जिम ट्रेनर ते बिग बॉस मराठी ३ चा विजेता, विशाल निकमबद्दलच्या खास ७ गोष्टी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
मराठी बिग बॉसच तिसरं पर्व चांगलंच गाजलं. नेहमीच बिग बॉसच्या घरात भांडणं, वाद, प्रेम, मैत्री या गोष्टी बघायला मिळतात, यंदाही या गोष्टी बघायला मिळाल्या. चुरशीची स्पर्धा रंगली..यंदाची ट्रॉफी कोण पटकावणार ही उत्सुकता सगळ्यांना होती कालच बिग बॉसची फायनल पार पडली आणि यामध्ये अभिनेता विशाल निकमने ही ट्रॉफी पटकावली.
कालपासून सोशल मीडियावर सगळीकडे विशालचं खूप कौतुक होताना दिसतंय, आम्ही तुम्हाला विशालबद्दलच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत.
१. विशाल हा अभिनेता, मॉडेल आणि एक जिम इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे. त्याला जिमचं, फिटनेसचं भयंकर वेड आहे. अभिनयापूर्वी जिम इन्स्ट्रक्टर म्हणून त्याने काम केलंय.
२. विशालचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ साली सांगली जिल्ह्यातील देवखिंडी या गावात झाला. शालेय शिक्षण सांगलीत झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुण्यात आला. पुण्यातून त्याने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
—
- ‘बिग बॉस’च्या भरभक्कम आणि बाणेदार आवाजामागचा खरा चेहेरा कोणाचा आहे?
- रजनीकांत ते अक्षय कुमार : बॉलीवूड स्टार्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का?
—
३. एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात विशालचा जन्म झाला आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. विशालला आर्मीत भरती होण्याची खूप इच्छा होती. कॉलेजमध्ये असताना त्याने एन सी सीतर्फे अनेक कॅम्प्स केले आहेत. कॉलेजमधील नाटकांमधून त्याला अभिनयाची आवड लागली.
४. २०१८ मध्ये विशालने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. ‘मिथुन’ या चित्रपटापासून त्याची अभिनय कारकीर्द सुरु झाली. त्याने या चित्रपटात अमृता धोंगडेसोबत काम केलं.
५. अगदी पुढच्याच वर्षी, म्हणजे २०१९ मध्ये त्याने ‘धुमस’ या चित्रपटात काम केलं.
६. फक्त चित्रपटच नाही, तर मराठी मालिकांमधून विशालने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. २०१९ मध्ये स्टार प्रवाहवरील ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत त्याने युवराजची भूमिका निभावली.
७. ‘दक्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही त्याने काम केलं आहे. या मालिकेसाठी त्याने २० दिवसात १२ किलो वजन वाढवलं होतं. ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत त्याने शिवा काशीदची भूमिका निभावली.
बिग बॉसबद्दल विशालला विचारलं असता तो म्हणाला, की ‘पहिल्याच दिवशी माउलींचा आशीर्वाद घेऊन मी इथे आलो होतो. मनात कुठेतरी जिंकायचंय हे स्वप्न घेऊन आलो होतो, जे आज पूर्ण झालंय. हा प्रवास खूपच भारी होता. गावाकडून बिग बॉसमध्ये आलेला विशाल आणि इथून बाहेर पडलेला विशाल यात खूप फरक आहे. माझ्यातला आत्मविश्वास वाढलाय. हे १०० दिवस मंतरलेले होते, ते विसरणं अशक्य आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम कायम असावं हीच इच्छा आहे.’
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.