Site icon InMarathi

राऊतांची पत्रकार परिषद ज्याच्या नावाने गाजली तो मोहित कंबोज आहे तरी कोण?

mohit sanjay im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जेव्हापासून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेचे बिगूल वाजवले तेव्हापासून भाजपते ते ‘साडेतीन’ कोण? हा प्रश्न समस्त महाराष्ट्राला पडला होता. अखेर काल ती पत्रकार परिषद पार पडली. त्यामध्ये विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर राऊतांनी तोंडसुख घेत आरोपांचा पाढा वाचला.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

यातील फडणवीस आणि सोमय्या यांच्यावरील शिवसेनेने केलेले आरोप अपेक्षित असले तरी मोहित कंबोज नेमका कोण? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.

मोहित कंबोज हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे फ्रंटमॅन आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना बुडीत काढेल असा अवलिया नक्की आहे तरी कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्यन खान प्रकरण आणि मोहित कंबोज

मागील वर्षी सुरु झालेले आर्यन खान ड्र्ग्स केस प्रकरण आठवत असेलच, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाव मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या फैरीही आपण अजूनही विसरू शकलेलो नाही, त्याच दरम्यान मलिकांच्या तोंडी आणखी एक नाव होते, ते म्हणजे मोहित कंबोज!

”आर्यन खान हे प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे” असा दावा नवाब मलिक यांनी केला असून या प्रकरणाचा सूत्रधार मोहित कंबोज आहे असा आरोपही त्यांनी केला होता. मात्र मोहित यांनी हे आरोप फेटाळून लावत मलिकांचा मित्र सुनिल पाटील हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले होते.

 

 

तेव्हापासून चर्चेत आलेल्या या नावाला अजूनही प्रसिद्धी मिळतीय.

कोण आहे मोहित कंबोज?

मोहित कंबोज यांचा जन्म ३० एप्रिल १९८४ रोजी झाला. ते व्यावसायिक असून केबीजे नावाची त्यांची खासगी कंपनी आहे.

सप्टेंबर २०१३ मध्ये राजकारणात प्रवेश करत त्यांनी भाजपचा आधार घेतला. त्यानंतर मुंबई भाजपचे माजी सचिव आणि माजी उपाध्यक्ष ही पदेही त्यांनी सांभाळली. तसंच ते भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष होते.

 

 

तब्बल ४ वर्ष त्यांनी मुंबईच्या भाजप युवा मोर्चाचे नेतृत्व केले.

 

 

२०१४ साली ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्यांचा पराभव केला.

मात्र ते खरे प्रकाशझोतात आले ते आर्यन खान ड्र्ग्स प्रकरणानंतर! ”मोहित कंबोजच्या मेहुण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला. अपहरण करून २५ कोटी रुपये मागण्याचा खेळ सुरू झाला. १८ कोटी रुपयांची डील झाली. ५० लाख रुपये घेण्यात आले. परंतु एका सेल्फीने डाव फसला” असे विधान मलिक यांनी केले होते.

मोहित आणि समीर वानखेडे यांच्यातील मैत्रीमुळे हे शक्य झाले असते असेही मलिक यांनी म्हटले होते.

मात्र हे सगळे आरोप झटकून मलिकांच्याच कुटुंबियांचा या प्रकरणात सहभाग असल्याला पलटवार केला होता.

कंबोज की भारतीय?

जानेवारी २०१९ मध्ये मोहित कंबोज यांनी आपलं आडनाव बदलून ‘भारतीय’ करत आहोत अशी घोषणा केली. तेव्हा ते भाजप युवामोर्चाचे अध्यक्ष होते. एवढचं नव्हे तर याप्रमाणे अनेकांना भारतीय ही ओळख मिळावी यासाठी त्यांनी ‘प्राऊड इंडियन’नावाची संस्थाही सुरु केली.

बेनामी मालमत्ता प्रकरणातही मोहित यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

मोहित हे ११०० कोटी रुपयांच्या एका प्रकरणात आरोपी असल्याचा दावा नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला होता. तसंच मोहित कंबोज यांची मुंबईत अनेक हॉटेल्स असल्याचंही ते म्हणाले होते.

 

पत्रा चाळीची जमिन कंबोज यांनी खरेदी केली असून याठिकाणी कंबोज यांचा प्रकल्प उभा राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या गैरव्यवहारामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही नुकसान होईल असे भाकीतही त्यांनी केले आहे.

त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोहित यांच्यामुळे आणखी नवे वादंग उभे राहणार का? हा प्रश्न विचारला जातोय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version