Site icon InMarathi

तिसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली? ही १० लक्षणं बरंच काही सांगून जातात…

war im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सध्या पूर्ण जग अस्वस्थ आहे. पुतीनने दाखवलेला आक्रमकपणा बघून नाटो संघटनातील सर्वच देश आता हतबल झाले आहेत. दर दिवशी वाढत जाणारा मृतांचा आकडा, रशियाचा निर्दयी हल्ला यांच्याबद्दल टीव्हीवर बघितलं की, हे युद्ध किती भयानक होत चाललंय याचा सध्या अंदाज येतोय. कोरोनाच्या संकटातून जग सावरत होतं. पण, त्याचवेळी हे युद्ध सुरू झालं आणि त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर पडायला सुरुवात झाली आहे.

 

 

जगभरात स्टीलचे सतत वाढणारे भाव, मालवाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणी हे सगळं बघितल्यावर हे केवळ दोन देशातील युद्ध नसून हे तिसरं जागतिक महायुद्ध आहे की काय ? ही शंका आल्यावाचून राहत नाही. सध्याची एकूणच जागतिक परिस्थिती पाहता कित्येक विश्लेषक हे सांगत आहेत की, तिसरं महायुद्ध हे सुरू होण्याच्या मार्गावर आहे. असं वक्तव्य करण्यामागे त्यांच्याकडे १० कारणं आहेत. कोणत्या आहेत त्या घटना ज्यामुळे विश्लेषकांना महायुद्धाची शक्यता वाटत आहे ? जाणून घेऊयात.

 

 

१. शक्ती केंद्र:

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे जागतिक शक्ती ही सध्या चीन आणि रशियाकडे सर्वाधिक प्रमाणात एकवटली आहे. चीन हा नेहमीच आतंकवादाचं समर्थन करत आला आहे. सीरिया मध्ये चीनने ‘बशर-अल-असाद’चं समर्थन करून आपल्या घातक विचारसरणीचं प्रदर्शन केलं आहे. तुर्कीस्तानमध्ये सुद्धा खुलेआम आतंकवादी कारवायांचं समर्थन होत असल्याचं दिसत आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी लोकांनी काय उच्छाद मांडला आहे ते आपण बघतच आहोत. अमेरिका जगासमोर जरी शांततेचं समर्थन करत असला तरीही त्यांची अर्थव्यवस्थेचा मोठा भाग हा युद्धसामुग्रीच्या विक्रीने तयार होतो हे जगजाहीर आहे. सीरिया आणि इराक या दोन देशांना केलेल्या आर्थिक मदतीमुळे ते कधीही युद्ध झालं तर चीनच्या बाजूने लढण्यास तयार असतील.

 

 

२. धार्मिक तेढ:

मुस्लिम समाजातील सुन्नी व शिया या दोन प्रमुख पंथातील लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवणे हे कित्येक वर्षांपासून होत आहे. शिया मुसलमानांना रशिया पाठबळ देत आला आहे, तर सुन्नी मुसल्मानांना अमेरिकेने आपला पाठींबा नेहमीच दिला आहे. इराण मध्ये शिया मुसल्मान एकत्र येत असतात तर सुन्नी मुसल्मान हे सौदी अरेबियाकडे मदतीसाठी धाव घेतात आणि तिथून अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांना मदत करून मतभेदाची आग नेहमीच धगधगत ठेवत असतात..

 

३. चीनचा दक्षिणी समुद्र:

चीनने नेहमीच मलेशिया, फिलिपिन्स सारख्या छोट्या देशांमध्ये समुद्रमार्गे व्यापार वाढवून आपली शक्ती वाढवली आहे. या भागांमध्ये असलेला गॅस आणि तेलाचा साठा यावर चीन कधीही आपला हक्क सांगू शकतो. चीनची शस्त्रांची शक्ती जर राजकीय शक्तिमध्ये परावर्तित झाली तर चीन अमेरिकेला टक्कर देऊ शकतो. अमेरिकेचे कित्येक विमान आणि ड्रोन हे नेहमीच चीनच्या समुद्रावर गस्त घालत असतात हे युद्धाची तयारी असू शकते.

south china morning post

४. आयसिस आणि आंतरराष्ट्रीय वाद:

जागतिक आतंकवादी संघटना आयसिस ही सतत आपली शक्ती, त्यांना पाठींबा देणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ करतांना दिसत आहे. आयसिस ही संघटना अशा माथेफिरू लोकांनी तयार केली आहे जे कधीही, कोणत्याही देशावर हल्ला करू शकते.

दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी ज्याप्रमाणे हिटलरचा नाझीवाद उफाळून आला होता जो की संपूर्ण मानवतेच्या विरोधात होता. तीच विचारधारा आयसिसची सुद्धा आहे आणि त्यांना मदत करणारे आणि विरोध करणारे असे दोन्ही प्रकारचे देश सध्या एकमेकांसोबत भांडत आहेत ज्याची परिणीती ही युद्धात कधीही होऊ शकते.

 

sabrangindia.in

५. आक्रमक नेतृत्व:

सध्या जगात रशियाचा पुतीन, कोरियाचा किम सारखे नेतृत्व उदयास आले आहेत. या नेत्यांना आपल्या देशाची प्रगती करायची आहे आणि त्यासाठी ते कोणतीही किंमत चुकवण्यासाठी ते तयार आहेत. ट्विटर सारखे पर्याय उपलब्ध असल्याने कोणत्याही क्षणी एका ट्विटमुळे देशांमधील मतभेद वाढत आहेत.

युक्रेनमधील क्रिमेआ शहरावर ताबा मिळवण्यासाठी रशियाने सध्या उचललेलं पाऊल हे बदलत्या मानसिकतेचं लक्षण आहे. याचप्रकारे चीनसुद्धा कित्येक वर्षांपासून तैवानकडे डोळे लावून बसला आहे. चीन जर रशियाप्रमाणेच आक्रमक झाला तर हे युद्ध सुद्धा होऊ शकतं ज्यामध्ये तैवानची परिस्थितीसुद्धा सध्याच्या युक्रेन सारखीच होऊ शकते.

 

the hankeyoreah

 

६. अरब देशांमधील अस्वस्थता:

जगभरात सध्या तेलाची मागणी कमी होत आहे त्यामुळे अरब देश हे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. नवीन नोकऱ्या न तयार होणे यामुळे तिथल्या लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शिवाय, ट्युनिशिया सारखे देश हे लोकशाहीची मागणी करत आहेत.

इजिप्तच्या लोकांचा कौल हा मिल्ट्री प्रशासनाकडे झुकतांना दिसत आहे. सीरिया, लिबिया सारख्या देशांना सुद्धा बदल हवा आहे. पण, त्यांना अजूनही दिशा सापडत नाहीये. या देशांमध्ये कधीही वादाची ठिणगी पडून त्याचं रूपांतर युद्धात होऊ शकतं. अफगाणिस्तानमध्ये जे नुकतंच घडलंय ते पाकिस्तानच्या वाबतीत कधीही घडू शकतं.

 

 

७. अकार्यक्षम जागतिक संघटना:

‘नाटो’ सारख्या संघटनेने युक्रेनची ऐनवेळी सोडलेली साथ हे आपण सध्या बघतच आहोत. युनायटेड नेशन्स (यूएन) ही एक अशी जागतिक संघटना आहे ज्याचे सर्व निर्णय हे चीन, रशिया आणि सौदी अरेबिया सारख्या देशांच्या हिताचे, मर्जीचे असतात. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर ती बदलण्यासाठी यूएन काहीच करू शकत नाही हे आता जगजाहीर आहे.

 

 

सध्या यूएन मध्ये सामील असलेला सौदी अरेबिया हा मुस्लिम समाजाचं नेतृत्व करतो, तर चीन आर्थिक पाठबळ देऊन यूएनचे निर्णय आपल्या हिताचे करून घेतो आणि रशिया आपला शस्त्रसाठा दाखवून नाटो, यूएन सारख्या सर्व जागतिक संघटनांना आपल्या खिशात घेऊन फिरत असतो. १९४० मध्ये अस्तित्वात असलेली ‘लीग ऑफ नेशन्स’ ही संघटना तेव्हा अशीच अकार्यक्षम होती ज्यामुळे महायुद्ध रोखणं शक्य झालं नव्हतं.

८. शस्त्रांचं मार्केट:

शस्त्रास्त्र बनवण्याचं अमेरिकेचं मार्केट हे दरवर्षी १ ट्रिलियन यूएस डॉलर्स इतक्या किमतीने वाढत आहे. देशाच्या संरक्षणाच्या नावाखाली तयार केली जाऊ लागलेली आणि विकत घेतली जाऊ लागलेली शस्त्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हे शस्त्र कालांतराने शस्त्र विक्रेत्यांना विकण्यासाठी दिले जातात. शस्त्र तयार करणाऱ्या कंपनी आणि त्याचे विक्रेते युद्धजन्य परिस्थिती निर्माण करतात असं विश्लेषकांचं मत आहे.

 

 

९. उत्तर कोरिया:

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील मतभेद हे स्थापनेपासूनच आहेत. २०१४ मध्ये उत्तर कोरियाने आपली शस्त्र शक्ती ही कित्येक पटीने वाढवली आहे. ५०० किलोमीटर क्षमता असलेल्या शस्त्राने त्यांनी एक आठवडा सलग दक्षिण कोरियावर हल्ला चढवला आणि आपलं शक्तीप्रदर्शन त्यांनी केलं.

उत्तर कोरिया हा देश तीन बाजूंनी जपान, चीन, दक्षिण कोरिया सारख्या देशांनी वेढलेला आहे. उत्तर कोरिया हे अणुचाचणी करण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तर कोरिया सारखे देश हे कधीच शस्त्रास्त्र संधीचा मान ठेवत नाहीत. त्यामुळे हा धोका कायमच असणार आहे.

 

country reports

 

 

१०. चीनचा दुटप्पीपणा:

२०१३ मध्ये चीन आणि युक्रेन यांच्यात एक करार झाला आहे ज्यामध्ये युक्रेनवर जर कोणत्या देशाने अणुबॉम्बचा हल्ला केला तर चीन त्यांची मदत करेल असं ठरवण्यात आलं आहे. पण, चीन या करारानुसार खरंच युक्रेनची मदत करेल का ? याबद्दल पूर्ण जग साशंक आहे.त्याचवेळी, चीनचा राष्ट्राध्यक्ष यानुकोविच हा नेहमीच रशियाची साथ देत असतो.

युक्रेनवर हल्ला करून रशियाने चीनसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतंच रशियाने चीनला २७० बिलियन इतक्या किमतीच्या तेलाचा पुरवठा केला आहे ज्याची पाईपलाईन ही युक्रेनमधून जात आहे. त्यामुळे चीन सध्याच्या युद्धात युक्रेनची साथ देणार नाही हे नक्की आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात असलेले मतभेद हे जगजाहीर आहेत. हे मतभेद लक्षात घेऊन चीन रशिया सोबत मैत्री वाढवतोय आणि अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी स्वतःला तयार करतोय.

 

 

“जगभरात सध्या युद्धाचे वारे वाहत आहेत” असं म्हंटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. वरीलपैकी एक जरी शक्यता जर खरी ठरली तर तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल हे नक्की. महायुद्ध म्हणजे मनुष्य, संपत्ती यांची प्रचंड मोठी हानी हे लक्षात या सर्व देशांनी आपल्या महत्वकांक्षांवर जर थोडा अंकुश लावला तर जग हे आधीसारखंच सुंदर असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version