Site icon InMarathi

२०२२ मध्ये येणाऱ्या या ७ इलेक्ट्रिक स्कूटर्स तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतील का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या जगामध्ये वाढत्या पेट्रोल च्या दरामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांना प्राथमिकता देत आहे आणि या कारणामुळे या इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

 

 

त्यामुळे या वाढत्या मागण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्या पुढील वर्षी अनेक नव-नवीन गाड्या घेऊन येणार आहे. परंतु या नवीन गाडींची किंमत जास्त असणार आहे, असे असले तरी किमतीप्रमाणे या गाड्यांमध्ये अनेक नवीन फीचर आणि टेक्नोलॉजी देखील वापरलेले असतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चला तर जाणून घेऊया २०२२ मध्ये येणाऱ्या या १० एडवांस इलेक्ट्रिक गाड्यांविषयी :-

● Ultraviolette F77 :

 

 

अल्ट्रावियोलेट एफ ७७ ही बाईक सध्या टेस्टिंग च्या शेवटच्या टप्प्यात असून, २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यात तीचे उत्पादन सुरु होईल असे अनुमान वर्तवले जात आहे. ही गाडी ‘मेक इन इंडिया’ प्रोग्राममध्ये बनली आहे.

ही गाडी फक्त २.९ सेकंदामध्ये ०-६० किमी प्रतितास चा वेग पकडू शकते. या बाईकचा टॉप स्पीड १४० किमी प्रतितास असल्याचा दावा कंपनी कडून केला जात आहे, परंतु हा वेग १५० किमी प्रतितास पर्यंत देखील जाऊ शकतो.

F77 ही बाईक रिमोट डायग्नोस्टिक्स, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, मल्टिपल राइड मोड्स, बाईक ट्रॅकिंग, राइड डायग्नोस्टिक्स आणि याप्रकारचे अनेक नवीन फीचर असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे.

● Hero MotoCorp Vida Electric Scooter :

 

 

भारतामधील सर्वात जास्त दुचाकी निर्माण करणारी कंपनी Hero Motocorp ही कंपनी २०२२ मध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येणार असून, या कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक बाईक ठरणार आहे.

या कंपनीने आधीच ‘VIDA’ हे नाव ट्रेडमार्क करून ठेवले आहे. तसेच सध्या तरी या स्कूटर विषयी अधिकची माहिती उपलब्ध नाही, परंतु २०२२ मध्ये ही स्कूटर लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे.

● Suzuki Burgman Street Electric :

 

 

सुजुकी मोटरसाइकिल इंडिया प्राइवेट लिमिटेड ही कंपनी सध्या सुजुकी बर्गमैन(Suzuki Burgman) च्या इलेक्ट्रिक वैरिएंट असलेल्या स्कूटरची चाचणी करत आहे. परंतु अजुनपर्यंत मार्केटमध्ये या स्कूटर विषयी अधिक माहिती उपलब्ध नाही आहे.

एका रिपोर्टनुसार सांगितले जात आहे की, या स्कूटरचा टॉप स्पीड ८० किमी प्रतीतास असेल. २०२२ च्या सुरूवातीच्या महिन्यांमध्ये ही स्कूटर लॉंच होईल असा एक अंदाज आहे.

● Hero Electric AE-47 :

 

 

AE-47 ही हीरो ब्रांड ची पहिली इलेक्ट्रिक वैरिएंटची गाडी असणार आहे. या गाडीमध्ये ४००० W ची इलेक्ट्रिक मोटर असणार आहे, या मोटरमुळे या गाडीचा टॉप स्पीड ८५ किमी प्रतितास पेक्षा जास्त असणार आहे. या बाईकमध्ये वजनात हलकी असलेली पोर्टेबल लिथियम-आयन 48V/3.5 kWh ची बैटरी असणार आहे आणि ती फक्त चार तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकेल.

या बाईकमध्ये दोन मोड असणार आहेत. पहिला म्हणजे पॉवर मोड, यामध्ये एका चार्जमध्ये ८५ किमीची रेंज असेल, तर इको मोडमध्ये, सिंगल चार्जवर अंदाजे रेंज 160 किमी असेल.

● Okinawa Oki90 Electric Scooter :

 

 

Okinawa ची Oki90 ही बाईक २०२२ च्या सुरुवातीला लाँच होणाऱ्या Okinawa च्या काही उत्पादनांपैकी एक असेल. Oki100 प्रमाणेच, ही बाईक ९० किमी प्रतितास च्या टॉप स्पीडने चालू शकेल आणि एका चार्जिंग नंतर या बाईकची रेंज १७५-२०० किमी असेल.

● Emflux One :

 

 

Emflux Motors या कंपनीने ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये आपली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक Emflux One चे अनावरण केले होते. ही बाईक उत्पादनासाठी तयार असून २०२२ च्या सुरूवातीला लाँच होऊ शकते. Emflux One चा टॉप स्पीड २०० किमी प्रती तास असून, ०-१०० चा वेग फक्त ३ सेकंदात करू शकते.

Emflux One ही एक पूर्ण-फेअर इलेक्ट्रिक सुपरबाइक आहे ज्यामध्ये ड्युअल-चॅनल ABS, सिंगल-साइड स्विंगआर्म, ओहलिन्स सस्पेन्शन आणि इंटेलिजेंस आर्टिफिशयल वैशिष्ट्यांसह पूर्णपणे कनेक्ट केलेला स्मार्ट डॅशबोर्ड देखील आहे.

● Komaki Venice Electric Scooter :

 

 

देशाच्या राजधानी दिल्ली मध्ये स्थित असलेली इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी कोमाकी इलेक्ट्रिक्स येत्या नवीन वर्षात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे, ज्याला कोमाकी व्हेनिस(Komaki Venice) असे म्हटले जाईल.

एकूण १० वेगवेगळ्या रंगामध्ये ही स्कूटर लाँच होणार आहे. ही स्कूटर इतर ब्रांडच्या स्कूटर तुलनेने स्वस्त असेल. या स्कूटर मध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिपेअर स्विच, तसेच मोबाईल कनेक्टिव्हिटी यांसारखे अनेक नवीन फीचर असतील.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version