तो स्वर्गीय, काळजाला भिडणारा आवाज ज्याने नेहरूंनादेखील अश्रू झाले अनावर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय संगीत सृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्नं म्हणजे लता दीदी. दीदींनी प्रादेशिक आणि परदेशी अशा एकूण ३६ भाषांमध्ये सुमारे ३०००० हजार गाणी रेकॉर्ड केली आहेत. अनेक दशकांची कारकीर्द असलेल्या लतादीदी हजारो वर्षातून एकदाच जन्माला येतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
लता दीदींचा दुर्मिळ अशा तिसऱ्या सप्तकातील आवाज रसिकांना मंत्रमुग्ध करत असे. ‘पिया तोसे नैना लागे रे’, ‘अजीब दास्तान है ये’, ‘जिया जले जान जले’ ही गाणी प्रेमात पडलेल्या युवकांच्या मनाचा ठाव अचुक घ्यायची.
तर शेवटच्या भेटीची कैफियत मांडण्यासाठी ‘लग जा गले’ या गाण्याएवढे अचुक गीत क्वचितच असेल. तर कधी लतादीदी आईच्या आर्जव स्वरात ‘नीज माझ्या नंदलाला , नंदलाला रे’ म्हणत बाळासाठी अंगाई गीत गायच्या.
वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये सदाबहार अशा अनेक गीतांनी लता दीदींचा आवाज अजरामर झाला. कित्येक दशकातील पिढ्यांनी त्यांच्या आवाजाची जादू अनुभवली आहे.
त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालेल्या लोकांच्या यादीमध्ये अनेक बड्या आसामींची नावे सुद्धा आहेत. त्यातील एक नाव आहे ‘ पंडित जवाहरलाल नेहरू’ यांचं. तर ही गोष्ट ‘ये मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गीताची.
–
- तो ‘थुंकला’ नाहीये, ओठांमधून हवेचा फुत्कार केला फक्त…
- २० दिवस फोनवर दीदींनी ऐकवलं गाणं, मृत्युशय्येवरील दिग्दर्शकासाठी आवाज ठरला संजीवनी
–
१९६२ च्या चीन-भारत युद्धानंतर दोन महिन्यांनी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी १९६३) लतादीदींनी पहिल्यांदा हे गाणे गायले. युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे गीत तयार केले गेले होते.
नवी दिल्लीच्या नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील उपस्थित होते. त्या गीतातून जणू प्रत्येक भारतीयांच्या मनातील भावना व्यक्त होत होत्या.
कार्यक्रम संपल्यावर लतादीदींना सांगण्यात आले की नेहरूंना त्यांच्याशी बोलायचे आहे. “सुरुवातीला मी घाबरलो होते, माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे असे वाटले. पण जेव्हा मी पंडितजींना (नेहरू) भेटले तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले. ‘लता, तुमने आज मुझे रुला दिया’ असं म्हणत त्यांनी भावना मोकळ्या केल्या!
ए मेरे वतन के लोगोंच्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान लता दीदी सांगत होत्या.
असेही म्हंटले जाते की, कार्यक्रमानंतर नेहरू म्हणाले की, “ज्यांना ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे ऐकल्यानंतर देशाबद्दल प्रेरणा वाटत नाही ते लोक हिंदुस्थानी म्हणण्यास पात्र नाहीत.”
आजही ते गाणे ऐकल्यानंतर देशाबद्दल प्रेम आणि देशासाठी शहीद झालेल्या प्रत्येकाबद्दल आदर निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
दीदींच्या आवाजाची हीच तर जादू आहे. काल लता दीदींची प्राणज्योत मावळली असली तरी त्यांची गाणी मात्र अजरामर आहेत आणि कायम राहतील.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.