' १० किलो वजन कमी करण्यासाठी श्वेता तिवारीने वापरला भन्नाट फॉर्म्युला, जाणून घ्या – InMarathi

१० किलो वजन कमी करण्यासाठी श्वेता तिवारीने वापरला भन्नाट फॉर्म्युला, जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सहज जरी वजनकाट्यावर उभे राहिलो तरी आपल्याला टेन्शन येतं. त्यात जर अशी वजन चेक करण्याची वेळ डिलिव्हरीनंतर आली तर आपल्याला वाढलेले वजन पाहून धडकीच भरते. खरंच आहे ते! डिलिव्हरीनंतर वजन वाढणं ही सगळ्याच स्त्रियांना सामना करावी लागणारी समस्या आहे, या समस्येमुळे अनेक स्त्रिया त्रस्त आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

डिलिव्हरीनंतर कामात अधिक व्यस्त राहणाऱ्या स्त्रिया आपल्या आरोग्याकडे फारसं लक्ष देखील देत नाहीत. बहुतांश स्त्रिया तर वजन वाढीमुळे आपला आत्मविश्वास देखील गमावून बसतात. हे फक्त सामान्य स्त्रियांच्या बाबतीतच नव्हे तर अभिनेत्रींच्या बाबतीतही घडतं.

डिलिव्हरीनंतर अभिनेत्री नेहा धुपियाचं तर २५ किलो वजन वाढलं होतं. वजन वाढीमुळे तिला ट्रोल देखील करण्यात आलं. त्याचबरोबरीने करिना कपूर खान, ऐश्वर्या राय बच्चन सारख्या अभिनेत्रींनाही या समस्येचा सामना करावा लागला, मात्र नेहा धुपियाने तब्बल २३ किलो वजन कमी केले.

 

neha dhupia im

 

यात आणखी एक सुपरमॉम देखील आहे, जिने आपले केवळ वजनच कमी केले नाही, तर आपले शरीर सुद्धा पुन्हा सुडौल बनवले आहे. कोण आहे ही सुपरमॉम ?

ती आहे टेलिव्हीजन किंवा छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी. तिने आपल्या डिलिव्हरीनंतर तब्बल १० किलो वजन घटवलं. तंदुरुस्त आणि निरोगी होण्यासाठी वय नसते, हे अभिनेत्री श्वेता तिवारीने हे सिद्ध केले आहे आणि ४० च्या वयोगटातील महिलांसाठी पुन्हा आकारात येण्याचा ट्रेंड सेट केला आहे.

तिचे डिलिव्हरी नंतरचे ट्रान्सफॉर्मेशन खरंच कौतुकास्पद आहे. तिची ही वेट लॉस जर्नी नेमकी कशी होती? हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल, तेव्हा चला जाणून घेऊ कसे घटवले श्वेताने तब्बल १० किलो वजन.

 

shweta tiwari im

 

जीवनात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी, खूप धैर्य आणि इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे असे मानणार्‍या श्वेता तिवारीचा, पुन्हा फिट अँड फाईन होण्याचा प्रवास छोटा नव्हता, पण ती यशस्वी झाली ते तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आणि तिने घेतलेल्या परिश्रमांमुळे.

आपण आजवर अनेक टीव्ही मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये श्वेताचा सुंदर लुक आणि दमदार अभिनय पाहिला आहे. मात्र डिलिव्हरीनंतर तिला देखील लठ्ठपणाचा सामना करावा लागला.

एका मुलाखतीदरम्यान श्वेताने सांगितलं की, ‘माझा मुलगा रेयांशच्या जन्मानंतर माझं वजन ७३ किलो झालं होतं. ज्याचा परिणाम माझ्या कामावर झाला, माझा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला आणि अशाच एका क्षणी मी कुटुंब, मुलं, काम सांभाळत वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.’

डिलिव्हरीनंतर देखील स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. श्वेताने देखील अगदी तेच केलं. डिलिव्हरीनंतर श्वेताला एका मालिकेसाठी विचारण्यात आलं आणि याचदरम्यान तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

 

shweta tiwari im1

 

कलाकार म्हटलं, की भूमिकेनुसार त्यांना त्यांच्या लुकमध्ये बदल करावा लागतो. श्वेताने देखील आपण आपलं वजन नियंत्रणात आणून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात केली.

एका मुलाखतीदारम्यान श्वेताने सांगितले, की तिची ही वेट लॉस जर्नी अजिबात सोपी नव्हती. डाएट करत असतानाच तिने व्यायाम करण्याकडेही अधिक भर दिला.

आहारतज्ज्ञ ‘किनिता कदाकिया-पटेल’ च्या मार्गदर्शनाखाली श्वेताने तिचं डाएट सुरू ठेवलं. श्वेता म्हणाली, की ‘प्रेग्नेंसीनंतर मी माझ्या मुलाला सांभाळण्यामध्येच फार व्यस्त होते. नंतर मला विविध भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली, पण त्यापूर्वी वजन कमी करणं माझ्यासाठी गरजेचे होते.’

श्वेताने वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि डाएटकडे विशेष लक्ष दिलं. आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे, कोणत्या वेळी काय खाल्लं पाहिजे याचं परफेक्ट वेळापत्रक आखून त्यानुसार तिने आपल्या आहारतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्या वेळापत्रकानुसार आपली दिनचर्या सुरू केली.

वजन कमी करण्यामागचं श्वेताचं मोठं रहस्य म्हणजे तिचं ‘परफेक्ट डाएट’ हेच आहे. ओट्स, ब्राउन राइस, फळं, लो फॅट दुग्धजन्य पदार्थ, मांस याचा तिच्या आहारात समावेश असतो. 

 

shweta tiwari im2

 

आहारतज्ज्ञ किनिता कदाकिया पटेल म्हणतात, की “श्वेता तिचं डाएट योग्य पद्धतीने करते. शरीराला पोषक घटकांचा पुरवठा करणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करण्याकडे तिचा अधिक कल असतो. आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये खाण्याबरोबरच तिने व्यायाम करण्यावरही भर दिला. नियमित व्यायाम करून तिने स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न केला. यात तिच्या हेल्दी डाएटने तिला फिट राहण्यास निश्चितच मदत केली.”

वजन कमी केल्यावर श्वेतामध्ये झालेल्या बदलाने ती अजूनच तरुण आणि सुंदर दिसू लागली आहे. तिच्या बदललेल्या लुकची सध्या मीडियामध्ये चर्चा असून सर्वत्र तिच्या दिसण्याचे कौतूक होत आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.  

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?