' ट्रॅकवर ‘तेरे नाम’चं शूटिंग करताना ट्रेन आली जवळ, थोडक्यात वाचला सल्लूभाईचा जीव – InMarathi

ट्रॅकवर ‘तेरे नाम’चं शूटिंग करताना ट्रेन आली जवळ, थोडक्यात वाचला सल्लूभाईचा जीव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुपरस्टार सलमान खान हा बॉलिवूडमधील सर्वात लाडका अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलिवूडच्या ‘खाना’वळीपैकी एक असणाऱ्या सलमान खानचे नव्वदच्या दशकात लाखो चाहते होते.

त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी तासंतास रांगेत उभे राहून तिकिटं काढून बघणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी खास करून तरुणींसाठी सलमान खान हा क्रश होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काळवीटाची केस, गाडीखाली माणसांना चेंगरून मारण्याची केस झाली, तरीही आजही सलमानच्या चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी प्रेमच आहे. आजही सोशल मीडियावर कमेंट सेक्शनमध्ये सलमानची बाजू घेऊन तावातावाने भांडणारे अनेक लोक दिसतात.

 

Wanted Salman IM

 

पदार्पणापासूनच सलमानने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. ‘मैंने प्यार किया, ‘तेरे नाम’, ‘हम आपके हैं कौन’, ‘वॉन्टेड, ‘दबंग’ असे त्याचे अनेक सुपरहिट चित्रपट लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहेत.

यापैकी ‘तेरे नाम’ मधील त्याचा अभिनय बघून तर लोक ढसाढसा रडलेत. अर्थात त्याच्या भूमिकेसाठी त्याने तेवढी मेहनत घेतली होती ते चित्रपट बघूनच लक्षात येते.

 

tere naam salman inmarathi

 

चित्रपटात स्टंट करताना बऱ्याचदा अभिनेते आणि अभिनेत्रींना दुखापती होतात. काही वेळेला या दुखापती फारश्या गंभीर नसतात, पण काही वेळेला गंभीर दुखापत होऊन अभिनेत्यांचा जीव धोक्यात आल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत.

अमिताभ बच्चन, हृतिक रोशन आणि इतर अनेक अभिनेत्यांना त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अशीच घटना सलमान बाबतीत देखील घडली आहे.

‘तेरे नाम’ च्या सेटवर तो जखमी झाला होता. तेरे नामच्या शूटिंग दरम्यान तो सेटवर झालेल्या एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावला. त्याचे नशीब चांगले म्हणून तो बचावला नाहीतर त्या अपघातात त्याचा जीव देखील जाऊ शकला असता.

एका रिपोर्टनुसार २००३ साली तेरे नाम या चित्रपटासाठी स्टंट करताना सलमानला ट्रेनसमोरून चालावे लागले होते. हे दृश्य चित्रित करताना तो त्या दृश्यात इतका मग्न झाला होता, की मागून येणारी ट्रेन रुळांवर आपल्या जवळ आल्याचे त्याला जाणवलेही नाही. पण सुदैवाने, त्याच्या सहकलाकाराने त्याला वेळीच रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे ढकलले आणि त्याचा जीव वाचवला.

आज २७ डिसेंबर रोजी सलमानचा वाढदिवस असतो. चाहत्यांसाठी आजही तरुण असणारा सलमान चक्क ५६ वर्षांचा झाला आहे. त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो कुटुंब व मित्रांसोबत त्याच्या पनवेलच्या फार्महाउसवर गेला असताना त्याला साप चावल्याची घटना घडली आहे.

सुदैवाने तो साप बिनविषारी होता त्यामुळे सलमानच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही. साप चावल्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल केले आणि त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतर काही काळाने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

 

sad salman khan inmarathi

 

 

या घटनेवर काही सलमानने एका मुलाखतीत सांगितले, की “माझ्या फार्महाऊसमध्ये एक साप घुसला होता, मी त्याला काठीची भीती दाखवून बाहेर काढले. पण तो काठीवर चढला आणि हळूहळू माझ्या हातावर आला. मी त्याला काठीवरून सोडण्यासाठी पकडले, तेव्हा त्याने माझा तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा निमविषारी साप होता. त्यामुळे मला ६ तास रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मी आता ठीक आहे.”

दरम्यान सलमान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘टायगर ३’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 

salman inmarathi

 

चाहत्यांसाठी विशेष म्हणजे ह्या चित्रपटात शाहरुख खानच्या आगामी स्पाय थ्रिलरमधील ‘पठाण’ ह्या व्यक्तिरेखेचा एक खास कॅमिओ देखील असेल, असे वृत्त आहे.

याशिवाय सलमान जॅकलिन फर्नांडिससोबत ‘किक 2 ‘ आणि पूजा हेगडेसोबत ‘कभी ईद कभी दिवाळी’ हे चित्रपट करणार आहे. त्याने ‘बजरंगी भाईजान’च्या बहुप्रतिक्षित सिक्वेलची घोषणाही केली आहे.

अनेक वादग्रस्त प्रकरणांत गोवल्या गेल्यानंतरही सलमान खानची जादू आजही त्याच्या चाहत्यांच्या मनावर कायम आहे. त्यामुळे या चित्रपटांची ते वाट बघत आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?