Site icon InMarathi

स्टेशनबाहेर २० रुपयांत जेवण करून काढले दिवस, संतोष जुवेकरचा प्रेरणादायी संघर्ष..

santosh juvekar inmarathi1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खाणं आणि झोप हे मनुष्याचे अत्यंत आवडीचे विषय. खाणाऱ्याने खात राहावे.. स्वतः खावे आणि इतरांनाही खाऊ घालावे हे अनेकांच्या आयुष्याचं ब्रीद वाक्य असेल. हल्ली तर सोशल मीडियामुळे अनेकजण ‘फूड क्रिटिक’ झाले आहेत. फूड ब्लॉगिंग, होम शेफ, होम बेकर यांना सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतोय.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे घरातील बायका कायम स्वयंपाकातच मग्न असायच्या, पण आता मात्र हे चित्र बदललं आहे. आता घरातील स्त्रिया सुद्धा नोकरी करतात, त्यामुळे प्रत्येकालाच स्वयंपाकघरात जबाबदारी घ्यावी लागते.

लॉकडाउनमध्ये तर या गोष्टीचं महत्त्व प्रकर्षाने जाणवलं. सगळेजण घरातच अडकले होते, त्यामुळे वेळ घालवण्यासाठी किचमध्ये विविध पदार्थ शिजू लागले. सुरुवातीला किचमध्ये काम करणं सगळ्यांसाठीच कठीण गेलं. धांदल उडाली, पण हळू हळू याही गोष्टीची सवय झाली.

अशीच धांदल सध्या झी मराठीच्या किचन कल्लाकार या शो मध्ये कलाकारांची उडताना दिसतेय. या शो मध्ये कलाकार येतात आणि त्यांच्यात खुसखुशीत पदार्थ करण्याची स्पर्धा रंगते. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक विषयांवर गप्पा सुद्धा रंगतात.

 

 

यंदाच्या आठवड्यात अभिनेता संतोष जुवेकर किचन कल्लाकरच्या सेटवर आला आहे आणि त्याने त्याची एक भावुक करणारी आठवण सांगितली.

कोणताही कलाकार सहज मोठा होत नाही, त्यामागे संघर्ष असतो. संतोषचा सुद्धा संघर्ष आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, ‘अभिनयाची सुरुवात केल्यानंतर मी मुंबईत राहायचो. पैसे कमी असायचे त्यामुळे कधी या मित्राकडे, कधी मावशीकडे असं जेवायला जायचो, पण रोज रोज कोण जेवायला घालणार? मग मी खार स्टेशनला बाहेर २० रुपयात एक थाळी मिळायची, तिथे जेवायचो. ३ पोळ्या, भाजी, डाळ- भात, कांदा, लिंबू, लोणचं असं जेवण मिळायचं.’

कोणी फोन केला, तर ‘अरे लीला मध्ये बसलोय’ असं खोटं सांगायचो’ असं संतोष म्हणाला.

 

 

हाच संघर्ष आणि चिकाटी तुम्हाला मोठं करत असते. आज संतोष एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचे अनेक चित्रपट लोकांच्या आवडीचे आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version