आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कबीर खान दिग्दर्शित रणवीर सिंगचा बहुचर्चित ८३ हा सिनेमा गेल्या आठवड्यात सिनेमागृहात प्रदर्शीत झाला. १९८३ च्या वर्ल्डकपची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक होते.
सिनेमा डिजिटल माध्यमावर रिलीज न करण्याचा निर्णय घेतल्याने निर्मात्यांना बराच भुरदंड सहन करावा लागला होता. अखेरीस तो सिनेमागृहात प्रदर्शित झाला पण या सिनेमाची गणती फ्लॉप सिनेमांमध्ये होऊ शकते असे काही सिनेतज्ञांचे मत आहे.
सिनेमावर एवढा खर्च करून, 3d मध्ये सिनेमा तयार करून, एवढा गाजावाजा करूनही या सिनेमाला अपेक्षित आकडे गाठण्यात अपयश आलंय अशी चर्चा फिल्मी दुनियेत रंगतान दिसतीये.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
एकतर क्रिकेट, त्यातून ८३ च्या विश्वचषकाची गोष्ट आणि भारतीय संघाचा संघर्ष हे सगळं असूनसुद्धा सिनेमाने म्हणावी तशी कमाई केलेली नाही असं बोललं जातंय.
बॉलिवूड हंगमाच्या एका सूत्रानुसार निर्मात्यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत नाराजीचा सुर उमटवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या मते “हा सिनेमा म्हणजे १९८३ च्या वर्ल्डकपवर केलेल्या डॉक्युमेंटरीसारखा आहे, एका कमर्शियल सिनेमात जे अपेक्षित आहे तसं यात काही नाही. प्रोडक्शन टीममधल्याच काही लोकांनी ही चूक दर्शवून दिली आहे!”
शिवाय काहींनी असंसुद्धा म्हंटलं की लॉर्ड्ससारख्या मोठ्या मैदानावर जाऊन शूटिंग करायची काहीच गरज नव्हती. अशा सगळ्या गोष्टीत पैसा खूप लागला असून त्याच बजेटमध्ये किंबहुना त्याहून कमी बजेटमध्ये भारतातल्या एखाद्या स्टेडियमवर किंवा vfx च्या माध्यमातून हे सगळं सहज शक्य झालं असतं!
हा सिनेमा ज्यापद्धतीने प्रमोट केला गेला त्यातुलनेत या सिनेमाने केलेली कमाई ही फारच कमी आहे आणि याचा फटका निर्मात्यांना तसेच सिनेमात काम करणाऱ्या मोठ्या अभिनेत्यांनासुद्धा बसण्याची शक्यता आहे.
कबीर खानसाठी हा सिनेमा खूप महत्वाचा आहे कारण याधीचा त्याचा सिनेमा ट्यूबलाईटसुद्धा सपशेल आपटला होता. ८३ मधून जर अपेक्षित कमाई नाही झाली तर कबीर खान या दिग्दर्शकावर आणखीन एक फ्लॉपचा ठप्पा बसेल.
शिवाय रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण या दोघांनासुद्धा निर्माता असल्याकरणाने भुरदंड सहन करावा लागू शकतो, इतकंच काय तर झालेलं नुकसान बघता रणवीरला मिळणाऱ्या ठराविक रकमेवरसुद्धा त्याला पाणी सोडावं लागेल असं म्हंटलं जातंय!
–
- पैसा प्रसिद्धी नव्हे तर केवळ देशाच्या स्वाभिमानासाठी खेळलेल्या भारतीय संघासाठी ८३ बघा!
- “83”- वर्ल्डकपची गोष्ट कपिल देवकडून ऐकण्यासाठी किती फी मोजावी लागली?
–
२४ डिसेंबर रोजी हा सिनेमा ३००० स्क्रीन्स आणि ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित केला असूनसुद्धा या सिनेमाने आत्तापर्यंत जेमतेम ५० कोटीचा बिझनेस केला आहे. ट्रेड एक्स्पर्ट आणि शोबीझनेसच्या अंदाजानुसार या सिनेमाचं बजेट आणि कमाईचा आकडा यात जमीन आसमानाचा फरक आहे.
महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात अजूनही सिनेमागृह ही ५०% क्षमतेवरच सुरू आहेत, त्यातून स्पायडरमॅन नो वे होम किंवा पुष्पासारख्या हीट सिनेमांना बगल देऊन थिएटर मालकांना ८३ साठी जास्त शो द्यावे लागल्याने त्यांनीसुद्धा आता नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
यामुळेच आता बरेच थिएटरमालक ८३ चे शो कमी करून इतर हीट सिनेमांना शो उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहेत. कारण आधीच त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना ८३ साठी शो ठेवून त्यातून कमाई न होणं हे त्यांच्यासाठी आणखीन नुकसानकारक ठरेल!
या सिनेमाची जेवढी हवा केली होती त्यामानाने या सिनेमाला तसा थंडच प्रतिसाद मिळाला. सुरुवातीचे २ दिवस बघून असं वाटत होतं की हा सिनेमा सगळे रेकॉर्ड मोडेल, पण एकंदर सिनेमाचं सादरीकरण, लांबी यामुळे त्याच्या बिझनेसवर चांगलाच परिणाम झाला आहे!
आर्थिक गणितं बघता हा सिनेमा कुणीही फ्लॉप ठरवला तरी सिनेमा उत्तमरीत्या सादर केला आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत सगळंच उत्कृष्ट आहे, सिनेमा थिएटरमध्ये बघताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी भाऊकसुद्धा करेल यातही काही शंका नाही.
काही काही चित्रपट हे फक्त त्यात मांडलेल्या कथेसाठी आणि त्यातल्या भावनेसाठी बघायचे असतात त्यापैकीची एक ८३. आर्थिकदृष्ट्या जरी सिनेमा गंडला असला तरी येणाऱ्या काळात डिजिटल हक्क आणि इतर गोष्टींच्या जोरावर निर्मात्यांचं नुकसान भरून काढण्यात तो यशस्वी ठरेल हे अशी आशा व्यक्त करुयात!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.