‘मुस्लिम विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारात भाग घेऊ नये’: AIMPLB बोर्डाचा दावा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अनेकांच्या लहानपणी चिंचा, बोरे, मातीतले खेळ, सायकलिंग याचबरोबरीने एका कार्यक्रम नित्यनियमाने असायचा तो म्हणजे सूर्यनमस्कार घालण्याचा, घरातील वडीलधारी मंडळी अगदी मागे लागून आपल्याकडून सूर्यनमस्कार घालून घेत असत.
सूर्यनमस्कार म्हणजे खरे तर संपूर्ण अंगांचा व्यायाम, सूर्यनमस्कारामुळे संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा होतो. व्यायामातील एक शास्त्रोक्त प्रकार म्हणून हा ओळखला जातो. अगदी प्राचीन काळापासून हा व्यायाम प्रकार चालत आला आहे.
सूर्यनमस्कार म्हणजे सूर्योदयाच्या वेळी एका विशिष्ट क्रमाने १२ योगासने करणे म्हणजे सूर्यनमस्कार, हिंदू धर्मात सूर्याला महत्व मोठया प्रमाणावर आहे. अगदी प्राचीन काळापासून सूर्याला देवता मानतात. सकाळी उठल्या उठल्या सूर्य देवाचे दर्शन घेऊन काम सुरु करणारे देखील अनेक लोक आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शाळांमध्ये देखील हा व्यायाम प्रकार नित्यनित्यामाने असायचा, या सर्वांग सुंदर व्यायामाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने विरोध केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात….
नेमकं काय आहे प्रकरण :
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या म्हणण्यानुसार ‘सरकारने स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ वर्षानिमित्ताने शाळांमध्ये १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सूर्यनमस्कार आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर मुस्लिम बोर्डाचे असे म्हणणे आहे की सूर्यनमस्कार हा सूर्याची उपासना करण्याचा मार्ग आहे आणि इस्लाम त्याला परवानगी देत नाही.
बोर्डाने घेतला संविधानाचा आधार :
बोर्डाचे महासचिव मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी यांनी असे म्हंटले की ‘भारत हा धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि विविध संस्कृती असेलला देश आहे. याच तत्वांच्या आधारे आपली राज्यघटना लिहली गेली आहे. राज्यघटनेमध्ये असे नमूद केले आहे की सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये विशिष्ट धर्माची शिकवण देण्याची किंवा विशिष्ट समूहाच्या श्रद्धांवर आधारित उत्सव आयोजित करण्याची परवानगी देत नाही’.
–
- जेव्हा खुद्द गांधीजीनीसुद्धा राष्ट्रगीतासाठी उभं राहण्यास नकार दिला
- या मुस्लिम देशात ऍडल्ट सिनेमांवर आता सेन्सॉरची कात्री चालणार नाही!
–
मौलाना यांनी पुढे बोलताना सरकारवर टीका केली ते असं म्हणाले की, ‘सरकार धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वापासून दूर जात आहे. बहुसंख्य समाजाची विचारसरणी परंपरा देशातील सर्व घटकांवर लादण्याचा प्रकार सरकार करत आहे. इस्लाम प्रमाणे देशातील इतर अल्पसंख्यांक सूर्याला देवता मानत नाहीत तसेच त्याची उपासना देखील करत नाही.
नेमका काय आहे प्रोजेक्ट?
भारत सरकारने शिक्षण मंत्रालयाला पत्र लिहून असे कळवले की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाच्या बॅनरखाली राष्ट्रीय योग फेडरेशनच्या अंतर्गत १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान ७५० दशलक्ष सूर्यनमस्कार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीला संगीतावर आधारित सूर्यनमस्कारचे ही नियोजन केले आहे.
आज सरकार हिंदू राष्ट्र निर्माण करत आहे, अशी टीका विरोधी पक्षातून कायमच होताना दिसून येत आहे. आज योगा सूर्यनमस्काराचे महत्व सरकार जनतेला पटवून देत आहे मात्र शरीरासाठी फायद्यच्या असणाऱ्या गोष्टीना सुद्धा जाती धर्माचे रंग लावले जात आहेत. आज परदेशात सुद्धा योगा आणि सूर्यनमस्काराचे महत्त्व वाढले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.