' नितीशकुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यामागचे KCR यांचे राजकीय गणित… – InMarathi

नितीशकुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यामागचे KCR यांचे राजकीय गणित…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच दोन दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत केवळ राजकीय गप्पा नव्हे दोन्ही राज्यांच्या विकासकामाबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राव यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चंद्रशेखर रावच नव्हे तर सिनेअभिनेते प्रकाश राज देखील या भेटीत सहभागी होते. त्यांना बघून अनेकांना आश्चर्यच धक्का बसला, २०२४ निवडणुकांसाठी तिसरी आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत का? अशी चर्चा आज समाजमाध्यमात आणि तज्ज्ञ लोकांमध्ये होताना दिसून येत आहे.

 

k chandra im

 

तिसऱ्या आघाडीची जरी चर्चा झाली असेल तरी ही भेट एका वेगळ्या कारणासाठी देखील झाली आहे असे बोलले जात आहे, नेमकं काय आहे ते कारण चला तर मग जाणून घेऊयात….

नेमकं काय आहे कारण :

सूत्रांच्या म्हणण्यानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नितीश कुमार यांना उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. तुम्हाला वाटेल चंद्रशेखर यांना नितीश कुमारांमध्ये एवढा इंटरेस्ट का? तर ममता दीदींचे चाणक्य प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यात एक गुप्त बैठक झाली आहे.

 

k chandra im 1

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी विरोधी पक्षातून एक प्रमुख दावेदार असावा म्हणून कदाचित प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांना निवडले असावे. येत्या काही दिवसात याबाबतची सत्यता आपल्यासमोर येईलच. तसेच रणनीतीकर प्रशांत किशोर यांना चंद्रशेखर यांनी आगामी निवडणुकांसाठी पाचारण केले आहे.

के चंद्रशेखर राव यांना फायदा काय?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात चंद्रशेखर राव यांचा राजकीय फायदा नक्की काय? तर चंद्रशेखर राव सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, तिकडच्या जनतेचा विश्वास त्यांनी संपादित केला आहे. कुठल्या ही राज्यातील नेत्याला साहजिकच दिल्लीची ओढ असतेच त्यामुळे असं बोललं जातंय की चंद्रशेखर यांना दिल्लीवारीची घाई लागली आहे, त्यांचे पुढेचे लक्ष हे दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान पटकवायचे आहे.

 

 

दिल्लीला जायची तयारी म्हणून त्यांनी तिसऱ्या आघाडीबाबत अनेक नेत्यांशी ते चर्चा करत आहेत, काही दिवसांपूर्वी त्यांनी ममता दीदींशी देखील फोनवर चर्चा केली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या बरोबरीने आपली तिसरी आघडी स्थापन करावी. तसेच कुठल्या ही भाजप किंवा काँग्रेसी चेहरा न आणता याव्यतिरिक्त चेहरा आणावा जेणेकरून काँग्रेस देखील नितीश कुमारांना पाठिंबा देईल.

 

nitish im 1

 

२०२४ साठी भाजप विरोधात नवा चेहरा :

गेली जवळजवळ ७ वर्ष विरोधी पक्षाला नरेंद्र मोदींच्या विरोधात एक सक्षम व्यक्ती उभा करता आला नाही मात्र २०२४ साठी चंद्रशेखरं राव चांगलेच तयारीला लागलेले आहेत. यासाठी त्यांच्या तिसऱ्या आघाडीसाठीची बैठका जोरात होताना दिसून येत आहेत. जर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासांठी हा प्रयोग यशस्वी ठरला तर २०२४ साठी त्यांचे केंद्रात जाण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

एकीकडे राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसची अवस्था बघता भाजपला टक्कर देण्यासाठी अशाच एखाद्या व्यक्तीची गरज आहे जी या दोन्ही पक्षांच्या व्यक्तीरित असेल.

 

modi teleprompter IM 2

 

चंद्रशेखर यांनी जरी तिसऱ्या आघाडीचे स्वप्न बघितले असले तरी ते कितपत शक्य आहे हा मुद्दा वेगळा कारण याआधी सुद्धा विरोधी पक्षातील अनेक मान्यवर नेत्यांची बैठक झाली होती. मात्र त्याचे परिणाम काही दिसले नाहीत. आज देशात अनेक छोटे मोठे राजकीय पक्ष त्यात अनेकांच्या विचारधारा, तसेच खुर्चीसाठी चेहरा कोण? यावरून नक्कीच खडाजंगी होणार.

नितीश कुमार जरी आज राष्ट्रपती पदासाठी जरी उत्सुक असले तरी तिसऱ्या आघडीमध्ये सामील होण्यासाठी कितपत होकार देतील हे काही दिवसात कळेलच कारण त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे तसेच सध्याच्या त्यांच्या सरकारला देखील भाजपने पाठिंबा दर्शवला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?