आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
उद्या एस.एस.राजमौली दिग्दर्शित बहुचर्चित RRR हा चित्रपट सिनेगृहात धडकणार आहे. याचे टीजर, पोस्टर्स, ट्रेलर याबद्दल तर सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ सुरू आहे.
बाहुबली या पाहिल्या वाहिल्या पॅन इंडिया सिनेमानंतर हा राजमौली यांचा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि केवळ भारताचं नव्हे तर साऱ्या जगाचं लक्ष या सिनेमाकडे आहे, कारण ज्यापद्धतीने बाहुबली सिनेमाच्या दोन्ही भागांनी जगभरात जी क्रेझ निर्माण केली तशीच क्रेझ हा RRR निर्माण करू शकेल का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे.
बाहुबली प्रमाणेच हा सिनेमासुद्धा ग्रँड आहे, डोळ्याचं पारणं फिटेल असे अॅक्शन सिक्वेन्स यात आहेत, त्याबरोबरच प्रत्येक माणसाच्या काळजाला भिडणारी कथा आहे. शिवाय काही ऐतहासिक घटनांचा संदर्भ देऊन एक काल्पनिक कथानक एका मोठ्या लेवलवर मांडण्याचं काम राजमौली यांनी चोख बजावलं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
सिनेमाच्या ट्रेलर बघूनच लोकं इतकी सैरभैर झाली आहेत की कधी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला मिळतोय हीच उत्सुकता लागून राहिली आहे.
साऊथचे दोन मेगास्टार्स ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे दोघेही या सिनेमात एकत्र बघायला मिळणार आहेत. राजमौलीचा सिनेमा म्हंटल्यावर सगळं भव्यदिव्य विश्व बघायला मिळणार हे नक्की असतंच पण या सिनेमात २ पॉवरफूल स्टार्सची जुगलबंदीसुद्धा या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
याशिवाय बॉलिवूडचे २ मोठे चेहेरेसुद्धा आपल्याला यात बघायला मिळणार आहेत ते म्हणजे आलिया भट आणि अजय देवगण. हे दोघेही यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.
याविषयी जेव्हा राजमौली यांना विचारणा झाली की या दोन बॉलिवूडच्या स्टार्सना घेण्यामागे हिंदीभाषिक प्रेक्षकांना आकर्षित करणं हा उद्देश आहे का? तर यावर राजमौली यांनी स्पष्टपणे नमूद केलं, की “जरी यांची भूमिका छोटी असली तरी संपूर्ण विचारांतीच त्यांना यात घेतलं आहे किंबहुना काही ठिकाणी या दोघांच्या पात्रांचं महत्व २ मुख्य अभिनेत्यांच्या पात्रापेक्षा जास्त आहे हे सिनेमा बघताना जाणवेल!”
–
- आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!
- महिष्मती साम्राज्य आठवतंय का? भारतातील या नदीकाठी होत असंच एक मोठं साम्रज्य! वाचा
–
गेल्या महामारीच्या काळात एकंदरच मनोरंजन विश्वाचं जे मोठं नुकसान झालं ते या ग्रँड सिनेमाच्या माध्यमातून भरून निघेल आणि पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर तूफान गर्दी होईल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे.
सिनेमाच्या ट्रेलरवरून तर आपल्या सगळ्यांनाच अंदाज आला असेल की यात कित्येक कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. एकंदरच सिनेमाचं सादरीकरण, स्पेशल इफेक्ट, vfx, अॅक्शन सीन्स इतके ग्रँड आहेत की ते बघताना आपल्याला एखादी हॉलिवूड फिल्म बघतोय असंच वाटेल आणि हीच राजमौली यांची खासियत आहे.
त्यातल्याच एका सीनविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. सिनेमाचा जेव्हा टीझर आला तेव्हा ज्युनियर एनटीआर वर चित्रित झालेल्या एका सीनने लोकांना अक्षरशः स्तब्ध केलं तो सीन म्हणजे वाघासमोरचा सीन.
हा सीन बघताना एवढा खराखुरा वाटतो पण प्रत्यक्षात कोणत्याही जनावराला इजा न पोहोचवता फक्त vfx च्या माध्यमातून त्या वाघाला तयार करण्यात आलं आहे. या एका सीनमागेच तब्बल १०००० हून अधिक VFX आर्टिस्टची मेहनत असल्याचं स्पष्ट झालंय तर पूर्ण सिनेमाबद्दल तर विचारायलाच नको.
हा सीन बघून साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा प्रभू हिने ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये ती असंही म्हणाली की “काही क्षण मला तो खरा वाघच वाटला!”
खरंच तो सीन इतक्या बारकाईने सादर केला आहे की त्यात काहीच खोट काढता येणार नाही, शिवाय या सीनसाठी खर्च झालेली रक्कम ऐकून तुमचे डोळे पांढरे पडतील.
हा सीन शूट करण्यासाठी तब्बल ७५ लाख रुपये प्रतीदिवस खर्च करावे लागले अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात होताना दिसत आहे. एका सीनसाठी दिवसाला ७५ लाख रुपये खर्च करणाऱ्या या सिनेमाचं एकूण बजेटबद्दल तर आपण विचार न केलेलाच बरा.
अर्थात राजमौलीसारखा दिग्दर्शक असताना कोणताही निर्माता अगदी हसत हसत त्याची झोळी रिकामी करेल कारण राजमौली सिनेमा करणार म्हणजे त्यातून छप्परफाड कमाई होणार हे तर नक्कीच आहे.
ज्याप्रमाणे भाषांची बंधनं तोडून बाहुबली हा सिनेमा साऱ्या देशाने सेलिब्रेट केला अगदी तसाच RRR हा सिनेमासुद्धा अनेक रेकॉर्ड मोडून प्रेक्षकांच्या मनात बाहुबलीची जागा घेऊ शकणार की नाही ते आता कळेल!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.