Site icon InMarathi

‘या’ घटनेनंतर बिप्स-बेबोने आयुष्यात पुन्हा कधीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला!

bips inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फिल्म इंडस्ट्रीत असलेल्यांचं आयुष्य केवळ त्यांच्या चित्रपटातल्या कामाभोवतीच फिरत नाही तर त्याखेरीज त्यांच्या इतर अनेक गोष्टीही मीडियातून वेळोवेळी ठळकपणे अधोरेखित होत असतात. बॉलिवूड इंडस्ट्री मुख्यत्वे चित्रपटांद्वारे लोकांचं मनोरंजन करणारी इंडस्ट्री असली तरी तो ‘शो बिझनेस’ही आहे.

हे क्षेत्र अत्यंत अस्थिर आहे. इथे तग धरून राहायचं असेल तर कलाकारांचं काम तर चांगलं हवंच पण त्याबरोबरीने कलाकारांचा फिटनेस, त्यांची लोकांमध्ये झालेली प्रतिमा, पॅपराझ्झीशी आणि इतर सहकलाकारांशी असलेलं वागणं याही गोष्टी त्यांच्या यशापयशावर परिणाम करतात. बॉलिवूडच्या कॅट फाइट्स ही गोष्ट काही आपल्यासाठी नवी नाही.

 

 

दोन अभिनेत्रींनमध्ये असलेल्या या बेबनावाची अनेक कारणं असू शकतात. त्यांना एकमेकांविषयी वाटणारी असुरक्षितता किंवा एकमेकींना कमी लेखणं असं कुठलंही कारण या कॅट फाइट्ससाठी पुरेसं ठरू शकतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही चांगली अभिनेत्री आहेच. पण आजवर ती इतरही कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. कपूर खानदानातल्या बाकीच्यांकडे असलेलं देखणं रूप तिलाही लाभलंय. ती फिटनेसच्या बाबतीतही अत्यंत जागरूक आहे. पण या बाबींखेरीज आजवर ती तिच्या अफेअर्ससाठी, गॉसिप क्वीन म्हणून, इंडस्ट्रीचे सगळे अपडेट्स असलेली म्हणून आणि तिच्या वेळेसच्या सहअभिनेत्रींसोबतच्या तिच्या कॅट फाइट्ससाठीही ओळखली जाते.

 

 

वर्णभेद हा बॉलिवूड इंडस्ट्रीलाही चुकलेला नव्हताच. आज जरी आपल्याला सावळ्या आणि डार्क कॉप्लेक्शन असलेल्या सुंदर सुंदर मॉडेल्स आणि अभिनेत्री दिसत असल्या तरी एकेकाळी इंडस्ट्रीत नव्या आलेल्या मुलींना त्यांच्या रंगावरून खिजवलं जायचं. त्यासाठी त्यांना वेगळं झुंजावं लागायचं. करीना कपूरनेही असा एक बालिश प्रकार एकेकाळी केला होता. बिपाशा बासूला ‘काली बिल्ली’ म्हणण्याचा.

बिपाशा बासू ही अभिनेत्रीदेखील एक चांगली अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. बिपाशाने अनेक उत्तमोत्तम भूमिका दिल्या आहेत पण ती मुख्यत्वे तिच्या राज, राज ३, आत्मा, अलोन, डरना जरूरी है या आणि अश्यांसारख्या अनेक भयपटांसाठी ओळखली जाते. आज जरी तिचे फारसे सिनेमे येत नसले तरी आजही ती तिच्या उत्तम फिटनेससाठी ओळखली जाते.

 

 

नेमकं काय घडलं?

बिपाशा आणि करीनामध्ये नेमका बेबनाव झाला तो ‘अजनबी’ या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान. २००१ साली आलेल्या ‘अजनबी’ या चित्रपटातून बिपाशा बासूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. बिपाशाखेरीज या चित्रपटात बॉबी देओल, करीना कपूर, अक्षय कुमार यांनीही काम केलं होतं.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका साध्या ड्रेसवरून या दोघींमध्ये प्रचंड वाद झाला. आज अतिशय मोठं नाव असलेलं व्यक्तिमत्त्व आणि करीनाचे त्यावेळेसचे डिझायनर विक्रम फडणीस यांनी तिची परवानगी न घेता बिपाशाला ड्रेससंदर्भात काहीतरी मदत केली होती. करीना त्यामुळे अतिशय चिडली. त्यांनतर त्या दोघींमध्ये चांगलंच भांडण जुंपलं आणि दोघींनी एकमेकींवर तोंडसुख घेतलं.

या दरम्यान करीना बिपाशाला ‘काली बिल्ली’ असं म्हणाली. एवढ्यावरच हे सगळं थांबलं नाही तर करीनाने रागाच्या भरात बिपाशाच्या कानाखालीही लगावली होती. या सगळ्या प्रकारानंतर आपण करीनासोबत भविष्यात पुन्हा कधीही काम करणार नाही असा बिपाशाने निर्णय घेतला.

 

२००१ साली फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत बिपाशा म्हणाली होती, “मला वाटतं की या सगळ्याला उगीचच फार जास्त महत्त्व देऊन राईचा पर्वत केला गेलाय. माझ्या बाजूने तर कुठलीच अडचण नव्हती. करीनाला डिझायनर विक्रम फडणीस यांच्या काही गोष्टी पटल्या नव्हत्या. या सगळ्यात मला खेचायचं खरंतर काहीच कारण नव्हतं. करीनाचं हे वागणं मला फारच बालिश वाटलं.” तेव्हाच आपल्याला करीनासोबत पुन्हा कधीही काम करायचं नाही हे बिपाशाने सांगितलं.

 

 

करीनानेदेखील एका मुलाखतीतून झाल्या प्रकाराविषयीचं तिचं मत मांडलं होतं. २००२ साली फिल्मफेअरलाच दिलेल्या मुलाखतीत करीना असं म्हणाली, “बिपाशाचा स्वतःच्या टॅलेंटवरती पुरेसा विश्वासच नाहीये असं वाटतं.

४ पानांच्या मुलाखतीत ३ पानं तर ती माझ्याचविषयी बोलली आहे. माणसाने स्वतःच्या कामाबद्दल का बोलू नये? तिच्या प्रसिद्धीमागचं कारण ‘अजनबी’ च्या चित्रीकरणादरम्यान तिचा माझ्याशी ड्रेस डिझायनर विक्रम फडणीस यांच्यावरून झालेला वाद हेच असावं. तिने अशी विधानं केली आहेत की मी तिला वाईटसाईट बोलले आहे. त्यात काही तथ्य नसून ते केवळ तिच्या मनाचे खेळ आहेत.”

हा वाद तेवढ्यावरच मिटला नाही तर ‘कॉफी विथ करण’ या वादग्रस्त कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनच्या एका एपिसोडमध्ये करीना बिपाशाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर जॉन अब्राहम याला ‘एक्सप्रेशनलेस’ असं म्हणाली होती. आपल्याला त्याच्याबरोबर काम करायला कधीही आवडणार नाही अशीही पुस्ती तिने जोडली.

बिपाशा जेव्हा या शो वर आली तेव्हा करीनाच्या म्हणण्याला प्रत्युत्तर म्हणून ‘करीना जरा जास्तच एक्सप्रेशन्स देते’ असं बिपाशा म्हणाली होती. मात्र २००८ साली करीनाचा तेव्हाचा बॉयफ्रेंड आणि आताचा नवरा सैफ अली खान यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला करीनाने बिपाशाला निमंत्रण पाठवलं. त्यानंतर त्या दोघींमधला वाद मिटला आणि आता त्यांचे एकमेकींशी चांगले संबंध आहेत. आज करीना आणि बिपाशा दोघीही आपापल्या आयुष्यात सुखी आहेत.

 

 

नेपोटीझमचं वास्तव जरी भीषण असलं तरी नेपोटीझमने इंडस्ट्रीला उत्तम अभिनेते-अभिनेत्रीही दिल्या आहेत. पण त्यांची अभिनयकौशल्यं ही एक गोष्ट झाली आणि त्यांची माणूस म्हणून असलेली प्रगल्भता ही दुसरी गोष्ट झाली. करीना निश्चितच एक उत्तम अभिनेत्री आहे. पण करीनाचं कधीकाळचं हे वागणं तिची त्या वयातली अपरिपक्वता आणि मग्रुरी दाखवतं यात शंकाच नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version