Site icon InMarathi

“मेहमूदने माझं करियर घडवलं आणि बिघडवलंही”: अरुणा इराणीने केला खुलासा!

mehmood aruna iraani IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात. त्यातले काही जण आपल्याला तारणारे, आपलं भलं करणारे तर इतर काही आपल्याला मागे खेचणारे, आपलं नुकसान करणारे असतात. आपल्याला भेटलेली व्यक्ती नेमकी यातल्या कुठल्या प्रकारात मोडणारी आहे याचं आपल्याला वेळीच भान येणं गरजेचं असतं.

केवळ आपल्यासारख्या सर्वसामन्यांच्याच बाबतीत नाही तर मोठमोठ्या सेलिब्रिटीजच्या बाबतीतही हे घडतं. किंबहुना, त्यांच्या आयुष्यात आपल्यापेक्षा अधिक चढउतार असतात असं बऱ्याचदा पाहायला मिळतं. पण काही काही योगायोग निराळेच असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखाद्या व्यक्तीमुळे तुमचं भाग्य उजळलंय आणि तीच व्यक्ती काही काळाने तुमच्या अधोगतीला कारणीभूत ठरली आहे असं कधी तुमच्या आयुष्यात घडलंय?

असं घडण्याची शक्यता कमी आहे पण हीच गोष्ट दिग्गज अभिनेत्री अरुणा इराणींच्या बाबतीत घडली होती. अरुणा इराणी यांनी आजवरच्या त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक हिंदी, मराठी, कानडी, गुजराती चित्रपटांमध्ये काम केलंय.

 

 

बेटा, हमजोली, संजोग यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या होत्या. ‘दिलबर दिलसे प्यारे’, ‘चढती जवानी’ यांसारख्या गाण्यांवरच्या त्यांच्या अफलातून अदाकारींतून त्यांनी लोकांना घायाळ केलं होतं. वेगवेगळ्या टीव्ही शोज मधूनही त्या आपल्याला आजवर दिसल्या आहेत.

आपल्या करियरमध्ये एक अवघड वळण आलं होतं आणि त्याला एक अभिनेता जबाबदार होता असं त्यांनी गंमतीजमतीत म्हटलंय.

अरुणा इराणी आणि मेहमूद अली ही ७०च्या दशकातली हिट जोडी होती. पण याचा परिणाम असा झाला की त्यांचं प्रत्यक्ष आयुष्यातही खरंच लग्न झालंय असा गैरसमज अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. त्यामुळे दोन-अडीच वर्षं त्यांना चित्रपट मिळाला नव्हता.

 

 

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्या म्हणाल्या, “लोकांचा कुठेतरी असा गैरसमज झाला होता की मी मेहमूदशी लग्न केलंय. लोकांना त्यावर स्पष्टीकरण द्यायचा मीही स्वतःहून प्रयत्न केला नाही आणि ‘कारवान’ आणि ‘बॉंबे टू गोवा’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही तब्बल दोन-अडीच वर्षे मला काहीच काम मिळालं नाही.”

त्यानंतर राज कपूर यांनी १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटात त्यांना काम दिलं आणि अशा प्रकारे त्यांचं करियर पुन्हा मार्गावर आलं. “मेहमूदनेच माझं करियर घडवलं आणि बिघडवलंही.”, असं त्या विनोदाने म्हणाल्या.

त्याचबरोबर मेहमूदसोबत काम करणं हा छान अनुभव होता असंही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “काय अभिनेते होते ते! त्यांनी मला अभिनयाविषयी, विनोदांच्या पंचेसविषयी आणि टायमिंग्जसविषयी खूप काही शिकवलं. त्यांच्यासोबत काम करताना नेहमीच पुष्कळ मदत व्हायची.”

 

 

आपण इंडस्ट्रीत आल्यानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमधल्या आठवणींना उजाळा देताना त्या या इंडस्ट्रीने आपल्याला अगदी मनापासून सामावून घेतलं असं त्या सांगतात. इंडस्ट्रीने आपल्याला ज्या उत्तम संधी दिल्या त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “माझ्यासारख्या अशिक्षित लोकांना चित्रपटसृष्टीच आधार देऊ शकते. मी फक्त ६वी पास झाले होते आणि मला वाटतं की चित्रपसृष्टीमुळेच आमच्यासारख्या लोकांना काम करायची संधी मिळते जी अन्य कुठे मिळत नाही.”

पुढे त्या हसत म्हणाल्या, “मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त लोकांनाच माझ्या करियरबद्दल माहितीये.” चित्रपटसृष्टीतलया त्यांच्या यशाचा प्रवास साधासरळ नव्हता.

अरुणा इराणी या त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होत्या. अनेक टक्केटोणपे खाल्यानंतर, नकार पचवल्यानंतर, बरेच त्याग केल्यानंतर त्यांनी या इंडस्ट्रीत नाव कमावलंय.

 

 

एकदा करियरला उतरती कळा लागली की त्यातून सावरून पुन्हा मार्गावर येणं भल्याभल्यांना अवघड जातं.

अपयश आल्यामुळे खचून न जाता आणि त्यातून नैराश्य आलंच तर त्यावर मात करून परत वर यायला मेहनतीसोबतच नशिबाचीही साथ मिळणं गरजेचं असतं. सुदैवाने अरुणाजींच्या बाबतीतला हा अवघड काळ लवकर संपला आणि त्यांच्या कामातून त्यानंतरही आपलं मनोरंजन होत राहिलं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version