' पुष्पामधल्या रश्मीकाच्या फिटनेसचं, भारी फिगरचं सिक्रेट जाणून घ्या… – InMarathi

पुष्पामधल्या रश्मीकाच्या फिटनेसचं, भारी फिगरचं सिक्रेट जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुदृढ असणं आणि दिसणं ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी नेहमीच महत्त्वाची असते. पण रोजच्या कामाच्या ताणात, प्रवासात आणि आता लॉकडाऊनमध्ये घरी बसून कामं करून आलेल्या कंटाळ्यामुळे आपल्या सगळ्यांचंच फिटनेसकडे दुर्लक्ष होतंय. पण अश्या वातावरणातही व्यायाम करून, डाएट करून स्वतःला तंदुरुस्त ठेवणारी माणसं आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलिवूडच्या ‘फिट अँड फाईन’ कलाकारांचाही आपल्यावर असा सकारात्मक प्रभाव पाडण्यात फार मोठा वाटा असतो.

करीना कपूर, अक्षय कुमार पासून ते आजच्या आघाडीच्या अभिनेत्री आलीया भट्ट आणि सारा अली खान यांनी त्यांच्यात केलेला आमूलाग्र बदल थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे.

 

akshay kareena IM

 

फिटनेसच्या बाबतीत अश्या सेलिब्रिटीजचं अनुकरण करण्याचा आपण कायमच प्रयत्न करत असतो.

सध्या ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री ‘रश्मीका मंदाना’ची चांगलीच हवा आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या रश्मीका ने मुख्यत्त्वे कन्नड आणि तेलगू चित्रपटांमधून कामं केली आहेत.

रश्मीका ‘कर्नाटक क्रश’ म्हणून आणि आता पुष्पामधल्या उत्कृष्ट अभिनयानंतर भारताची ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही चाहत्यांना घायाळ करतेय. पण ती केवळ उत्तम अभिनेत्रीच नसून आपल्या फिटनेस आणि डाएटच्या बाबतीतही प्रचंड जागरूक असते.

तुम्हालाही रश्मीका मंदानासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? मग जाणून घ्या तिच्या फिटनेसचं आणि सौंदर्यामागचं गुपित.

 

rashmika inmarathi

 

फक्त बारीक किंवा ‘टोन्ड बॉडी’ असण्यापेक्षा आपण फिट असायला हवं असं रश्मीकाला वाटतं. आपले नृत्याचे व्हिडियोज सोशल मीडियावरून शेअर करून रश्मीका नेहमीच आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

स्वतःला फिट ठेवण्यासाठी याखेरीज ती आठवड्यातून ४ ते ५ वेळा जिमला जायचा शिरस्ता नेमाने पाळते. तिच्या जिमच्या वर्कआउट्स मध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ, कोअर आणि वेट ट्रेनिंगचा समावेश असतो.

जेव्हा ती जिमला जात नाही तेव्हा ती घरीच वर्कआउट्स करते. दोरीउड्या, किक बॉक्सिंग, भराभर चालणे, पावर योगा हे व्यायाम ती घरच्या घरी करते. याशिवाय ती पोहोतेदेखील.

व्यायामाबरोबरीनेच रश्मीका तिच्या डाएटच्या बाबतीतही दक्ष असते. काय खायचं-प्यायचं, काय नाही याकडे ती गांभीर्याने लक्ष देते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज सकाळी उठल्यावर ती जवळपास एक लिटर पाणी पिते आणि आता तिच्या डाएटिशियनच्या सल्य्यानुसार पाण्यातून ‘ऍपल सिडर व्हिनेगर’ही घेते.

 

rashmika inmarathi1

 

रश्मीका अलीकडेच शाकाहारी झालीआहे. पूर्ण शाकाहारी झाल्यानंतर बटाटा, सिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी या भाज्या आपल्याला चालत नाहीत हे तिच्या लक्षात आलं.

तिच्या दुपारच्या जेवणात बऱ्याचदा ‘साऊथ इंडियन फूड’ असतं. घरचंच जेवण जेवण्यावर ती भर देते. भात, जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणं ती कटाक्षाने टाळते.

ऋतूंनुसार मिळणारी फळं खाण्यावर, रताळ्यावर दालचिनीची पूड घालून खाण्यावर आणि सुस्प्स, नारळाचं पाणी पिण्यावर तिचा भर असतो.

rashmika inmarathi2

 

आपल्या तब्येतीची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी, स्वतःला शक्य तितकं फिट ठेवण्यासाठी रश्मीका मंदाना करत असलेले व्यायाम आणि फॉलो करत असलेलं डाएट करणं आपल्यालाही अगदी सहज शक्य आहे.

फक्त सुरुवातीचे काही दिवस या गोष्टी करून सोडून न देता जर आपण प्रयत्नपूर्वक चिकाटीने आणि नेमाने या गोष्टी केल्या तर आपण अगदी ‘रश्मीका मंदाना’ जरी झालो नाही तरी स्वतःचं बेटर व्हर्जन निश्चितच होऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?