आदित्य ठाकरेंना डिवचणे असो किंवा खंडणी प्रकरण, वादग्रस्त नितेश राणे…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
यंदाचं हिवाळी अधिवेशन राजकारण्यांच्या आरोप प्रत्यारोपापेक्षा नक्कल, चिडवाचिडवीवरून जास्त गाजलं, याची खरी सुरवात झाली ते भास्कर जाधवांमुळे, भास्कर जाधवांची जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मोदींवर टीका केली, टीका फक्त तेवढ्यापुरती राहिली नसून त्यांनी खुद्द मोदींची नक्कल केली होती, यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आणि माफी मागण्यास आग्रह धरला होता आणि त्यांनी माफी सुद्धा मागितली.
भास्कर जाधवांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी आपले शब्द मागे घेतले, हे प्रकरण संपत नाही तर दुसऱ्याच दिवशी जेव्हा विरोधी पक्षातील काही नेते विधानभवना बाहेरच आंदोलन करत होते, आदित्य ठाकरे विधान भवनामध्ये शिरताना विरोधी पक्षातील नितेश राणे यांनी म्याऊ म्याऊ असा आवाज काढून अप्रत्यक्षरीत्या त्यांना चिडवले होते , त्यांच्या प्रकारावरून विधानपरिषदेत चांगलेच पडसाद उमटले, शिवसनेच्या नेत्यांनी नितेश राणेंच्या या प्रकारावर चांगलीच टीका केली. त्यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा केली जात होती..
एकीकडे निलंबनाची मागणी होत असताना दुसरीकडे त्यांच्या अटकेची हालचाल होताना दिसून येत होती, त्याच कारण असं आहे की त्यांच्या कणकवली मतदार संघातील संतोष परब या व्यक्तीवर ४ लोकांनी धारधार शस्त्रांच्या आधारे हल्ला केला. पोलिसांनी तपास चालू केल्यावर संशयाची सुई थेट नितेश राणेंपर्यंत पोहचली होती.
बरेच दिवस नितेश राणे यांना अटक होणार का अशी चर्चा होती, अखेर न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, याआधी सुद्धा ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते, चला तर मग जाणून घेऊयात….
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरे?
नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील वाद गेल्या वर्षीपासून जास्त दिसून येत आहे. सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात होता असा गौफ्यस्फोट त्यांनी केला होता. मात्र पोलीस आणि सिबीआयने केलेल्या संशोधनात काहीच निष्पन्न झाले नाही. शिवसेनेच्या संजय राऊतांवर नितेश राणे कायमच तोंडसुख घेत असतात.
गुजराती हटाव :
२०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यांनतर त्यांनी अनेक कार्यक्रम हाती घेतले होते त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे स्वच्छता अभियान, मोदींच्या या कार्यक्रमावर टीका करताना नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये असं तेव्हा म्हणाले होते की ‘या अभियानात मी देखील समाविष्ट होऊ इच्छितो याची सुरवात मुंबईपासून करूयात, मराठीद्वेष्टा जो गुजराती समाज आहे त्यांना साफ करून टाकुयात. नितेश राणे तेव्हा काँग्रेस पक्षाचे उमदेवार होते, मोदी लाटेमुळे तेव्हा काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता.
खंडणी प्रकरण :
मुंबईमधील जुही परिसरातील हॉटेल मालकाने नितेश राणे यांच्याविरोधात २०१७ साली FIR दाखल केली होती. हॉटेल मालकाने FIR मध्ये म्हंटले होते की, नितेश राणे यांना हॉटेलमध्ये भागीदारी हवी होती मात्र आम्हाला ते मान्य नव्हते, त्यांनी सातत्याने आमच्यावर दबाव टाकला आणि नंतर दरमहा १० लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली.
यावर नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की, हा प्रकार गैरसमजातून निर्माण झाला आहे. हॉटेलचा भागीदार माझा मित्र आहे आम्ही चर्चा करून यावर तोडगा काढू. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक सुद्धा केली होती.
चिखलफेक प्रकरण :
आजही चारकमानी कोकणात आपल्या गावाला जाण्यासाठी ट्रेनसारखा पर्याय निवडतो कारण मुंबई गोवा महामार्ग हा खराब असल्याने पर्यायी गावाला पोहचयाला उशीर होत असल्याने अनेकजण ट्रेनचा पर्याय निवडतात. महामार्गाच्या खराब कामगिरीवरूनच संतप्त होऊन नितेश राणे यांनी महामार्गाचे काम बघणाऱ्या इंजनियरवर चिखलफेक केली होती.
नितेश राणे यांच्या कृत्यामुळे नारायण याने यांनी तेव्हा माफी देखील मागितली होती, तसेच नितेश राणेंना अटक सुद्धा झाली होती मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका देखील झाली.
–
- राजकारणातील ‘बाप’ मंडळी घरी ‘बाबा’ म्हणून अशी असतात! एक दुर्मिळ फोटो अल्बम
- राणेंच्या मुलाने ओव्हरटेक केलं, म्हणून आदित्य ठाकरेंनी पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा…
–
टोल नाक्यावरील तोडफोड प्रकरण :
रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी एका मुलाखतीत म्हणाले होते की रस्ते वापरायचे असतील तर तुम्हाला टॅक्स द्यावाच लागेल, या प्रमाणे सर्वसामान्य माणूस टोल भरतोच. मात्र नितेश राणे यांनी टोल भरण्यास नकार दिला होता, झालं असं की ते गोव्याकडे निघाले होते, गोव्यात शिरताच धरगळ तोल नाक्यावर त्यांची अडवणूक करण्यात आली.
टोल भरण्यास नकार दिल्याने तिकडच्या लोकांशी नितेश राणे यांचा वाद झाला, नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी टोलबूथची तोडफोड केली. यावर स्थानिक पोलिसांनी FIR सुद्धा दाखल केली होती.
सध्या नितेश राणे यांच्या नव्या प्रकरणावरून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे, त्यांचे वडील नारायण राणे यांना सुद्धा काही महिन्यांनपूर्वी अटक करण्यात आली होती मात्र जामिनावर लगेचच त्यांची सुटका झाली. महाविकास आघडीमधील नेते आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होताना दिसून येत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.