Site icon InMarathi

एकीकडे युद्ध पेटलंय, तर दुसरीकडे रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांना डेटवर बोलवतायत

russian girl im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेची बातमी आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चा अवघ्या काही तासात बाजूला सारून नव्या चर्चांची सुरुवात करणारी एक आंतरराष्ट्रीय घटना घडली आहे. ती म्हणजे, अर्थातच रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरु असणारं युद्ध!

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेन विरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि युक्रेनने सुद्धा माघार न घेता, त्यांच्याविरुद्ध दंड थोपटण्याचा निर्णय घेतला. या युद्धाचे परिणाम तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ठरू शकतील का? अशाही चर्चांना एकीकडे उधाण आलेलं असताना, रशियन सैनिकांचं मात्र भलतंच काहीतरी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

ज्या युक्रेनविरुद्ध थेट युद्धाला सुरुवात झाली आहे, त्याच देशातील महिलांसह हे सैनिक डेटिंग करत आहेत. आहे की नाही मजेशीर आणि तोंडात बोट घालायला लावणारी गोष्ट? पण ही भानगड नेमकी आहे तरी काय, आणि नेमकं काय घडतंय हे आज जाणून घेऊया.

रशियन सैन्य थेट राजधानी पर्यंत पोचलंय, आणि…

पुतीन यांचा आक्रमक पवित्रा आणि ठाम निश्चय अगदी प्रत्येक क्षणाला दिसून येतोय. रशियन सैन्याने चहूबाजूंनी युक्रेनची कोंडी करायला सुरुवात केलेली आहे हे स्पष्ट आहे. थेट राजधानीपर्यंत रशियाचं सैन्य पोचलं असल्याचं म्हटलं जातंय. येत्या काही दिवसात रशिया युक्रेनवर ताबा मिळवेल, अशीही अटकळ काही जणांकडून बांधण्यात येत आहे.

 

 

युद्ध इतकं शिगेला पोचलेलं असताना, सैन्याने देशासाठी सर्वतोपरी आणि संपूर्ण समर्पणाने लढा देणं अपेक्षित असतं, असं म्हटलं तरी त्यात चुकीचं काहीच नाही. असं असताना, काही रशियन सैनिक मात्र ‘चल इष्क लडाए सनम’ अशा मूडमध्ये दिसतायत. बरं एवढंच नाही, तर प्रेमाच्या या गुजगोष्टी सुरु आहेत, त्या ज्या राष्ट्रावर हल्ला केला आहे, त्याच देशातील महिलेसह!

टिंडरवर संपर्क केल्याचा तरुणीचा दावा!

द सन या प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार, युक्रेनमधील एका तरुणीने एक अजब दावा केला आहे. युक्रेनमधील या महिलेचं असं म्हणणं आहे, की टिंडर या डेटिंग ऍपभरून तिला रशियन सैनिकांचे मेसेज येत आहेत. ही मंडळी तिच्याशी फ्लर्ट तर करत आहेत.

 

 

एवढंच नाही, तर तिच्यासमोर भेटीचा प्रस्ताव सुद्धा ठेवण्यात आला आहे. आंद्रे, अलेक्झांडर, मायकल, ग्रेगरी यांच्यासह जवळपास डझनभर सैनिकांनी स्वतःची प्रोफाईल्स अपडेट करून आकर्षक फोटो अपलोड केले असल्याचा दावा सुद्धा या महिलेने केलाय.

स्क्रीनशॉट दाखवून ही तरुणी म्हणतेय, की…

३३ वर्षांची Dasha Synelnikova हिने टिंडरवर रशियन सैनिकांनी संपर्क केल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही, तर याचा पुरावा म्हणून तिने काही स्क्रीनशॉट्स सुद्धा दाखवेल असल्याचं म्हटलं जातंय.

रशियन सैनिक राजधानी कीव पर्यंत पोचले असल्याचं कळताच, तिने स्वतःचं लोकेशन बदलून Kharkiv केलं. असं करूनही तिला रशियन सैनिकांचे मेसेज येतच राहिले. या सैनिकांनी चक्क आपले फोटदेखील पाठवल्याचा दावा या तरुणीने केला आहे.

 

 

“तुम्ही Kharkiv आहात का?”, असा प्रश्न तिने समोरच्या व्यक्तीला विचारल्यावर, “तिथे नसलो, तरी फार लांब नाही. फक्त ८० किलोमीटर लांब आहे.” अशा प्रकारची उत्तरं मिळत असल्याचं तिने म्हटलं आहे.
आंद्रे नावाच्या एका व्यक्तीला, “तुम्ही मला भेटू इच्छिता का?” असं विचारल्यावर, त्याने होकार तर दिला. मात्र युक्रेनने २०१४ साली रशियन लोकांचं योग्यप्रकारे स्वागत केलं नसल्याचा उल्लेख केला. ‘तो नेमकं काय करतो?’, या प्रश्नावरही त्याने सरळ उत्तर देण्याचं टाळलं.

अशा या थेट संपर्क करणाऱ्या व्यक्तींचे फोटो जणू स्त्रियांना आकर्षित करण्यासाठीच अपलोड केलेले आहेत. कुणी तंग बनियान घालून, तर कुणी चक्क पिस्तुलासह फोटो पाठवत तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणीने असंही म्हटलं आहे, की तिने या व्यक्तींच्या रिक्वेस्ट नाकारल्या आहेत. शत्रूशी मैत्री करण्याची चूक ती करणार नसल्याचं ती ठामपणे सांगते.

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीही घडू शकतं, असं म्हटलं तरी काहीही वावगं ठरू नये. एकीकडे युद्धाची रणधुमाळी सुरु असताना, दुसरीकडे रशियन सैनिकांनी चक्क शत्रूराष्ट्रातील तरुणींशी हे असं वागणं नक्की हास्यास्पद म्हणावं, संशयास्पद म्हणावं, की निव्वळ अय्याशी, हे मात्र ज्याचं त्याने ठरवावं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version