Site icon InMarathi

सनीच्या गाण्यावरून उठलंय वादळ, याच गाण्यासाठी दिलीप कुमारांनी घेतलेली ६ महिने मेहनत

sunny final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनुराग कश्यप नावाच्या अवलिया दिग्दर्शकाने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, ‘भारतीय सिनेमा जगभरातील इतर सिनेमापेक्षा वेगळा आहे कारण भारतीय सिनेमाची वेगळी ओळख म्हणजे त्यातील संगीत’. मूकपटांपासून सुरवात झालेल्या सिनेमाला कालांतराने अनेक बोलपट झाला.

शंकर जयकिशन,नौशाद, एस. डी. बर्मन ते आताच्या संगीतकरांपर्यंत, दशक जशी बदलत गेली तशी संगीताची गोडी बदलत गेली. सुरवातीला शास्त्रीय संगीतावर बेतलेली गाणी हळूहळू उडत्या चालीची होऊ लागली. ७० ८० काळात पाश्चात्य संगीताचा प्रभाव आपल्या सिनेमावर पडला होता. आजचा जमाना हा रिमिक्सचा आहे, सिनेमा सुपरहिट करायचा तर एखाद्या जुन्या गाण्याची मोडतोड करून त्यात आजच्या पिढीला आवडेल असे बिट्स टाकून ते गाणं बनवायचं.

 

mrandmrs55.com

 

अक्षय कुमार आणि रविना टंडनच एकेकाळचा सुपरहॉट गाणं टीप टीप बरसा पानी हे गाणं आज पुन्हा एकदा नव्या रूपात बघायला मिळालं, असच एक गाणं आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे ते म्हणजे मधुबन मै राधिका नाचे..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सनी लियॉन या अभिनेत्रीने या गाण्यातून आपल्या मादक अदा दाखवल्या आहेत. तीच गाणं प्रदर्शित होतातच अनके हिंदू संस्थांनी यावर आक्षेप घेतला असून हे गाणं मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करू अशी थेट धमकीच दिली आहे. ज्या कंपनीने हे गाणे प्रदर्शित केले आहे त्या कंपनीनें ते आता मागे घेतले असून त्याजागी नवीन गाणे आणणार असे स्पष्ट केले आहे.

 

 

जितकी मेहनत या हे रिमिक्स गाणे बनवण्यासाठी नसेल घेतली तितकी मेहनत मूळ गाण्यावर चक्क दिलीप कुमारांनी घेतली होती, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना? नेमकं दिलीप कुमारांनी काय केले होते जाणून घेऊयात…

दिलीप कुमारांनी नेमकं काय केलं?

नुकतंच काही महिन्यांपूर्वी बॉलीवूडच्या या ट्रॅजेडी किंगचे निधन झाले. मूळचा पेशावर पाकिस्तानचा असलेला हा गुणी कलाकार इथेच रुळला. ५०च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला. देखणं रूप, सशक्त अभिनय यामुळे दिलीप कुमार चांगलेच लोकप्रिय झाले. खुद्द ऑस्कर विजेते दिग्दर्शक सत्यजित रे म्हणाले होते की दिलीप कुमार हे खरे मेथड ऍक्टर आहेत.

अशा या मेथड ऍक्टरने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, ‘प्लेबॅक सिंगिंग हे काही अवघड नसते, मधुमतीमधील गाणी सोपी होती, देवदासमधील काही गाण्यांसाठी मेहनत घ्यावी लागली होती. कारण ही गाणी चित्रित करण्यासाठी अवघड होती.’

 

 

मुलाखतीमध्ये ते पुढे असे म्हणाले की, ‘नौशाद अली यांनी संगीत दिलेल्या कोहिनुर सिनेमामध्ये एक गाणे होते मधुबन मै राधिका नाचे रे, जे शकील यांनी लिहले होते. या गाण्यात एक सतारीचा भाग होता जो खूप अवघड होता. तसेच या गाण्यात एक तराना होती ओ दे ना धीर धा, नी ता या गाण्यासाठी खूप सराव करावा लागला होता’.

दिग्दर्शक एसयू सनी याना हे गाणे लवकर चित्रीत करायचे होते मात्र मी त्यांना विनंती केली की मला सरावासाठी काही महिने लागतील. मी सतारीचा अनेक महिने अभ्यास केला. सतार हे वाद्य शिकण्यासाठी अवघड असे वाद्य आहे. यासाठी मेहनत आणि जिद्द हवी. माझ्या कारकिर्दीतले मधुबन हे सर्वोत्कृष्ट असे गाणे ठरले आहे.

 

दिलीपजींचे हे वक्तव्य अक्षरशः खर ठरलआहे, तब्बल ६ महिने त्यांनी सतार वादनाची प्रॅक्टिस केली आणि ते गाणे अजरामर करून दाखवले. आजकालच्या कलाकारांसारखे केवळ शरीरावर मेहनत न घेता आपल्याला जी गोष्ट येत नाही त्याचा सराव करून ती गोष्ट उत्तमरित्या करून दाखवायची याच संकल्पनेला आपण कदाचित मेथड ऍक्टिंग म्हणू शकतो.

 

 

मूळ गाणं हे कृष्ण आणि राधेवर बेतलेले असून भारतीय संगीतावर आधारलेले आहे. त्यामुळे अशा गाण्याचे रिमिक्स केल्यास साहजिकच लोकांच्या भावना दुखणार, आजही अनेकांच्या तोंडी हे गाणे असतेच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version