' गडकरींनी उल्लेख केलेली हवेतील बस नेमकी चालणार तरी कशी? जाणून घ्या – InMarathi

गडकरींनी उल्लेख केलेली हवेतील बस नेमकी चालणार तरी कशी? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘जब वी मेट’मधला तो प्रसंग आठवतोय? गीतला भटिंडाला नेणारी आपली चुकलेली एक्स्प्रेस परत पकडायची होती आणि टॅक्सी ड्रॉयव्हर खूप हळूहळू टॅक्सी चालवत असताना तिची चिडचिड व्हायला लागली. अखेरीस आदित्यने गाडी जोरात चालवायला सुरुवात केल्यानंतर ते स्टेशनवर पोहोचले. इतकं होऊनही तिची एक्स्प्रेस सुटायची ती सुटलीच मात्र त्यानंतर एक रंजक प्रेमकथा आपल्यासमोर उलगडत गेली.

हा झाला चित्रपटाचा भाग. पण रोज प्रवास करताना आपलीही ‘गीत’ सारखीच गत होते ना! आपल्याला कामाच्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचवणारी आपली फास्ट ट्रेन, बस ठरलेली असते.

चुकूनजरी ती ट्रेन किंवा बस चुकली तर आपली चिडचिड होते. दिवसाची सुरूवातच अशी झाली तर कितीही नाही म्हटलं तरी त्याचा थोडाफार परिणाम पुढच्या दिवसावर होतोच.

 

train inmarathi

 

सुट्टीच्या दिवसांमध्येही हल्ली इतर दिवसांसारख्याच ट्रेन्स आणि बसेस खचाखच भरलेल्या असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांशी दोन हात करायचे असतील तर आता जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रोसारख्या वाहनाबरोबरच सायफाय चित्रपटांमध्ये दिसतात तशी हवेतून चालणारी वाहनंही काहीच वर्षांत आपल्याला बघायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकां’च्या धर्तीवर इतक्यातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रचार करण्यासाठी प्रयागराज मध्ये आले असताना प्रयागराज मध्ये आपण रस्त्याच्या वरून हवेतून चालणाऱ्या बसेसची सोय करू अशी त्यांनी घोषणा केली आहे. यावरून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केलं जातंय. पण हवेतून बस आणि इतर वाहनं चालवू शकेल असं तंत्रज्ञान खरंच अस्तित्त्वात आहे का? जाणून घेऊ.

 

nitin gadkari 1 inmarathi

 

‘गॅरास्कोपिक ट्रान्सपोर्ट’ नावाचं एक प्रगत तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाला पाठिंबा देणाऱ्या कंपनीचं म्हणणं आहे की वाढत्या लोकसंख्येमुळे साधारण २०५० पर्यंत हे तंत्रज्ञान वापरलेलं वाहन आमच्या रस्त्यांवर दिसेल.

इंटरनेटवर तुम्ही आजवर अनेक कल्पक व्हिडियोज पाहिले असतील. पण अशाच कल्पनांमधून मोठमोठाले शोध लागतात. रस्त्याच्या वरून हवेतून  धावणाऱ्या बसचा फोटो इंटरनेटवर आहे. या फोटोत असं दिसतं की बस मध्ये आल्यामुळे आपलं वाहन पुढे नेता येत नाहीये म्हणून बाकी वाहनांचे चालक बसचालकावर तावातावाने ओरडताना दिसत नाहीत.

 

garo im 1

 

बस जरी वर थांबली तरी खालून इतर वाहनं अगदी सहज जाऊ शकतात. जवळच्या जवळ प्रवास करणं अधिक सोयीचं व्हावं म्हणून ‘नेक्स्ट’ या इटालियन कंपनीने काचेच्या पेटीसारख्या दिसणाऱ्या वाहनाची निर्मिती केली आहे. लंडनमध्ये लावले गेलेले अर्बन रोपवेही सध्या चर्चेत आहेत. खरं म्हणजे, या रोपवेचा वापर तिथले लोक स्वतःच्या आनंदासाठी आणि पर्यटनासाठी करतात. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की नजीकच्या काळात जेव्हा लोकसंख्या बेसुमार वाढेल तेव्हा आपल्याला असे वेगवगेळे पर्याय वापरात आणावे लागतील.

जगभरात वेगवेगळ्या  ठिकाणी आता स्वयंचलित वाहनांना मान्यता मिळू लागली आहे. मसदर, अबू धाबी, लंडन हेथ्रो एअरपोर्ट अशांसारख्या ठिकाणी ‘ट्रान्सपोर्ट पॉड्स’ वापरले जातात. आपल्या टचस्क्रीनवरून आपल्याला जिथे पोहोचायचंय ते ठिकाण सिलेक्ट करणं आणि त्यानंतर सुखकर प्रवास करता येणं या पॉड्समुळे सहज शक्य झालं आहे.

गुगलसारखी मोठी कंपनीसुद्धा स्वयंचलित वाहनांच्या व्यवस्थेत लक्ष  घालत आहे. सध्या गुगल जवळपास 24 Lexus RX450h स्वयंचलित वाहनांची व्यवस्था पाहत आहे. या सगळ्या वाहनांचं मिळून पाच लाखांपेक्षाही जास्त मैलांचं अंतर पार करून झालंय.

 

lexus im

 

‘स्मार्ट कार’ विषयी तुम्ही ऐकलं असेलच. असं म्हटलं जातंय की भविष्यात वाहतुकीसाठी स्मार्ट कार हा एक महत्त्वाचा पर्याय असणार आहे. BMW i3 हे स्मार्ट कारचं उत्तम उदाहरण. एकदा चार्ज केल्यावर थेट ८० ते १०० मैलांचं अंतर पार करणं आणि एक्सलरेटरवर पाय ठेवल्यावर आपोआप थांबणं ही या स्मार्ट कारची खासियत.

इंधनाची आवश्यक्ता न लागणाऱ्या अशा कार्स भविष्यात निश्चितच उपयुक्त ठरतील. असंच एक वाहन म्हणजे ‘मॅगलेव ट्रेन्स’. या ट्रेन्स फक्त शांघाय आणि दक्षिण कोरियातच आहेत.

ताशी ३१० मैलांपेक्षाही जास्त वेगाने धावणाऱ्या या मॅगलेव ट्रेन्स ही सार्वजनिक वाहतुकीतली क्रांतीच म्हणावी लागेल. या ट्रेन्समुळे प्रदूषण आणि ट्रॅफिकची समस्या कमी व्हायला तिथे मदत झाली आहे. यात मुख्य समस्या अशी आहे की या ट्रेन्सच्या विकासासाठी येणारा खर्च खूप जास्त आहे. याआधी ज्या स्वयंचलित वाहनांचा उल्लेख झालाय त्यांच्याबाबतीतही अशा प्रकारची समस्या आहेच.

तंत्रज्ञान जरी कितीही प्रगत असलं तरी त्यालाही काही मर्यादा आहेत हेच यातून आपल्या लक्षात येतं. एलोन मस्कचं ‘हायपरलूप’ हे असंच एक वाहन. याद्वारे ताशी ६०० ते ८०० मैल इतकं अंतर कापता येतं.

 

garo im

भविष्यात लोकांकरता फायद्याचं ठरू शकेल असं आणखी एक वाहन म्हणजे ‘स्काय ट्रॅन’ मोनोरेल. ही मोनोरेल रस्त्यापासून २० फुटांवरून ताशी १५५ मैलांच्या वेगाने धावते. यामुळे २ तासांचा प्रवास अवघ्या १० मिनिटांत होतो.

जिथे जिथे या मोनोरेल्स आहेत तिथे लोकांना स्काय ट्रॅन ऍप डाउनलोड करून, त्यावरून हव्या त्या स्टेशनवर जाऊन, आपल्याला जिथे पोहोचायचंय ते ठिकाण तिथे टाकून या मोनोरेल्सद्वारे प्रवास करणं शक्य आहे.

गडकरीसाहेब खरंच अशा बसेसची सोय प्रयागराज मध्ये करतील की नाही हे येणारा काळच ठरवेल. पण पुढल्या काळात अशी जी नवी वाहनं आपल्यासाठी उपलब्ध केली जातील त्यामुळे काही नव्या समस्या निर्माण व्हायला नकोत. ती वाहनं प्रदूषण कमी करणारी असावीत आणि त्यातून प्रवास करणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असावं एवढीच अपेक्षा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?