Site icon InMarathi

चांदीवाल कमिशननंतर नवाब मलिक EDच्या जाळ्यात; दाऊदशी संबंध असल्याचे आरोप?

dawood im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सरकारच्या कामापेक्षा त्यातील नेते वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत राहिले, किरीट सोमय्या यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे हात धुवून लागले होते. दोघांच्या संपत्तीची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्या नंतर त्यांनी आपला मोर्चा इतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वळवला. शिवसेनेचे फायर ब्रिगेड संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस पाठवली होती, काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या माणसाला ईडीने ताब्यात घेतले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खवळलेल्या संजय राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आधीच भाजपचे साडे तीन लोक जेल मध्ये जाणार असे जाहीर केले होते मात्र पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ठोस नावे काही सांगितली नाहीत त्यामुळे विरोधकांनी यावर चांगलेच तोंडसुख घेतले. पत्रकार परिषदेत त्यांनी वारंवार किरीट सोमय्यांचा उल्लेख केला त्यांच्यावर सडकून टीका केली.

 

 

संजय राऊत आणि किरीट सोमय्या वाद सुरु असतानाच एकीकडे NCB चे अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले, त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. बार लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी वय लपवले असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

कोर्टाने त्यांना समन्स बजवाला असून त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले. समीर वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्याचे धिंडवडे काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या नवाब मालिकांवर आज सकाळीच ईडीने धाड टाकली. मनी लौंड्रीन्ग संदर्भात त्यांच्यावर आधीच कारवाई झाली होती मात्र यावेळी प्रकरण वेगळे आहे, काय आहे ते जाणून घेऊयात…

 

ईडीने कारवाई कशासाठी केली?

सूत्रांच्या माहितीनुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी म्हणजे बुधवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ च्या दरम्यान नवाब मलिक यांच्या राहत्या घरी धाड टाकली, घरी चौकशी केल्यांनतर पुढील चौकशीसाठी त्यांना ईडीच्या कार्यलयात नेण्यात आले.

 

 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई नवाब मलिक यांचे मुंबई अंडरवर्ल्डशी असलेले संबंध आणि मनी लौंड्रीन्ग संदर्भात केली गेली आहे.

दाऊदशी संबंधित व्यक्तींकडून व्यवहार?

दोन दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी असे दर्शवले होते की दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा घातपात करण्याची शक्यता आहे, मात्र यावर पुढे ठोस काही पाठपुरावा आला नाही. याच दाऊदचे आणि ९३ च्या हल्ल्यात त्याचे साथीदार असलेल्या एका व्यक्ती सोबत नवाब मलिक यांचे व्यावहारीक संबंध आहेत.

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप मागच्या वर्षी केले होते ते पुढे असेही म्हणाले होते की सलीम पटेल यांच्या नावे असलेली कुर्ल्यातील तीन एकर जमीन नवाब मलिक यांच्या कंपनीने विकत घेतली. ही कंपनी शाहवाली खान यांच्यामार्फत विकत घेण्यात आली होती. २००३ साली हा सौदा झाला होता तेव्हाही ते मंत्री होते, २०१९ साली त्यांनी या कंपनीतून राजीनामा दिला. नवाब मलिक आणि आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. ज्यातील चार अंडरवर्ल्डशी संबंधित आहेत.

इकबाल कासकरशी संबंध?

 

 

दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक करण्यात आली होती. ईडीने त्याच्या आणि त्याच्या साथीदारांवर मनी लौंड्रीन्ग संधर्भात केस दाखल करण्यात आली आहे, माध्यमांच्या माहितीनुसार इकबालने नवाब मलिकशी आपले संबंध असल्याचे सांगितले म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे असेही म्हटले जात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version