आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचा पहिला टिझर रिलीज झाल्यापासूनच लोकांच्या मनात चित्रपटाविषयी आणि आलिया भट्टच्या अभिनयाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. यात अजय देवगणचा कॅमियोदेखील आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाल्यापासून कधी एकदा हा चित्रपट थेटरला जाऊन बघू असं प्रेक्षकांना झालंय. मात्र प्रदर्शनाच्या मार्गावर असताना आणि ‘बर्लिन’मध्ये या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची जोरात तयारी सुरू असताना हा चित्रपट एका नव्या वादात सापडलाय.
चित्रपटाचा ट्रेलर पाहून गंगुबाईंच्या कुटुंबियांना धक्का बसला असून चित्रपटात गंगुबाईंसारख्या इतकं मोठं सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला वेश्या म्हणून दाखवून त्यांची बदनामी केली गेलीये असा दावा त्यांनी केलाय. ‘हुसैन झैदी’ या लेखकाच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली जावी असं गंगुबाईंच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं असून यासंदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी आणि पुस्तकाचे लेखक हुसैन झैदी यांना याचिका पाठवण्यात आली आहे आणि त्यांच्यावर मानहानीचा आरोप लावला गेला आहे. या दोन्ही याचिकांमध्ये आलिया भट्टचाही उल्लेख केला गेला आहे. या याचिकांवर अद्याप दोघांचेही काही उत्तर आलेले नाही.
‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना गंगुबाईंच्या दत्तक मुलांच्या वतीने वकील नरेंद्र दुबे म्हणाले, “कुणालाही आपल्या आईचं वेश्या म्हणून केलेलं चित्रण पाहायला आवडणार नाही. अगदी वेश्येच्या मुलालादेखील नाही. केवळ पैशासाठी एका व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. प्रश्न आईचा किंवा मुलाचा नसून प्रत्येक स्त्रीला आदर आणि सन्मान देण्याचा आहे.
कुठल्याही स्त्रीला आपलं असं अश्लील चित्रण झालेलं आवडणार नाही. जरी आपण हुसैन झैदी यांनी पुस्तकात काय लिहिलंय यावर विश्वास ठेवला तरी गंगुबाईंना कधीही वेश्या व्हायचं नव्हतं असं त्यांनी म्हटल्याचं आपल्या लक्षात येतं. मग त्या स्त्रीचं वेश्या म्हणून केलेलं चित्रण त्या स्त्रीला चालेल का? त्या एक समाजसेविका होत्या आणि त्या काळात कामाठीपुरातला एक महत्त्वाचा चेहरा होत्या. त्यामुळे निवडणुका असायच्या तेव्हा मोरारजी देसाई, जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या घरी जायचे असं त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांगितलंय. वेश्यांच्या हक्कांसाठी त्या लढल्या.”
—
मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा…
खुद्द हाजी मस्तानदेखील ज्याला मानायचा तो करीम लाला नेमका होता कोण?
—
यापूर्वी २०२१ मध्येही गंगुबाईंचा दत्तक मुलगा बाबूरावजी शाह यांनी चित्रपटासंदर्भात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि निर्मात्यांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली.
यासंदर्भात बोलताना गंगुबाईंचा दत्तक मुलगा बाबुराव यांनी आपली आई समाजसेविका होती असा दावा करत चित्रपटाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “माझ्या आईला त्यांनी वेश्या म्हणून दाखवलंय आणि लोक आता तिच्याबद्दल काहीही बोलत आहेत. मला हे अजिबात आवडत नाहीये.”
‘आज तक’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गंगुबाईंच्या कुटुंबियांचे वकील वकील नरेंद्र दुबे म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून गंगुबाईंच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. ते म्हणाले की ज्या प्रकारे गंगुबाईंना दाखवण्यात आलंय ते अत्यंत चुकीचं आणि अश्लील आहे. त्यांना व्हॅम्प आणि लेडी डॉन बनवण्यात आलं आहे.
दुसरा मुद्दा असा आहे की आपली व्यवस्था अशी आहे की इथे घराची अब्रू चव्हाट्यावर आली तर अब्रू वाचवण्याऐवजी आपल्याकडे तू स्वतःला जिचा मुलगा म्हणवतोस तिचाच मुलगा आहेस हे सिद्ध कर असं सांगितलं जातं. उच्च न्यायालयाने गंगुबाईंच्या दत्तक मुलांचे पुरावे मागितले. आम्ही सगळे पुरावे सादर केल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात अजूनही हे प्रकरण खोळंबलेलं आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आधी यासंदर्भात सुनावणी होईल अशी आम्ही आशा करतोय.”
आपल्या आईवर पुस्तक लिहिलं गेलंय हे गंगुबाईंच्या मुलांना माहीत नव्हतं असं समजतंय. २०२० मध्ये जेव्हा त्यांनी चित्रपटातल्या प्रोमोसोबत आपल्या आईचा फोटो पाहिला तेव्हा ही संपूर्ण गोष्ट त्यांच्या लक्षात आली. वकिलांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांच्या मते जेव्हापासून गंगुबाईंवर चित्रपट येतोय हे त्यांच्या नातेवाईकांना कळलंय तेव्हापासून त्यांना नातेवाईकांच्या वेड्यावाकड्या प्रश्नांना, टोमण्यांना सामोरं जावं लागतंय. त्यांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय.” गंगुबाईंनी बाबुराव, बेबी, शकुंतला आणि राजन अशी चार मुलं दत्तक घेतली होती.
कितीही तगडी स्टारकास्ट असली तरी या सगळ्या वादामुळे ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काय घडतंय ते पाहत राहणं हेच केवळ प्रेक्षक म्हणून आपल्या हातात आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.