाऊन एमबीबीएस करणं हे विद्यार्थ्यांचं स्वप्न का असतं ? आणि त्यांच्या पालकांना हे का परवडतं ? हे खालील मुद्यांच्या आधारे जाणून घेऊयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
१. शिक्षणाचा कमी खर्च
डॉक्टर होण्यासाठी रशियात आकारली जाणारी एमबीबीएसची फिस ही भारत आणि सर्व युरोपियन देशांपेक्षा कमी आहे.
‘अच्छे दिन’ आलेल्या भारतात आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण हे सामान्य व्यक्तींच्या आटोक्यात कधी येतील ? हा प्रश्न सध्या सर्वांनाच भेडसावत आहे.
२. भारतात डॉक्टर होण्यासाठी जास्त पैसे का मोजावे लागतात?
भारताच्या शिक्षण क्षेत्रावर राजकारणी लोकांचा खूप दबदबा आहे. आज भारतात सुरू असलेल्या अर्ध्याहून शिक्षणसंस्था या राजकारणी लोकांच्या नावावर आहेत.
आपल्या संस्थांचे ‘देणगी मूल्य’ (डोनेशन)आणि शिक्षण शुल्क हे लोक स्वतः ठरवतात आणि शिक्षणात सुद्धा भ्रष्टाचार आणतात. रशियात असं काही होत नाही. देणगी मूल्य हा प्रकार तिथे नाहीये, म्हणून तिथे डॉक्टरचं शिक्षण हे कमी पैशात होतं ही वस्तुस्थिती आहे.
३. प्रवेश परिक्षा
डॉक्टर होण्यासाठी इच्छुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा अर्धा वेळ आणि ऊर्जा ही सतत वेळापत्रक बदलणाऱ्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यात जात असतो. प्रवेश परीक्षा देणं आणि एमबीबीएसला प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षेत जास्तीत जास्त स्कोअर करणे हे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आव्हानात्मक असतं.
रशिया मध्ये डॉक्टर होण्यासाठी अशा कोणत्याही प्रवेश परीक्षेला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत नाही. ‘इच्छा त्याला प्रवेश’ या तत्वावर एमबीबीएसचा प्रवेश मिळत असल्याने रशियात जाऊन डॉक्टर होण्याकडे सध्याच्या विद्यार्थ्यांचा कल आहे. शिक्षणाचा किंवा डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोणताही दर्जा त्यामुळे घसरत नाही हे रशिया मधून उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांनी इतक्या वर्षात सिद्ध केलं आहे.
४. पदवीचा फरक
भारतातून डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस म्हणजेच ‘बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी’ ही पदवी मिळत असते. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी या डॉक्टरांना पुढे ‘एमडी’ म्हणजेच ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’चं ३ वर्षांचं अधिक शिक्षण घ्यावं लागतं.
रशिया मध्ये जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं तर तुम्हाला मिळणारी पहिली पदवी ही ‘एमडी’ ही असते. ही पदवी जगभरात सर्व देशात मान्य असते.
—
- मेडिकलच्या शिक्षणासाठी भारतीय रशियालाच का पसंती देतात?
- रशिया युक्रेन युद्धामुळे चिंतेत आहात? मुलाच्या मेडिकल शिक्षणासाठी या देशांचा विचार करा
—
५. प्रवेश प्रक्रिया
वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात खूप मोठ्या आणि किचकट प्रवेश प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. परीक्षा एका शहरात, मुलाखत दुसऱ्या शहरात, उशिरा लागणारा ऑनलाईन निकाल हा दरवर्षी विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवत असतो आणि मनःस्ताप वाढवत असतो.
या सर्व बाबींचा अभ्यास करून रशियाने त्यांची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे ज्यामुळे तिथे २०० पेक्षा अधिक देशातून लोक डॉक्टर होण्यासाठी दरवर्षी दाखल होत असतात.
६. डॉक्टर होण्यासाठी लागणारा कालावधी
भारतीय विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यासाठी साडे पाच वर्ष एमबीबीएस, मग १ वर्ष इंटर्नशिप आणि मग ३ वर्ष एमडी असा साडे नऊ वर्षांचा कालावधी द्यावा लागतो. रशिया मध्ये डॉक्टर (एमडी) होण्यासाठी हा कालावधी केवळ ५.८ वर्ष इतका आहे, म्हणजे भारतापेक्षा जवळपास ४ वर्ष कमी!
हे एक महत्वाचं कारण असावं ज्यामुळे भारतीय विद्यार्थी इतक्या मोठया संख्येने रशिया मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतात.
रशियातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांनी शिक्षण आणि रहाण्याची सोय त्याच परिसरात, अत्यल्प खर्चात केलेली असते. शिवाय, विविध शैक्षणिक कर्जाचे पर्याय उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना रशियात वैद्यकीय शिक्षण घेतांना कोणताही आर्थिक ताण देखील येत नाही.
भारत सरकारने वैद्यकीय शिक्षण पद्धतीत धोरणात्मक बदल केल्यास भारतात वैद्यकीय शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल नक्कीच जाऊ शकतो. गरज आहे ती अभ्यासाची आणि तीव्र इच्छाशक्तीची. येणाऱ्या काही वर्षात भारतात हे आवश्यक बदल घडावेत अशी इच्छा व्यक्त करूयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.