Site icon InMarathi

काश्मिरी पंडितांचं दाहक वास्तव दाखवण्याचं धाडस आजवर सिनेइंडस्ट्रीने का केलं नाही?

kashmiri pandits 2 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

नुकताच द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर असे दिग्गज कलाकार आपल्याला यात पाहायला मिळतील.

खरंतर बहुतेक कलाकारांपासून दिग्दर्शक ही राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत, पण तरी कोणत्याही बड्या मीडिया चॅनलवर या सिनेमाविषय वाच्यता होताना आपल्याला दिसणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

केवळ राजकीय मतभिन्नता आहे म्हणूनच विवेक अग्निहोत्री यांच्या ताशकंत फाइल्सप्रमाणे या सिनेमाकडेही फिल्म इंडस्ट्री आणि मीडिया दुर्लक्ष करतंय हे आपल्याला दिसतच आहे.

एवढंच नाही तर हा सिनेमा येतोय म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना जीवघेण्या धमक्या एवढ्या येऊ लागल्या की त्यांना त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद करावं लागलं, पण कुठेही याविषयी चर्चा किंवा डीबेट घडतान तुम्हाला दिसणार नाही.

 

 

संजय लीला भन्साळी यांना करणीसेनेने थोबाडीत मारल्यावर सगळी फिल्म इंडस्ट्री मीडिया इंडस्ट्री ज्यापद्धतीने त्यांच्या मागे उभी राहिली होती, तसाच पाठिंबा विवेक अग्निहोत्री यांना का मिळत नाही? असा सवाल सध्या सोशल मीडियावर विचारला जातोय.

नुकतंच विवेक अग्निहोत्री यांनी दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी स्पष्टीकरण देताना त्यांनी एकंदरच या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकत बॉलिवूड आणि राजकारण यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

खरंतर काश्मीरी पंडितांचा नरसंहार हा जगातल्या सर्वात मोठ्या नरसंहारापैकी एक आहे तरी याविषयी आपल्याच देशातल्या नागरिकांना फारशी माहिती नाही ही बाब अत्यंत निराशाजनक आहे, आणि तीच गोष्ट अत्यंत बेधडकपणे या सिनेमातून मांडायचा प्रामाणिक प्रयत्न विवेक यांनी केला आहे.

ज्यापद्धतीने ज्यू लोकांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची एक मानवी बाजू बाहेर आणली, कम्युनिस्ट लोकांच्या हाती त्यांनी आपल्या नरससंहाराचा narrative जाउच दिला नाही, त्यामुळे ज्यू लोकांच्या नरसंहारावर बेतलेल्या कोणत्याही सिनेमात तुम्हाला त्यांची मानवी बाजूच पाहायला मिळते.

काश्मीरच्या बाबतीत मात्र आपल्याला कधीच हे चित्र दिसलेलं नाही, आपल्या सिनेमात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात काश्मीरची पॉलिटिकल बाजूच जास्त मांडण्यात आली, तिथलं राजकारण आणि दोन देशांमधलं वैमनस्य इथपर्यंतच काश्मीरची गोष्ट सीमित होती.

 

 

त्याच काश्मीरची हळवी, मानवी बाजू कधीच आपल्या सिनेमातून समोर आली नाही, आज लाखो काश्मिरी पंडितांना तिथून पलायन करावं लागलं त्यांच्या व्यथा आजही आपल्यासमोर आल्या नाहीयेत.

या सिनेमाच्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री काश्मीरची हीच बाजू लोकांसमोर मांडणार आहेत हे स्पष्ट केलं आहे. खरंतर बॉलिवूडला फक्त लोकांना जे आवडतंय तेच देण्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे, पण बॉलिवूडच्या याच सिनेमांना बहुतांश प्रेक्षक नाकारायला लागला आहे हे बहुतेक त्यांना दिसत नाहीये, किंवा दिसूनही त्यांना ते बघितल्यासारखं करायचं आहे.

खरंतर बॉलिवूड किंवा खरंतर ही हिंदी फिल्म इंडस्ट्री ही काय आधीपासून अशीच नव्हती. आधीसुद्धा या चित्रपटसृष्टीवर डाव्या विचारसरणीचाच जास्त प्रभाव होता. मजरूह सुलतानपुरी, जावेद अख्तर पासून थेट एस.डी.बर्मनपर्यंत कित्येक कलाकार हे त्याच विचारसरणीचे होते.

 

 

त्यांनी मांडलेल्या कथेत, गाण्यात तुम्हाला भारताचं दर्शन व्हायचं, तेव्हाच्या कलाकृती या आपल्या संस्कृतीशी, मातीशी जोडलेल्या होत्या त्यामुळे त्या कलाकृतीतुन कधीच त्यांनी देश तोडायची भाषा केली नाही, किंवा आपल्या संस्कृतीला नावं ठेवली नाहीत.

हळू हळू जसं उदारीकरणाचं वारं २००० सालानंतर आपल्या देशात वाहू लागलं तेव्हापासून आपल्या सिनेमातूनसुद्धा देशातला कॉमन माणूस निघून गेला आणि हळू हळू वेस्टर्न कल्चरकडेच झुकणारे सगळे सिनेमे यायला लागले.

लोकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा नसल्याने त्यांनी अशाच सिनेमांना पाठिंबादेखील दिला, अर्थात यात लोकांची चूक तरी काय होती, उदारीकरणामुळे त्यांच्याही टेस्टमध्ये बराच बदल झाला आणि आज गेहराईयांसारख्या सिनेमाला आपण ‘हिंदी सिनेमा’ म्हणतो, खरंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीची हीच मोठी शोकांतिका आहे,

 

यामुळेच काश्मीर फाईल्ससारख्या सिनेमांना लोकं गर्दी करत नाही, कारण सिनेमातून त्यांना फक्त मनोरंजन हवंय, आपल्या इतिहासाशी, भूतकाळाशी, सत्यपरिस्थितिशी त्यांना काहीच देणं घेणं नाही.

आज आपल्या देशातच नाही तर साऱ्या जगात डावे आणि उजवे हा वाद चांगलाच पेटलेला असतो, पण नेहमीच उजव्या लोकांवर डावे नेहमीच कुरघोडी करतात यामागचं सर्वात मोठं कारण विवेक अग्निहोत्री यांनी या मुलाखतीत सांगितलं.

ते कारण म्हणजे डाव्या विचारसरणीची लोकं आपआपसात कधीच भांडत नाही, किंवा एकमेकांचे पाय खेचत नाहीत, शिवाय त्यांनी त्यांची ईकोसिस्टिम एवढी खोलवर रुजवली आहे की एकाला शांत केलं की दूसरी व्यक्ती लगेच तयारच असते पुढची लढाई लढायला, आणि इथेच उजव्या विचारसरणीची लोकं मार खातात.

ज्या आत्मविश्वासाने डावे त्यांची खोटी बाजूसुद्धा खरी असल्यासारखी मांडतात, तसा आत्मविश्वास उजव्या लोकांच्यात फार कमी आहेत, ज्या पद्धतीने left ecosystem वाढवली आहे तशी right ecosystem वाढायला आणि ती तेवढीच पॉवरफूल व्हायला बराच काळ जावा लागणार आहे हे अगदीच खरं आहे.

 

 

या सगळ्या गोष्टींवरून आपण अंदाज बांधू शकतो की फक्त सिनेमा ही माध्यम आपल्या देशातलं socio-political narrative कसं सेट करतं? सिनेमा हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करत आहेत, त्यापैकीच एक विवेक अग्निहोत्री हे दिग्दर्शक आहेत.

विवेक यांचे विचार किंवा त्यांचे सिनेमे बऱ्याच लोकांना पटत नसतीलही, पण केवळ राजकीय मतभेद आहेत म्हणून एखाद्या कलाकाराला अशा रीतीने डावलणं, त्याच्या सिनेमाकडे पाठ फिरवणं किंवा त्याची दखलदेखील न घेणं हे कितपत योग्य आहे?

सिनेमा कसा असेल काय असेल? कितपत योग्य गोष्टी त्यात दाखवल्या जातील ही नंतरची गोष्ट, पण काही सिनेमे किंवा कथा या अशा असतात ज्या लोकांपर्यंत पोहोचवणं भाग असतं, त्यापैकीच हा सिनेमा काश्मीर फाईल्स!

 

 

फिल्म इंडस्ट्रीने किंवा मीडिया इंडस्ट्रीने कितीही या सिनेमाला प्रोपगांडा सिनेमा म्हणून दुर्लक्षित केलं तरी हेदेखील एक सत्य आहे, आणि लोकं नक्कीच या सिनेमाला उचलून धरतील अशी आपण आशा करुयात!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version