Site icon InMarathi

२५७ करोड कॅश, किलोभर सोनं चांदी: अत्तर बिझनेसमधला पाब्लो एस्कोबार पियुष जैन

piyush jain inmarathi feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतातील कन्नौज हे ठिकाण पूर्वापार अत्तरांसाठी परिचित शहर आहे. कन्नौजी अत्तरं हा भारतियांच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय असला तरी अलिकडे मात्र कन्नौजचं नाव बातम्यांमधून एका भलत्याच कारणासाठी चर्चिलं जात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कन्नौजमधले अत्तर, पानमसाला व्यापारी असणारा पियुष जैन काल परवा पर्यंत एक साधारण असा व्यावसायिक होता. कन्नौजबाहेर त्याला कोणीही ओळखत नव्हतं मात्र आज पियुष जैन सगळ्या वाहिन्यांच्या ब्रेकिंग न्यूज आणि वृत्तपत्रांतल्या हेडलाईनवर जाऊन बसला आहे.

एका सामान्य व्यावसायिकाच्या घरावर डिजीजीआयने छापा मारून तब्बल १९५ कोटी इतकी रोकड जप्त केली. आजवरच्या छाप्यातली ही सर्वात मोठी रोख रक्कम म्हणून नोंदवली गेली आहे.

काही महिने पियुष जैनवर पाळत असणार्‍या डीजीजीआयला पियुष जैन काहीतरी आर्थिक घोळ करत असल्याचा अंदाज होताच मात्र पियुषच्या तळघरात मिळालेल्या नोटांच्या थप्प्यांचा हिमायल पाहून तेही चकीत झाले.

 

 

इतकंच नाही, तर पियुष जैनच्या वडिलोपार्जित घरातून १९ कोटींची रोकड १० कोटींहून अधिक २३ किलो सोनं आणि ६ कोटींचं चंदन तेल जप्त करण्यात आलं आहे. इतकं सगळं घरात दडवून बसलेला पियुष जैन आहे तरी कोण?

अत्तर आणि पान मसाला, तंबाखू यांचा व्यापारी असणार्‍या पियुष जैननं जीएसटीमध्ये घोटाळा करत करोडो रुपयांची संपत्ती जमा करायला सुरवात केली होती.

अत्यंत हुशारीनं त्याने ही चोरी करायला सुरवात केली असली तरीही त्याच्याच एका ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा घोटाळा निदर्शनास आला आणि तब्बल दोन महिने पियुषच्या सर्व व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं होतं.

त्याचे सर्व व्यवहार, कंपन्या ट्रॅक केल्या जात होत्या. पुरेशी माहिती गोळा झाल्यानंतर योजनाबध्दपध्दतीनं पियुषच्या घरावर आणि इतर मालमत्तेवर छापा टाकण्यात आला.

 

 

पियुषच्या घरावर छापा मारून जी करोडो रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यातली त्यावर पियुषच्या शेजार्‍यापाजार्‍यांचा इतकंच काय खुद्द त्याच्या कुटुंबियांचाही विश्र्वास बसत नव्हता कारण अत्यंत साधं रहाणीमान असणार्‍या पियुषकडे इतकी संपत्ती असेल हे कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं.

आजही पियुष स्कुटरवरून पायात स्लिपर आणि अंगावर साधे कपडे घालून फिरतो. ज्या माणसाकडे कोट्यावधींची रोकड घरात पडून आहे त्याच्याकडे चारचाकी नसावी यावरही कोणाचा विश्र्वास बसणं कठीण आहे.

कन्नौजमधल्या पियुषच्या घोट्याळाचे धागे अहमदाबादधे जाऊन त्यांची उकल झाली. पियुषच्या शिखर पानमसाल्याला अहमदाबादमधे मागणी असल्यानं त्याच्या तानसेन ब्रॅण्डचा हा पानमसाला अहमदाबादमधे येत असे. साधारण तीन महिन्यांपूर्वी यातीलच एक ट्रक नियमीत तपासणीत अडविला गेला.

हा अडविलेला ट्रक पियुषचा भाऊ प्रविण जैन याच्या गणपती ट्रान्सपोर्टचा आहे. या तपासणीत असं आढळलं की, दोनशे बनावट रिसिट बनवून मालाची अफरातफर झाकण्यात आली आहे.

 

 

रिसिटमधील घोटाळ्याची शंका आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आणि त्यांनी पियुषच्या व्यवहारांवर लक्ष ठेवलं. डिजीजीआयची संपूर्ण टीम कानपूरमध्ये तळ ठोकून बसली आणि तब्बल ३ महिने पियुषच्या सर्व कारखाने आणि कार्यालयातील आर्थिक व्यवहार ट्रॅक करत त्यातल्या घोटाळ्यांबाबत पुरावे जमा झाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला मात्र या छाप्यानंतर कल्पनाही केली नव्हती इतकी रोकड जप्त करण्यात आली.

या छाप्यात असं आढळलं की, कानपूरमधे ४, कन्नौजमधे ७, मुंबईत २ आणि दिल्लीत १ अशा एकूण १६ हून जास्त मालमत्ता पियुषच्या मालकीच्या आहेत, ज्यांची किंमत कोट्यावधींची आहे. इतकंच नाही तर पियुषच्या दुबईतही दोन प्रॉपर्टी असल्याचं या छाप्या दरम्यान आढळलं आहे.

पियुषचं उत्तर प्रदेशातील राजकीय पक्षाशी असणारं साटलोटंही या प्रकरणामुळेच प्रकाशात आलं आणि एकूणच या विषयाला एक वेगळी दिशा मिळाली.

 

 

पियुष जैनच्या नावावर चाळीसएक कंपन्यांची मालकी आहे. यात कोल्ड स्टोअरेज, पेट्रोल पंप, अशा व्यवसायांचा समावेश आहे.

पियुषने त्याच्या वडिलांकडून त्यांची वंशपरंपरागत अशी अत्तर बनविण्याची कला शिकली आणि त्यानंतर कानपूरमधे स्वतंत्र व्यवसायाला सुरवात केली. गेल्या पंधरा वर्षांपासून पियुष या व्यवसायात आहे. आज त्याच्या अत्तराचा व्यवसाय देशविदेशात पसरलेला आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version