पत्रकार परिषदेत निशाण्यावर आलेला नील सोमय्या याआधीही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेल्या शुक्रवारपासून संपूर्ण महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष एकाच गोष्टीकडे लक्ष लावूं बसला होता ती गोष्ट म्हणजे संजय राऊत यांच्या पत्रक्रपरिषदेची, गेल्या वर्षभरापासून ईडीची पीडा संजय राऊत यांच्या पाठीमागे लागली आहे. केंद्र सरकार आणि त्यांच्या हाताखाली काम करता असलेल्या ईडीसारख्या संस्था, नाहक आम्हाला त्रास देत आहेत असा आरोप त्यांनी केला होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आज एकदाची ती पत्रकार परिषद पार पडली, शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेला हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. भाजपचे साडे तीन लोक जेलमध्ये जाणार अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिली होती मात्र प्रत्यक्षात असे काही झाले नाही, पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केवळ आणि केवळ किरीट सोमय्यांचा उद्धार केला असून, त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले होते.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या मुलाचा देखील उल्लेख केला, किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या नावे एक कंपनी आहे ज्यात घोटाळे झाले आहेत, त्यावरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केले. मात्र याआधी सुद्धा किरीट सोमय्या यांचा मुलगा खंडणी प्रकरणात अडकला होता, नेमकं काय होत प्रकरण चला तर मग जाणून घेऊयात…
नेमकं काय प्रकरण होते?
महविकास आघाडी सरकार आल्यापासूनच किरीट सोमय्या हे आघाडीमधल्या काही नेत्यांच्या मागे हात धुवून लागले होते, मग ते संजय राऊत असो किंवा अनिल परब असो, त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती काढून ती जनतेपुढे आणण्याचे काम ते करत होते. अशातच मागच्या वर्षी किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या याला मुलुंड पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. खंडणीप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती.
खंडणी प्रकरणाची केस जानेवारी २०२०मधील आहे, जेव्हा एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने आपल्या दोन मोठ्या टॉवरचे काम एका कंत्राटदाराला दिले. नील सोमय्या आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या कंत्राटदाराला धमकावले आणि ते काम आपल्या माणसाला मिळाले पाहिजे अशी धमकी दिली. तसेच त्या कंत्राटदाराने दुसऱ्या कामात मिळालेला नफा देखील द्यावा अशी मागणी नील यांच्याकडून करण्यात आली होती.
या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती, १ वर्षानंतर म्हणजे २०२१ साली मुलुंड पोलिसांनी निल यांना चौकशीसाठी बोलावले होते, तब्बल तीन तासांच्या चौकशीनंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती. निल सोमय्या भाजपचे नगरसेवक आहेत.
–
–
आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निल सोमय्या यांचा उल्लेख केल्याने ते आता एका नव्या वादात सापडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. किरीट सोमय्या जसे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे लागले होते तसे आता त्यांच्या मुलाच्या मागे कोण लागणार? हे काही दिवसात कळलेच…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.