आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काही चित्रपट हसवतात, काही ढसढसून रडवतात तर काही सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे आशयघन चित्रपट विचार करायला भाग पडतात. मात्र प्रेक्षकांना हा तिन्ही अनुभव एकत्र देणारा चित्रपट ‘सुपरहिट’ ठरतो. असाच एक चित्रपट म्हणजे थ्री इडियट्स!
तीन अवली मित्र तीन तास पडद्यावर धमाल करताना आपल्यालवा जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देऊन जातात. हाच अनुभव प्रत्येकाला आल्याने आज १३ वर्षांनंतरही हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला जातो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आयुष्यात यशस्वी कसं व्हावं? यशाच्या मागे न पळता ज्ञान मिळवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत? मैत्रीपुढे जगात दुसरं काहीही नाही असे बच्चन देत आयुष्यात ‘लॉजिक’ शिकवणाऱ्या या चित्रपटात मात्र काही ठिकाणी लॉजिकचा पत्ताच नाही. इतरांना लॉजिक शिकवण्याच्या नादात दिग्दर्शक काही ठिकाणी मात्र स्वतः लॉजिक विसरला आहे.
विश्वास बसत नाहीये? मग अनेकदा चित्रपट पाहूनही तुम्हाला या ५ चूका दिसल्याच नाहीत.
१. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यात अनेक वर्ष हरवलेल्या जिगदी दोस्ताला शोधण्यासाठी फरहान आणि राजू इंजिनिअरिंग कॉलेजच्या गच्चीवर पोहोचतात तो सीन आठवतोय का?
तब्बल दहा वर्षांनी चतुर त्यांना भेटतो आणि आपल्या महागड्या आयुष्याचा बडेजाव करत amsung Omnia SCH i910 फोनमध्ये ५ सप्टेंबर ही तारीख दाखवतो.
इंटरनेटवरील माहितीनुसार हा फोन २००८ साली लॉन्च झाला. याचाच अर्थ हे तिघे किमान ५ सप्टेंबर २००९ साली भेटले असावेत म्हणजेच या दृष्यातील उल्लेखानुसार दहा वर्षांपुर्वी घडलेला इतिहास म्हणजे चित्रपटातील बहुतांश सर्व दृश्ये ही १९९९ च्या आसपासची असावीत.
मात्र एकंदरित चित्रपटात कुठेही तो काळ १९९९ चा असावा याचे धागेदोरे सापडत नाहीत. खरं वाटत नाहीये? मग जरा डोकं लढवा आणि चित्रपटातील या काही सीन्सवर एक नजर टाका.
२. चित्रपटाचा शेवटचा आणि सर्वाधिक हिट जालेला सीन म्हणजे अभिनेत्री मोना सिंग हिची डिलिव्हरी! पुराचा धोका वाढत असताना डॉक्टरांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने इंजिनिअरिंगचे हुश्शार विद्यार्थी चक्क ही डिलिव्हरी यशस्वीरित्या करून दाखवतात ही बाब पडद्यावर पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात, कधी पोटात गोळा येतो, मात्र या सीनला लॉजिकची फुटपट्टी लावायची म्हटली तर यातील मोठी चूक लक्षात येते.
डॉक्टर असलेली करीना रॅन्चो अर्थात आमीरला व्हिडिओ कॉलव्दारे डिलीव्हरी करण्याचे मार्गदर्शन करते. मात्र चित्रपटात दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे हा जर १९९९ चा काळ असेल तर मग या काळात युट्यूब, इंटरनेट, व्हिडिओ कॉल या सेवा होत्या हा नवा जावईशोध कुणी लावला? विशेष म्हणजे या सेवा केवळ आमीरलाच कशा सापडल्या. त्या काळी सामान्य लोक भारतात मात्र इंटरनेटसारख्या सुविधांसारख्या सेवांच्या प्रतिक्षेकडे डोळे लावून बसले होते.
३. चित्रपटातील आणखी एक हास्यास्पद चूक म्हणजे रंछोडदास चांचडच्या घरी लाडक्या मित्राच्या शोधात फरहान आणि राजू जातात. आणि खऱ्याखुऱ्या रॅन्चोने आमीरची माहिती द्यावी यासाठी प्रयत्न करतात, तेंव्हा अस्थीकलश कमोडमध्ये टाकण्याचेही धाडस करतात. सीनमध्ये रॅन्चोला घाबरवण्याच्या नादात अस्थिकलशाचे झाकण कमोडमध्ये पडल्याचे स्पष्ट होते.
असं असताना त्यानंतरच्या अवघ्या काही मिनिटात रॅन्चोच्या हाती तोच कलश येतो, मात्र त्यावेळी त्याचे झाकण कलशावरच असते. हा अजब प्रकार नेमका कसा घडला? कमोडमध्ये पडलेले झाकण रॅन्चोने कसे उचलले? हा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही.
४. चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या एरपोर्टमध्ये ते दिल्ली विमानतळ असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात हा सीन बेंगलोर विमानतळावर शुट करण्यात आला होता. चित्रपट पाहताना ही बाब लक्षात आली नसली तरी त्यानंतर मात्र या चुकांवर बोट ठेवण्यात आले.
५. आणखी एक चूक म्हणजे चित्रपटात प्रिया अर्थात करिनाच्या लग्नप्रसंगात सुहासला कोंडून ठेवण्यात आलेले असते, मात्र ऐनवेळी तो हॉलच्या बाहेरील प्रवेशव्दारातून आत कसा येतो? ही जादू नेमकी कशी घडली?
एकंदरित प्रत्येक ब़ॉलिवूड चित्रपटात काही ना काही त्रुटी राहतात, त्यानुसार थ्री इडियट्समध्येही काही चुका झाल्या, तरिही थोरामोठ्यांपासून सगळ्यांनाच भावलेला हा चित्रपट एक उत्तम कलाकृती आहे हे मान्य करायलाच हवं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.