Site icon InMarathi

दारूच्या नशेत टून असलेल्या संजय दत्तने आपल्या हातातून गमावला एक सुपरहिट सिनेमा

subhash im 3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संजय दत्त हे असं नाव आहे जे अनेकदा विवादांच्या भोवर्‍यात अडकून सहिसलामत बाहेर पडलं आहे. सुमार अभिनय मात्र देखणा संजूबाबा इंडस्ट्रीत येण्याचं आणि त्याला इंडस्ट्रीनं सामावून घेण्याचं मुख्य कारण होतं, त्याच्या आईवडिलांचं नर्गिस आणि सुनिल दत्त असणं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही दोन नावं इंडस्ट्रीत दबदबा राखून होती आणि म्हणूनच गर्दच्या नशेच्या आहारी गेलेल्या, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या कारणानंही तो कधिही इंडस्ट्रीबाहेर फ़ेकला गेला नाही. त्याला इंडस्ट्रीनं कायमच दोन्ही हात पसरून आपलं म्हणलं आहे.

 

 

इंडस्ट्रीचा तो अत्यंत लाडका असा संजूबाबा आहे. जेलमधे जाऊनही त्याच्या करियरवर आणि इंडस्ट्रीतल्या त्याच्या स्थानावर काहीही परिणाम झालेला नाही. विचित्र विरोधाभास असा की, अभिनय कामचलाऊ असूनही संजय दत्तनं अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पदार्पणातला रॉकी, खलनायक आणि नंतरच्या काळातला मुन्नाभाई,स जय दत्तनं अनेक आयकॉनिक भूमिका साकारल्या आहेत.

या सगळ्यात एक अशी भूमिका त्याच्याहातून निसटली जी हिंदी चित्रपटातली अजरामर भूमिका ठरली आणि हिरेजडीत चमचा तोंडात धरून जन्माला आलेल्या संजूबाबाकडून निसटलेली ही भूमिका अत्यंत सामान्य घरातल्या, चाळीतल्या एका मुलाकडे गेली. त्या भूमिकेचं या सामान्य मुलानं सोनं केलं आणि हिंदी चित्रपट सृष्टीला ऐंशींच्या दशकात एक देखणा हिरो मिळाला.

 

 

हिंदीत एक म्हण आहे, दाने दाने पे लिखा होता है खानेवाले का नाम. ही म्हण संजूबाबा आणि जग्गूदादा यांच्याबाबतीत अगदी सार्थ ठरली आहे. संजूबाबानं रॉकीद्वारे दमदार पदार्पण केलं होतं आणि अख्खि इंडस्ट्री प्रभावित झाली होती. सुभाष घई देखिल याला अपवाद नव्हते. त्यांनी ठरवलं की आपल्या पुढच्या सिनेमाचा हिरो बाबाच असेल.

बाबाला योग्य अशा स्क्रिप्टचा शोध सुरु झाला आणि लवकरच असं दमदार स्क्रिप्ट घईंना मिळालं. एक नव्हे तर दोन चित्रपटांसाठी घईनी बाबाला साईन केलं. हे चित्रपट होते, विधाता आणि हिरो. दोन्हीतही मागच्या पिढीतले दिग्गल सुपरस्टार बाबासोबत अभिनयाच्या जुगलबंदीत दिसणार होते. शम्मी कपूर आणि दिलीप कुमार हे ते दोन दिग्गज कलाकार.

 

 

या दोघांना घेत शेड्यूल आखत चित्रीकरण सुरूही झालं आणि याच दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. बाबाचं गर्दचं व्यसन पुन्हा उफ़ाळून आलं आणि बाबा रात्रंदिवस नशेत दिसू लागला. स्वत:च्या आयुष्याची दिशा हरवून बसलेला बाबा. त्याला ना त्याच्या करियरची फ़िकीर होती ना वडिल्यांच्या कष्टानं कमावलेल्या प्रतिष्ठेची.

बाबा आता अभिनयासाठी बातम्यांत झळकत नव्हता तर त्याच्या व्यसनाधिनतेमुळे तो चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला होता. नशेत असणार्‍या संजूबाबाला दिवस, वेळ काळ कशाचंच भान नसायचं, याचा परिणाम म्हणजे सेटवर तो कधिही यायचा.

चित्रीकरण खोळंबलेलं असायचं, प्रचंड नुकसान होत असायचं आणि हे बाबाच्या गावीही नसायचं. या सगळ्या प्रकारानं घई संजूबाबावर नाराज झाले.कसाबसा विधाता पूर्ण केला मात्र हिरोचं चित्रीकरण अशा प्रकारे पूर्ण करण्याचं धाडस त्यांच्यात उरलं नव्हतं.

 

 

अखेरीस त्यांनी संजयची या चित्रपटातून हकालपट्टी करण्याचं ठरविलं आणि नव्या चेहर्‍याचा शोध चालू केला. या भूमिकेचा योगायोग असा की स्टारपुत्राला डोळ्यासमोर ठेवून बेतलेली ही भूमिका एका अत्यंत सामान्य घरातल्या मुलाकडे गेली.

जन्माला येताना जो हिरो म्हणून आला आणि वास्तव आयुष्य जगतानाही जो हिरो म्हणून वावरला, ज्याच्या पहिल्या धमाकेदार यश मिळविलेल्या चित्रपटानं घई प्रभावित झाले होते त्या संजूबाबासाठी ही भूमिका लिहिली गेली आणि प्रत्यक्षात ती साकारली इंडस्ट्रीत संघर्ष करणार्‍या एका अत्यंत सामान्य मुलानं.

केवळ एका फ़्लॉप चित्रपटाचा अनुभव या मुलाच्या पाठिशी होता. ही भूमिका जॅकी श्रॉफ़ नावाचा देखणा तरूणच साकारेल ही नियतीची इच्छा होती.

 

ऐंशीच्या दशकात सुपरहिट झालेल्या हिरोचा हिरो बनला जॅकी श्रॉफ़ आणि या यशानंतर त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजही हा रांगडा जग्गूदादा चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. कुठेतरी संजूबाबाचं बॅडलक जग्गूदादाच्या गुडलकला कारणीभूत ठरलं हे मात्र नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version