Site icon InMarathi

कर्तृत्ववान, फटकळ, कोट्याधीश अश्नीरची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी की…

ashneer featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तसे तर टीव्हीवर अनेक शो आणि मालिका प्रसारित केल्या जातात, यातील अनेक मालिका तर कधी सुरु होतात आणि कधी संपतात हे पण आपल्याला आठवत नाही. मात्र, काही मालिका अशा असतात की त्या प्रेक्षकांमध्ये येताच लोकप्रिय होतात.

आजकाल असाच एक शो लोकांमध्ये लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे. या शो चे नाव ‘शार्क टँक इंडिया’ असून, हा शो ‘बदलते इंडिया की नई सोच’ या टॅगलाइनवर आधारित आहे. तसेच हा रियलिटी शो अमेरिकन रिअॅलिटी शोवरून प्रेरित आहे.

 

 

या शोने टीआरपीची घोडदौड आणखीनचं रंजक बनवली आहे, तसेच हा शो बघणाऱ्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या शो मध्ये काम करणारे सगळे जज करोडपती असून, प्रत्येक जजचे स्वतःचे एक स्टार्टअप आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे जज शो दरम्यान नवउद्योजकांना स्टार्टअप सुरु करण्यासाठी करोडो रुपये देतात. या जजांनी नवीन स्टार्टअप्स मध्ये भरपूर पैसे मुक्तपणे गुंतवले आहेत आणि यामुळे यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.

परंतु हा शो सध्या एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या शोचे जज अश्नीर ग्रोव्हर यांनी गेल्या महिन्यात कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती आणि सध्या या शिवीगाळची ऑडियो क्लिप जोरदार वायरल होत आहे. परंतु अश्नीरने हे आरोप फेटाळले आहे आणि पुढे त्याने सांगितले की जर गुंतवणूकदारांनी ४,००० कोटी रुपये दिले तर तो भारतपे कंपनी सोडेल.

 

 

गेल्या महिन्यात जेव्हा ही ऑडिओ टेप रिलीज झाली होती, तेव्हा अश्नीरने ट्वीट केले होते ज्यात त्याने याला “फंडाची उधळपट्टी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही घोटाळेबाजांकडून बनावट ऑडिओ” असे म्हटले होते. नंतर त्यांने हे ट्विट डिलीट केले होते.

कोटक महिंद्रा बँक आता अश्नीरवर त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी वापरलेल्या “अयोग्य भाषेबद्दल” कायदेशीर कारवाई करणार आहे. एका मुलाखतीत अश्नीरने सांगितले आहे की जर गुंतवणूकदाराने त्याचे ९.५% हिस्सेदारीचे ६ बिलियन डॉलर परत दिले तरच तो लगेच कंपनी सोडेल.

 

अश्नीर म्हणाले, “मी असे काय केले की मी राजीनामा द्यावा? कंपनीचे हे धोरण सुनावणी न करता शिक्षा देण्यासारखे आहे . जर बोर्डाला वाटत असेल की मी एमडी राहण्याची गरज नाही, तर कंपनीने दुसर्‍याला एमडी बनवावे, आणि मला माझे ४,००० कोटी रुपये परत करावे. जर तुम्ही मला माझी हिस्सेदारी परत केली तर मी स्वतःहून कंपनी सोडेन.” त्याने कंपनीकडे दोनच अटी ठेवल्या आहेत एक तर हिस्सेदारी परत करा किंवा कंपनी मध्ये एमडी म्हणून काम करु द्या.

खरं बघायला गेलं तर अश्नीर ग्रोवर हा एक अत्यंत कर्तुत्ववान माणूस आहे, फार कमी वेळात त्याने कंपनीला एवढं मोठं केलं आहे. त्याची काम करण्याची पद्धत असो किंवा त्याच्या बिझनेस आयडियाज असोत, प्रत्येक बाबतीत तो सरस ठरतो हे आपल्याला कंपनीच्या प्रगतीकडे बघून समजतंच.

पण तरी तो एक माणूस म्हणून अत्यंत फटकळ, उर्मट आहे याबाबतही कुणाचं दुमत नाही. बिझनेसमन म्हणून तो कितीही उत्कृष्ट असला तरी एक बिझनेस लीडर म्हणून तो त्या बाबतीत नापास ठरला आहे हे आपल्याला या त्याच्या वादग्रस्त वागण्यावरून समजतं!

 

 

अश्नीरने २००६ मध्ये आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले होते. त्यांनी कोटक महिंद्रा बँकेत उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे, त्यानंतर ते अमेरिकन एक्सप्रेसमध्ये रुजू झाले.

२०१५ मध्ये, त्यांनी ग्रोफर्स(Grofers) ची स्थापना केली आणि कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले. २०१८ मध्ये, त्यांनी BharatPe ची सह-स्थापना केली. सध्या सोनी टीव्हीच्या शार्क टँक इंडिया या शोमध्ये अश्नीर जजची भूमिका पार पाडत आहेत.

या शोमध्येसुद्धा तो त्याच्या फटकळ आणि अपमानकारक टिप्पणीमुळेच जास्त लोकप्रिय आहे, त्यामुळे एकंदरच त्याच्या पर्सनल एथीक्सवरसुद्धा लोकं प्रश्नचिन्ह उभं करतायत!

 

 

या रियालिटी शोमध्ये अश्नीर ग्रोवर सोबतच Shaadi.com, Makaan.com आणि पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल, शुगर कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापक आणि सीईओ विनिता सिंग, बोटचे सह-संस्थापक आणि सीएमओ अमन गुप्ता, लेन्सकार्टचे सह-संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल हे देखील आहेत.

सोबतच एम्क्योर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक नमिता थापर, आणि मामाअर्थचे सह-संस्थापक गझल अलघ हे देखील उपस्थित असतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version