शास्त्रींप्रमाणेच गूढ मृत्यू : या रेल्वेमंत्र्यांच्या हत्येमागे तत्कालीन पंतप्रधानांचा हात होता का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण भारतीयांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण, आपल्या भारतात अशा काही घटना घडल्या आहेत, काही न्यायालयीन प्रकरणांचे असमाधानकारक निकाल समोर आले आहेत ज्यामुळे साशंकतेला वाव मिळतो.
जेसिका लाल, तलवार, श्री. लालबहाद्दूर शास्त्री हे असे काही उदाहरण आहेत ज्यांच्या मृत्यूची खरी कारणं, मारेकरी याची पूर्ण माहिती जनतेला आज कित्येक वर्षांनी सुद्धा मिळालेली नाहीयेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
ललित नारायण मिश्रा या बिहारच्या माजी रेल्वे मंत्र्याचं नाव सुद्धा याच यादीत जोडलं जातं. कारण, ४६ वर्षानंतर आजही त्यांच्या मृत्यूचं कारण हे गूढ आहे हे आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासाठी पुरेसं आहे.
ललित नारायण मिश्रा यांचा जन्म मिथिला येथे झाला होता. राजकारण आणि समाजकारण या दोन्हींमध्ये ते प्रभावशाली होते. ‘ललित बाबू’ या टोपण नावाने बिहारमध्ये ओळखलं जाणारं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने पंतप्रधान पदाचं दावेदार होतं असं राजकीय विश्लेषक सांगतात.
ललित नारायण मिश्रा हे जर जिवंत असले असते तर १९७० च्या दशकात जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध केलेलं आंदोलन हे घडलंच नसतं असंही जाणकार सांगतात.
२ जानेवारी १९७५ हा दिवस बिहारची जनता कधीच विसरू शकणार नाहीत असा होता. बिहारमधील ‘समस्तीपुर ते मुझफ्फरपुर’ या ब्रॉड गेज रेल्वे लाईनचं त्या दिवशी उदघाटन होणार होतं. या कार्यक्रमासाठी त्यांचे भाऊ जगन्नाथ मिश्र, बिहारची जनता आणि ललित बाबूंचे समर्थक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदघाटन सोहळा झाल्यावर ललित नारायण मिश्रा यांचं भाषण होणार होतं. कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
संध्याकाळी पावणे सहा वाजता ललित बाबू आपलं भाषण संपवून व्यासपीठावरून खाली उतरत होते. त्याचवेळी समस्तीपुर रेल्वे स्थानकावरील त्या मंचावर एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि क्षणात समारंभाचं वातावरण भीतीदायक झालं. ललित नारायण मिश्रा हे या स्फोटात जबर जखमी झाले.
रेल्वे मंत्री असलेले ललित बाबू हे समस्तीपुरच्या कार्यक्रमाला एका विशेष रेल्वेने आले होते. जखमी अवस्थेत असतांना त्यांनी सांगितलं की, “मी ज्या रेल्वेने आलो आहे मला त्याच रेल्वेने दानापूर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन चला.”
समस्तीपुर रेल्वे स्थानकावर झालेल्या या घटनेचा पंचनामा करण्यात प्रशासनाने दोन तासांचा वेळ घेतला. रात्री ८ वाजता ललित बाबू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गाडी समस्तीपुरहून दानापूरसाठी रवाना झाली.
रात्री १२ वाजता ही स्पेशल ट्रेन दानापूरला पोहोचली. डॉक्टरांची एक टीम दानापूर रेल्वे स्थानकावर बोलावण्यात आली होती. ललित नारायण मिश्रा यांच्या पायात बॉम्बचे छर्रे घुसले होते. शस्त्रक्रिया करून ते काढावे लागतील असं डॉक्टरांनी मंत्र्यांच्या जथ्थ्याला सांगितलं.
दानापूरच्या प्रशासकीय इस्पितळात शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. शस्त्रक्रियेला ललित बाबूंची प्रकृती सुरुवातीला साथ देत होती. पण, नंतर त्यांची प्रकृती ढासळत गेल्याचं सांगण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
ललित नारायण मिश्रा हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय मानले जायचे. एका मंत्र्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू होणे ही घटना बिहार आणि देशासाठी छोटी नव्हतीच.
–
- देशवासियांची झोप उडवणाऱ्या ह्या ८ क्रूर हत्याकांडामागचा शोध आजवर का लागलेला नाही?
- लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं गूढ : रशियन KGB च्या कपटाचा परिपाक?
–
बॉम्बस्फोट आणि मृत्यूचा तपास करण्याची जबाबदारी ही त्वरित सीबीआय कडे सोपवण्यात आली होती. तपास पूर्ण होईपर्यंत बिहारच्या सीआयडी पथकाला सुद्धा सीबीआयची साथ देण्याचे आदेश देण्यात आले.
तपास सुरू असतांना काही लोकांना अटक करण्यात आली. संशयितांची विचारपूस करतांना हे सत्य समोर आलं की, बिहार मधील ‘आनंद मार्ग’ या भागातील सरपंच आनंद मूर्ती यांच्या अटकेचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. पण, ललित नारायण मिश्रा यांच्या कुटुंबीयांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.
त्यांच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन सीबीआयच्या तपासात असलेल्या त्रुटी लोकांसमोर आणल्या होत्या. ललित बाबूंची हत्या ही ‘आनंद मार्ग’च्या लोकांनी नाही तर केंद्र सरकार मध्ये त्यांचं वजन वाढू नये या हेतूने काही राजकीय नेत्यांनी हा घातपात घडवून आणला आहे.
३ फेब्रुवारी १९७५ रोजी या प्रकरणात अरुण कुमार ठाकूर या आरोपीला अटक करण्यात आली. “आपल्याला ‘झा बॉस’ ने ३० डिसेंबर १९७४ रोजी समस्तीपुर रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कार्यक्रमात बॉम्ब फेकण्याची सुपारी दिली होती” अशी कबुली अरुण कुमारने दिली होती.
आपल्या तीन साथीदारांसह हॅन्ड ग्रेनेडने आपण हे काम केल्याचं त्याने सीबीआय चौकशीत सांगितलं. बिहारचे राजकीय नेते ‘रामविलास झा’ यांचा या प्रकरणामागे हात असल्याचं सीआयडीलासुद्धा तपासातून निष्पन्न झालं होतं.
२०,००० रुपयांच्या बोलीवर अरुण कुमार ठाकूर हे दुष्कृत्य करण्यास तयार झाला होता असं त्याने सांगितलं. सीबीआयच्या तपासात असं समोर आलं की, रामविलास झा यांच्यासोबत यशपाल कपूर हेसुद्धा या प्रकरणात दोषी आहेत.
बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर हे सीबीआयच्या तपासाने समाधानी नव्हते. त्यांनी सरकारी वकील ‘तारकुंडे’ यांना सुद्धा या तपासात पोलीस यंत्रणेची साथ देण्याची विनंती केली.
तारकुंडे वकिलांनी या प्रकरणावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मौनाचं आश्चर्य व्यक्त केलं. पण, इंदिरा गांधी यांनी या प्रकरणात कोणतीही रुची दाखवली नाही.
इतर प्रकरणात होतं तसं, काही दिवसांनी अरुण कुमार ठाकूर आणि त्याचा साथीदार अरुण कुमार मिश्र यांची ठोस पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आलं. ललित नारायण मिश्रा यांची हत्या झालेली असूनही त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं नव्हतं. विशेष रेल्वे समस्तीपुर निघण्यास दोन तास उशीर का लागला? या प्रश्नांची उत्तरं कधीच समोर आली नाहीत.
२०१४ मध्ये या प्रकरणाची फाईल परत एकदा उघडण्यात आली होती. दिल्ली हायकोर्टात या प्रकरणाची सूनवाई झाली होती. चारही संशयित आरोपींची चौकशी केल्यावर गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
ललित नारायण मिश्रा यांचे कुटुंबीय हे आजही हे प्रकरण काँग्रेस पक्षाच्या हस्तक्षेपामुळे दडपण्यात आलं हेच सांगत असतात.
बिहारचे रेल्वे मंत्री आणि देशाचे पहिले कॅबिनेट मंत्री असलेल्या ललित नारायण मिश्रा यांचा खून होतो आणि त्यांचे मारेकरी कोण? हे अद्याप सिद्ध होत नाही हे एक मोठं आश्चर्य आहे.
‘आपल्यापेक्षा’ अधिक लोकप्रियता कोणाची होऊ नये यासाठी ललित नारायण मिश्रा यांना गव्हातून खडा काढतात तसं बाजूला काढून टाकण्यात आलं हे त्यावेळच्या जनतेला सुद्धा कळलं असेलच. फक्त, आजच्या इतकी माध्यमं उपलब्ध नसल्याने हे प्रकरण भारताची जनता लवकर विसरली असावी.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.