Site icon InMarathi

सलमान ते राणी; सर्व स्टार्स अंडरवर्ल्डच्या मुठीत, पण निडरपणे सामना करणारी एकटी प्रिती!

preety im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूडचे जेवढे सिनेमा या कलेशी नाते जुळले नसेल तितके अंडरवर्ल्ड चांगले जुळले होते. बॉलीवूडमध्ये सिनेमा जसा दशकानुसार बदलत गेला तसे सिनेमाचे गणित सुद्धा बदलत गेले. सुरवातीला फक्त स्टुडिओ कमी बजेट यामध्ये बनले जात होते तेच सिनेमे कालांतराने चकचकीत होऊ लागले, परदेशात शुत होऊ लागले, एकूणच सिनेमाचे चित्र पालटले…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिनेमाची व्याप्ती जरी वाढत गेली असली तरी यामागे नक्की कोण आहे असा प्रश्न पडू लागला होता, हळूहळू बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यामधील कनेक्शन बाहेर येऊ लागले, संजय दत्त, सलमान खान, ऋषी कपूर या मंडळींची नावे पुढे आली.

 

आज बॉलीवूडमध्ये नेपोटीझम, ग्रुपीझम या संकल्पना अस्तित्वात आहेत असे बोलले जाते, काम पाहिजे असल्यास तुम्हाला कुठल्या तरी ग्रुपमध्ये सामील व्हावे लागते, स्टार किड्सना तर हा प्रवेश अगदी सोपा असतो. मात्र याच बॉलीवूडमध्ये जर कोणी एकमेकांच्या विरोधात बोलले तर त्याला बॉयकट केले जाते.

दोन वर्षांपूर्वी जसे सुशांत सिंग प्रकरण याच कारणामुळे गाजले होते तसेच काही वर्षांपूर्वी डिम्पल गर्ल प्रीती झिंटाच्या बाबतीत असेच घडले होते, नेमकं काय झालं होत हे जाणून घेऊयात…

 

 

नेमकं काय घडलं?

करियरच्या सुरवातीलाच सिंगल मदर सारख्या ज्वलंत विषयाला सक्षमपणे मांडणारी प्रीती, चोरी चोरी चुपके चुपके सारख्या सिनेमात वेश्याची भूमिका करून आपल्यातील अभिनय कौश्यल्याची चुणूक दाखवून गेली. मात्र चोरी चोरी चुपके चुपके सिनेमा विषय जरी गंभीर असला तरी तो गाजला मात्र अंडरलवर्ल्ड कनेक्शनमुळे, पोलिसांनी या सगळ्याची खबर लागताच त्यांनी सिनेमातील कलाकारांची चौकशी करण्यास सुरवात केली.

केवळ सलमान खान नव्हे तर राकेश रोशन, शाहरुख खान, अनिस बाजमी, महेश मांजरेकर या बड्या मंडळींची पोलिसांनी सखोल चौकशी केली मात्र यातील सगळ्यांनी सिनेमाचा आणि अंडरवर्ल्डचा काही संबंध नाही असे स्पष्ट केले होते. तसेच अंडरलवर्ल्ड सोबत आपले कोणतेच संबंध नाहीत असे सांगितले. प्रीती मात्र ठाम राहिली तिने आपले शब्द ना पोलिसांसमोर बदलले ना कोर्टात…

 

 

जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेले तेव्हा प्रितीने कोर्टात साक्ष देताना निडर होऊन सांगितले की मला जीवे मारण्याच्या धमक्या येऊन गेल्या आहेत. तसेच माझ्याकडे ५० लाखाची खंडणी देखील मागत होते. याकाळात तेव्हाचे कमिशनर एम एन सिंग यांनी प्रीतीच्या सरंक्षणासाठी पोलिसांची फौज तैनात केली होती.

प्रितीने एका मुलाखतीती असे सांगितले होते की, ‘त्याकाळात अंडरवर्ल्ड खूपच सक्रिय झाले होते. राकेश रोशन यांच्यावर हल्ला झाल्याने आमच्या सेटवर कायमच तणावाचे वातावरण असायचे. सर्वचजण अंडरवर्ल्डच्या धमक्यांपासून वाचण्यासाठी आपापले फोन बंद करून ठेवायचे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भीतीदायक काळ होता’.

सिनेमात कायम बबली गर्ल अशी इमेज बनलेल्या प्रितीने खऱ्या आयुष्यात देखील तितकाच बिनधास्तपणा दाखवून आपल्या शब्दांवर ठाम राहिली. सिनेमातुन तिने थेट क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले होते, किंग्स इलेव्हन पंजाब या संघांची ती मालकीण आहे. २०१६ साली तिने  अमेरिकन व्यक्तीसोबत लग्न देखील केले.

 

 

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांचे वर्णन राम गोपाल वर्मा सारख्या दिग्दर्शकानेआपल्या सिनेमांमधून एकदम चपखलपणे दाखवले आहे. सध्या एकूणच बॉलीवूड कोरोना आणि ओमिक्रोनमुळे थंड पडले आहे, अनेक बिगबजेट सिनेमे प्रदर्शनासाठी होऊ घातलेत, निर्बंध कमी झाल्यावर बहुदा ते प्रदर्शित होतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version