यशाच्या शिखरावर असूनही या ६ कलाकारांनी मालिका का सोडली?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
सिनेसृष्टीत वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. कलाकार- निर्माते- दिग्दर्शक एकत्र आले, की वाद होणं ही गोष्ट स्वाभाविकच आहे. अशाच वादांमधून अनेक कलाकारांना मालिकांमधून काढून टाकले आहे, किंवा चॅनेलशी झालेल्या वादामुळे त्यांनी स्वतः मालिकेतून काढता पाय घेतला आहे.
सध्या सोशलमीडियावर ‘किरण माने’ या अभिनेत्याची फार चर्चा आहे. सोशल मीडियावर त्यांनी लिहिलेल्या काही राजकीय मतांमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले.
स्टार प्रवाहच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने घराघरात पोहचले, मात्र त्यांना अचानक या मालिकेतून काढून टाकण्यात आले. या घटनेनंतर मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ उडाली. #istandwithkiranmane म्हणत अनेकांनी झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला, तर काहींनी चॅनेलची बाजू घेतली.
याआधी सुद्धा मालिकांमधून अनेक कलाकारांना काढून टाकण्यात आलं आहे. बघूया असेच काही कलाकार –
१. अपूर्वा नेमळेकर –
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अपूर्वाच्या ‘शेवंता’ या भूमिकेने लोकांना अक्षरशः वेड लावलं. तिच्या दिलखेचक अदांवर प्रेक्षक फिदा झाले, पण रात्रीस खेळ चाले ३ मध्ये सुरुवातीला अपूर्व दिसली, पण पुढे मात्र तिने ही मालिका सोडली.
अपूर्वाने तिच्या इंस्टाग्रामवर यामागचं कारण सांगितलं होतं. चॅनेलने योग्य वेळेत पेमेंट न केल्याने तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या वजन वाढवण्यावरूनदेखील तिला सेटवर चिडवलं जायचं असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
२. प्राजक्ता गायकवाड –
‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आलं. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी तिला काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ‘परीक्षेच्या नावाखाली ती इतर कार्यक्रमांना जाते, शूटिंगला वेळेत येत नाही’ असा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.
या घटनेलादेखील पुढे राजकीय वळण मिळाले होते.
—
- स्टेशनबाहेर २० रुपयांत जेवण करून काढले दिवस, संतोष जुवेकरचा प्रेरणादायी संघर्ष..
- स्पृहाच्या हनीमूनचा धम्माल किस्सा; प्रभुदेवाला सोडून लोकांनी लावल्या तिच्यापुढे रांगा…
—
३. ईशा केसकर –
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत पूर्वी ‘रसिक सुनील’ शनायाची भूमिका करत होती, पण रसिका परदेशी गेल्यामुळे तिच्याजागी ईशा केसकर ही भूमिका करत असे. ईशाने ही मालिका तिच्या काही वैयक्तिक कारणांसाठी सोडली होती.
४. किरण ढाणे –
‘लागीर झालं जी’ या मालिकेत ‘जयडी’ची भूमिका साकारणाऱ्या किरण ढाणे यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय चॅनेलने घेतला. आपल्या शिफ्टसाठी त्या जास्त पैसे मागत असल्याचं कारण यामागे होतं.
५. विद्या सावळे –
‘लागीर झालं जी’ या मालिकेत विद्या ‘मामी’ची भूमिका साकारायच्या, प्रॉडक्शनसोबत पैशांवरून काही वाद झाल्याने त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
६. शिवानी सुर्वे –
बिग बॉस मराठी आणि देवयानी या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं हे नाव, पण शिवानीने ‘देवयानी’ ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. शूटिंग शेड्युलवरून तिचे प्रॉडक्शनसोबत काही वाद झाले होते.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.