' अतिरेक वाईटच, टोमॅटो ketchup ठरू शकतं आरोग्यासाठी घातक – InMarathi

अतिरेक वाईटच, टोमॅटो ketchup ठरू शकतं आरोग्यासाठी घातक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वेगवेगळ्या चविष्ट डिशेस खायला कोणाला नाही आवडत?? खाणे हा जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा विषय आणि कदाचित म्हणूनच आपल्याकडे खाण्याचे प्रचंड पदार्थ उपलब्ध आहेत.

दक्षिण भारतीय, चायनीज, इटालियन, आफ्रिकन, पंजाबी, कॉन्टिनेन्टल, थाय, मराठमोळे जेवण असे एक ना अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याकडे पाहायला मिळतात. काही लोकांच्या आयुष्याचा तर फंडाच असतो खाणे आणि फक्त खाणे. काही लोक हे जगण्यासाठी खातात तर काही खाण्यासाठी जगतात.

आजचा जमाना फास्ट फूडचा आहे. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच राईस असे पदार्थ आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणार नाही. लहान तर लहान, पण मोठी मंडळी सुद्धा हे पदार्थ आवडीने खाताना दिसून येतात. या सगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी टोमॅटो ketchup महत्त्वाचे आहे.

 

fast food inmarathi

 

आजकाल सगळ्यांच्या फ्रिजमध्ये टोमॅटो ketchup ची बॉटल असतेच असते. लहान मुले तर पोळीसोबत पण ketchup आवडीने खातात, पण तुम्हाला ऐकून कदाचित खरे वाटणार नाही, की टोमॅटो ketchup जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला विकार होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टोमॅटो ketchup मध्ये केमिकल्स आणि काही रसायने आहेत जी शरीरास घातक ठरतात. या रसायनांचा आणि केमिकल्स चा वापर फक्त चव येण्यासाठी केला जातो.

यामध्ये साखर, मीठ, फळांमध्ये असलेली साखर तसेच मक्याचे सूप यांचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो. ज्यावेळी हे सगळे पदार्थ एकत्र केले जातात, तेव्हा ते शरीरावर घातक परिणाम करतात.

टोमॅटो ketchup खाणे टाळण्याची काही प्रमुख कारणे :-

 

tomato ketchup inmarathi

 

१. अॅसिडीटी आणि अपचन :- टोमॅटो ketchup मध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे आपण नेहमीच आहारात टोमॅटो ketchup चा वापर करत असू, तर त्यामुळे छातीत जळजळ होते. ज्या लोकांना पचनाशी संबंधित काही अडचणी आहेत, विकार आहेत त्यांनी टोमॅटो ketchup खाणे कमी करावे.

२. लठ्ठपण, स्थूलता :- टोमॅटो ketchup मध्ये साखर आणि रसायने असतात. ज्यामुळे शरीरातील चरबी वाढते आणि पर्यायाने स्थूलता येते.

 

fat burning inmarathi

 

३. अॅलर्जी :- अॅलर्जी होणे म्हणजे एखाद्या पदार्थाचे आपल्या शरीराशी वावडे असणे. म्हणजेच एखादा पदार्थ आपल्या शरीरास न मानवणे. काही वेळा टोमॅटो ketchupमुळे जुलाब आणि उलट्या होऊ शकतात.

 

tomato ketchup inmarathi1

 

४. हृदयविकार :- टोमॅटो ketchup मध्ये चवीसाठी मक्याचे सिरप वापरले जाते. रोज जेवणात ketchupचा वापर केला, तर आपल्या शरीरात मक्याचे सिरप मिसळते, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतात.

५. सांधेदुखी :- ketchup मध्ये भरपूर प्रमाणात रसायने असतात, त्यामुळे छातीत जळजळ होते तसेच सांधेदुखीचा त्रास होतो.

६. मुतखडा :- ketchup मध्ये जास्त प्रमाणात मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ असल्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढते, त्यामुळे किडनीत खडा विकसित होण्याचा धोका संभवतो.

तसंही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. त्यामुळे प्रमाणात खा आणि स्वस्थ रहा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?