' फक्त ६६ दिवसांत तुमचं जीवन पूर्णपणे बदलणाऱ्या ‘परफेक्ट लाईफ’च्या २१ सवयी! – InMarathi

फक्त ६६ दिवसांत तुमचं जीवन पूर्णपणे बदलणाऱ्या ‘परफेक्ट लाईफ’च्या २१ सवयी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणतीही चांगली सवय लावून घेण्यासाठी फक्त ६६ दिवस लागतात, हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. आपण, सवयीचे गुलाम असतो. एक चांगली किंवा वाईट सवय आपल्या आयुष्यात खूप प्रभावी ठरू शकते. यशस्वी होण्यासाठी आपल्या सवयीदेखील यशस्वी व्यक्तिमत्वासारख्याच असायला हव्यात.

अर्थात कोणतीही गोष्ट फक्त करतो म्हणून करत राहिल्याने तिचे सवयीत रुपांतर होत नाही. तर, त्यामागे तसे काही ठोस कारण देखील हवे. म्हणून आयुष्य बदलण्यासाठी आधी आपल्या सवयी बदलणं फार गरजेचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज आपण अशा अत्यंत प्रभावपूर्ण सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात

 

१. कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – अल्पकालीन किंव दीर्घकालीन उद्देश साध्य करण्यासाठी दिवसभरातील कामाचा प्राधान्य क्रम आधी ठरवून घ्या. आज दिवसभारत तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करणार आहात आणि त्यांचा प्राधान्यक्रम काय असणार आहे?

 

planning Sequence InMarathi

 

दिवसभर तुमच्या कामापासून तुम्हाला विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला आठवतील. हे काम, ते काम, एक काम करताना दुसरीच गोष्ट आठवणे यामुळे हातातील कामापासून तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. म्हणूनच कामांची यादी आणि त्यातही त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून मगच कामाला लागा.

 

२. दिवसातून एक तास तरी वाचन करा

आता वाचायला वेळ कुठून आणायचा असं तुम्हाला वाटेलच! किंवा कदाचित तुम्हाला वाचण्याची आवड देखील नसेल, पण वाचन केल्याने तुम्हाल चांगला विचार करण्याची सवय लागते. वाचनाने माणूस विचारी बनतो आणि एक लेखकही.

 

Reading-inmarathi

 

म्हणून रोज वाचन करणे अत्यावश्यक आहे. एक दिवस हा तुमच्या सवयीचा आणि आवडीचा भाग बनून जाईल.

 

३. ७-८ तासाची झोप झालीच पाहिजे

कोणत्याही छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी जागरण करणे टाळा. किमान ७-८ तास रोज झोप झालीच पाहिजे. यासाठी झोपेच एक निश्चित वेळापत्रक बनवा. कधी कधी झोपण्याची वेळ टाळून गेल्यास उठण्याची वेळ थोडीशी लांबवा.

 

sleep-main-inmarathi.jpg

 

चुकुनही कमी झोप घेऊन कामाला लागू नका. यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर आणि सर्जनशीलतेवर परिणाम होऊ शकतो.

 

४. दररोज किमान ३० मिनिटे चाला

दिवसातून ३० मिनिटे जर तुम्ही फिरून येण्यासाठी देत नसाल तर, तुमचे तुमच्या आयुष्यावर नियंत्रण नाही असा याचा अर्थ होतो. बाहेर मोकळ्या हवेत फिरल्याने तुम्हाला ताजी शुद्ध हवा मिळते. तुमच्या तळव्यांना झालेला मातीचा स्पर्श तुम्हाला अधिक उत्साही बनवतो. बाहेर फिरून तुमच्या भोवतालाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.

 

Walking-Daily-InMarathi

हे ही वाचा –

===

 

५. दररोज व्यायाम करा

शरीराची ताकद वाढण्याचे फायदे खूप असतात. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात, स्नायू आणि मासपेशींची लवचिकता वाढते, त्यामुळे सडपातळ राहण्यास मदत होते, तुमच्यातील उर्जा टिकून राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. म्हणून दिवसातील थोडा वेळ का असेना पण, व्यायाम नक्की करा.

 

hritik-exercise-inmarathi

 

 

६. आहाराचे वेळापत्रक

रात्री जेवानंतरही आवडते पदार्थ चघळणे किंवा दुपारच्या जेवणानंतर स्नॅक खाणे वेळी अवेळी चहा कॉफी घेणे अशा आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्याला खूप हानी पोचते. म्हणून निरोगी राहण्यासाठी चांगला पोषक आहार खूप गरजेचा असतो.

 

eating-healthy-inmarathi01

 

तसेच किमान १५-१६ तास तरी पोट रिकामे राहिले पाहिजे. त्यामुळे रात्रीचे जेवण देखील लवकर करा आणि जंक फूड पासून दूरच रहा.

 

७. वर्तमानात जगा

अनेकांना पुढे काय होणार, कसे होणार, हे नाही झाले तर, असे नाही झाले तर, अशा अनेक चिंता किंवा भूतकाळातील चुका सतत सतावत राहतात. तेंव्हा मागे काय घडून गेले किंवा पुढे काय घडणार आहे याची फारशी चिंता न करता, वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा.

 

Living-In-The-Present-Moment-InMarathi

 

८. प्रेम व्यक्त करा

घरातील व्यक्ती, प्रिय व्यक्ती असो किंवा नातेवाईक इतरांबद्दल वाटणारे प्रेम खुलेपणाने व्यक्त करा. तेव्हा दिवसातील काही वेळ आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवा. तुम्ही देत असलेल्या प्रेमाच्या बदल्यात कसलीही अपेक्षा करू नका. तुम्ही जितके प्रेम इतरांना द्याल तितकेच तुम्हालाही परत मिळेल.

 

 

९. रोज लिखाण करा

आपल्या विचारात सुसूत्रता असणे गरजेचे आहे. रोज लिहण्याची सवय लावून घेतल्याने तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. आपल्या विचारांना देखील शिस्त लागते.

 

writing inmarathi

 

 

१०. बचत करा

किमान तुमच्या मिळकतीतील ३०% रक्कम तरी बचत करा, एवढी रक्कम बचत करणे शक्य नसल्यास १०% रक्कम तरी, तुम्ही वाचवू शकता. छोट्या छोट्या गोष्टींवर होणारा खर्च तुम्ही टाळला तरी, मोठी रक्कम बचत होऊ शकते.

 

saving inmarathi

 

 

११. नवीन गोष्टी शिका

गोष्ट अवघड आहे सोपी आहे, तुमच्या क्षेत्राशी निगडीत आहे किंवा नाही याचा विचार न करता, रोज किमान एक तरी नवी गोष्ट शिकण्याचा निश्चय करा.

 

Continuous Learning-inmarathi

हे ही वाचा –

===

 

१२. संधी घ्या

एखादे काम करण्यात धोका आहे किंवा जोखीम आहे असे वाटत असल्यास ती जोखीम उचलण्याची तयारी ठेवा. अपयशापेक्षाही एखादी गोष्ट करण्याची संधी दवडल्याने जास्त पश्चाताप होतो.

 

risk-taking-inMarathi

 

१३. एकांतात वेळ घालवा

दिवसातील काही वेळ तरी एकांतात घालवा. यामुळे तुम्हाला थोडा आनंद मिळेल आणि तुमच्यातील कार्यक्षमता वाढेल. दिवसातील काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.

 

alone inmarathi

 

१४. प्रश्न विचारा

उत्सुकता दाखवणे हे चांगले कौशल्य आहे. तुमच्या व्यवसायाशी संबधित नवनवीन गोष्टी शिकल्याने तुमच्या व्यवसाय वाढण्यास मदत होऊ शकते. म्हणून चांगल्या गोष्टी शिका आणि त्यासाठी प्रश्न विचारण्याची तयारी ठेवा. प्रश्न विचारल्याने चांगले रिलेशन तयार होऊ शकतात.

 

questioning-skills-Inmarathi

 

१५. इतरांना मदत करा

सततच्या काळजीयुक्त मानसिकतेतून बाहेर पडण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे स्वतःबद्दल विचार करणे थांबवून इतरांना मदत करा. जेव्हा इतरांच्या कामात तुम्ही मदत करत असता, तेंव्हा तुमच्या आयुष्यातील ताणतणावाचा तुम्हाला थोडा काळ का असेन विसर पडतो.

 

Help Inmarathi

 

१६. चांगले श्रोते बना

आयुष्यातील समतोल राखण्यास आणि नात्यातील लवचिकता कायम ठेवण्यास आवश्यक असणारी बाब म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मत, विचार शांतपणे ऐकून घेणे. ज्याप्रकारे आपण इतरांना समजून घेतो त्याच पद्धतीने त्यांना देखील आपल्याला सामून घेणे सोपे जाते.

 

listening-skills-inmarathi

 

१७. मानसिकदृष्ट्या कणखर बना

मानसिकदृष्ट्या कणखर व्हायचे आहे. पण कसे? इतरांना दोष देणे थांबवा, सगळ्या गोष्टीवर फार गांभीर्याने विचार करणे किंवा मनाला लावून घेणे थांबवा. तुम्ही घेतलेल्या निर्णयासाठी तुमच्या भूतकाळाला किंवा बाहेरील एखाद्या घटकाला, व्यक्तीला दोष देणे बंद करा.

 

mentally-strong-inmarathi

 

१८. कारणे शोधा

कारणे मिळाल्यास अर्थ सापडतो. कोणतीही गोष्ट करण्यामागे जेंव्हा तुमच्याकडे एक ठोस कारण असते, तेंव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा मिळतो. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी घडून याव्यात यासाठी तुम्ही स्वतःच स्वतःची प्रेरणा बनता.

 

sindhu-inmarathi

 

१९. आवडते पदार्थ स्वतः बनवून खा

तुमचा आवडता पदार्थ तुम्ही बाहेरून मागवण्यापेक्षा स्वतःच घरी बनवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच पण, घरच्या घरी चांगले पौष्टिक अन्न देखील मिळेल, ज्याचा तुमच्या आरोग्याला फायदा होईल.

 

Cooking-Inmarathi

 

२०. कृतज्ञता बाळगा

ऑफिसमध्ये किंवा रस्त्यावर, बस मध्ये कधी कधी चुकून तुमच्या हातून चुका घडतात आणि समोरच्या व्यक्तीकडे तुम्ही माफी मागता. ती व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि तुम्हाला माफ करते. अशा वेळी सतत सॉरी म्हणण्याऐवजी थँक्स म्हणा.

 

benefits-of-gratitude-InMarathi

 

असे केल्याने त्या व्यक्तीला देखील बरे वाटेल आणि तुमच्या मनातही पश्चातापाची भावना रेंगाळत राहणार नाही. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या गुणांची दाखल घेतलेली आवडते. म्हणून तुम्हाला माफ करून समजून घेणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर दाखवा, जेणे करून तुमच्या दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल.

२१. भरपूर पाणी प्या

शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी मिळाले नसल्यास शारीरिक उर्जा कमी होते. त्यामुळे तुमच्यातील कार्यक्षमता आणि क्रिएटीव्हीटी देखील कमी होते. म्हणून सतत थोड्या थोड्या अंतराने पाणी पीत राहा, यामुळे तुमच्या आरोग्याला देखील फायदा होईल.

 

water health-inmarathi05

 

हे ही वाचा –

===

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?