आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘३ इडियट्स’ हा सिनेमा येऊन दशकापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. पण काही काही चित्रपट कायमस्वरूपी आपल्या मनात घर करतात त्यातलाच हा एक चित्रपट! या चित्रपटाने एकेकाळी बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. अनेक पुरस्कारांची मोहोरही चित्रपटावर उमटली होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आमिर खानसकट करीना कपूर खान, बोमन इराणी, आर. माधवन, शर्मन जोशी, ओमी वैद्य या सगळ्या प्रमुख कलाकारांनी त्यांच्या भूमिका उत्कृष्ट वठवल्या होत्या. पण या चित्रपटात एक मराठमोळा चेहराही होता.
‘व्हायरस’ची म्हणजेच बोमन इराणींनी साकारलेल्या पात्राची दाढी करणारा त्यांचा पर्सनल असिस्टंट आठवतोय? ही भूमिका साकारणारी व्यक्ती म्हणजे राजेंद्र पटवर्धन हे मराठी अभिनेते. पण त्यानंतर फारश्या चित्रपटांमधून ते मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत.
काळ कधी कुणावर काय प्रसंग आणेल सांगता येत नाही. पॅन्डॅमिकनंतर तर ही अनिश्चितता आणखीनच वाढली आहे. राजेंद्र पटवर्धन हे सध्या फार अवघड काळातून जात आहेत. आपल्याला आलेलं अपंगत्त्व आणि आर्थिक चणचण अश्या दुहेरी कसोट्यांतून त्यांना जावं लागतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी मायबाप रसिकांकडे मदतीची मागणी केली आहे.
फेसबुकवरच्या ‘मराठी नाट्य कलाकार संघ’ या ग्रुप वर गेल्या आठ्वड्यापासून एक पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये राजेंद्र पटवर्धन हे आजाराने ग्रस्त असल्याचं सांगण्यात आलंय. त्यासोबत त्यांना नेमकं काय झालंय हेदेखील सांगण्यात आलंय. विशेष बाब अशी की या पोस्टद्वारे त्यांना आर्थिक मदतीची निकड असल्याचं आणि लोकांनी त्यांना जमेल तशी मदत करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
राजेंद्र पटवर्धन यांच्या वतीने त्या पोस्टमध्ये लिहिलंय, “मला काही बोलायचे आहे, सांगायचे आहे… मी एक साधा माणूस. व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटक केलेला पण मी सेलिब्रिटी नाही. मी एक नट, उत्तम संस्थेत काम केलेले आहे..उदा. विनय(सर) आपटे बाकी मी काही बोलणार नाही… कारण आज माझा दिवस नाही. याचे कारण आमचा एक मित्र राजू पटवर्धन (राजू पटवर्धन माझ्याबरोबर “अपराध मीच केला”, या नाटकात होते. असो! आता ते खूप आजारी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचा एक पाय मांडीपासून कापला गेला आहे. आता त्याचा उजवा हातदेखील निकामी झाला आहे. हा आता भरारी अपंगालयात आहे. तो एकटा, अविवाहित आहे. वय साठीच्यापेक्षा जास्त. मी व माझा मित्र प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, निर्माता अमोल भावे आम्ही त्याच्यासाठी पैसे गोळा करत आहोत.
हे अपंगालय म्हणजे भरारी अपंगालय… मानपाडा गाव, उंबरली रोड, साई धारा टॉवर्स, डोंबिवली पूर्व इथे आहे. गरज आहे ती आर्थिक मदतीची… आतापर्यंत मी, अमोल भावे, संध्या म्हात्रे, प्रसन्ना आठवले, दीपक परुळेकर, शेखर जोशी, संध्या दानव, काका हरदास व इतर अनेक मदत करत आहेतच आपणही करावी . फार नाही किमान शंभर, पाचशे, हजार जास्त नको!
राजू पटवर्धन यांनी शेवटची भूमिका हिंदी चित्रपट थ्री इडियट्स आणि मराठीमध्ये भिकारी आणि टपाल यात केली होती. ज्यांना कुणाला मदत करायची असेल त्यांनी मला कळवा. त्यांचे डिटेल्स मी त्यांना देईन. माझा नंबर ९८९२१२२२१४. खाली कमेंट्स मध्ये मी त्यांचा नंबर आणि बँक खात्याचे डिटेल्स देत आहे. गुगल पे नाही..”
मदत करण्यासाठी बँक खात्याचा तपशील
RAJANDRA MANOHAR PATWARDHAN
TJSB SAHAKARI BANK
A/C NO – 002110100016259
BRANCH – THANE ( WEST )
IFSC CODE – TJSB0000002
असं त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटलंय. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतेय.
एवढ्या मोठ्या चित्रपटाचा कधीकाळी भाग असलेल्या एका मराठी कलाकाराची पाय कापला जाण्याइतकी आणि हात निकामी होण्याइतकी भयानक अवस्था व्हावी आणि त्यात भरीस भर म्हणून स्वतःला सुस्थितीत आणण्यासाठी लोकांसमोर हात पसरायची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी आहे.
उपचारांसाठी आवश्यक असलेले पैसे शक्य तितक्या लवकर जमा व्हावेत आणि त्यांना बरं वाटावं इतकीच प्रार्थना!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.