Site icon InMarathi

किन्नरची भूमिका करून आलियापेक्षाही वरचढ ठरलेला दमदार अभिनेता!

vijay raaz featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडी या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. एकंदरच सिनेमात भन्साळी यांनी उभी केलेली हुबेहूब तेव्हाची मुंबई, आलियाची दमदार डायलॉग डिलिव्हरी, अजय देवगणची भाव खाऊन जाणारी भूमिका याबरोबरच आणखीन एका अभिनेत्याची सॉलिड चर्चा होत आहे.

तो अभिनेता म्हणजे विजय राज. या सिनेमात विजय यांनी रझियाबाई नावाच्या किन्नरची भूमिका वठवली आहे. या सिनेमातली विजय राज यांची काही दृश्यं पाहून लोकांची हा सिनेमा बघायची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

 

 

काहींनी तर फक्त विजय राज यांच्यासाठीच हा सिनेमा बघायचा असा पवित्रा घेतलेला आहे. एकंदरच विजय राज यांनी साकारलेली ती भूमिका किती अप्रतिम झालीये हे ट्रेलरमधल्या काही दृश्यांवरून समजलंच आहे आणि संपूर्ण सिनेमात आणखीन काय धमाल विजय राज करणार आहेत हे २५ फेब्रुवारीलाच समजेल!

कॉमेडी, गंभीर तसेच खलनायक अशा विविध भूमिका विजय राज यांनी साकारल्या आहेत आणि त्या भूमिकांना स्वतःचा खास टच दिल्याने त्यांच्या या भूमिकासुद्धा अजरामर झाल्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अभिषेक बच्चनच्या टुकार रन सिनेमातल्या त्याच्या मित्राची भूमिका असो, नाहीतर दिल्ली बेलीमधला सणकी व्हिलन असो, किंवा गली बॉय मधला बुरसटलेल्या विचारांचा बाप असो, विजय राज यांनी प्रत्येक भूमिकेत अगदी जीव ओतून काम केलंय, आज त्यांच्याचविषयी आपण जाणून घेणार आहोत!

५ जून १९६३ या दिवशी दिल्लीच्या एका सामान्य कुटुंबात विजय राज यांचा जन्म झाला. अभ्यासात फारशी रुचि नसणारे विजय यांनी किरोडीमल कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं. विजय यांच्या अभिनयाला हातभार लावण्याचं काम त्यांच्या या कॉलेजनेच केलं.

 

 

कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात जायचं नक्की केलं होतं पण, बॉलिवूडमध्ये येऊन करियर घडवायचं असं काहीच नक्की नव्हतं!

लाईमलाइटमध्ये यावं आणि मोठं स्टार बनावं असं विजय यांचं स्वप्न नव्हतंच, फक्त एक उत्तम आर्टिस्ट म्हणून नाव कामवावं म्हणून त्यांनी पहिली १० वर्षं फक्त रंगभूमीवर कामच केलं.

नंतर विजय यांनी NSD मध्ये प्रवेश घेऊन तिथून नाटकाचं पूर्ण शिक्षण घेऊन १९९८ साली बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्नं उराशी घेऊन मुंबईत पाऊल ठेवलं खरं पण पुढचा प्रवास बराच खडतर होता!

 

 

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी विजयचं नाव सुचवलं आणि मग १९९९ च्या भोपाल एक्सप्रेस या सिनेमात विजय यांना काम मिळालं, आणि मग विजय यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

२००४ च्या रघू रोमिओ नावाच्या सिनेमात प्रथम विजय यांना मुख्य भूमिका मिळाली आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला!

रन सिनेमातली त्यांची खास विनोदी भूमिका आणि कौआ बिर्याणीचा सीन तर आजही लोकं बघताना पोट धरून असतात, शिवाय धमालमधल्या त्यांच्या भूमिकावर तर कित्येक लाखों मिम्स बनले आहेत!

 

 

अभिनयाबरोबरच विजय एक उत्तम व्हॉईस आर्टिस्टसुद्धा आहेत, कित्येक जाहिरातींमध्ये तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. शिवाय मध्यंतरी अबूधाबी विमानतळावर ड्रग्स प्रकरणी विजय यांना अटक केली होती, पण त्याबाबत कोणताही सबळ पुरावा न आढळल्याने त्यांची या प्रकरणातून सुटका झाली.

हिंदी, तामीळ आणि मल्याळम अशा वेगवेगळ्या सिनेमातून आज स्वतःचा असा फॅनबेस तयार करणाऱ्या विजय राज यांची गंगूबाई सिनेमातली भूमिकासुद्धा चांगलीच गाजणार आहे असा अंदाज लावता येईल आणि ही भूमिका त्यांचं करियार आणखीन उंचावर नेऊन ठेवेल अशी आपण प्रार्थना करुयात!

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version