' सरकारच्या ‘या’ सुविधेनंतर आता कुठल्याही राज्यात चालवता येईल आपलं वाहन – InMarathi

सरकारच्या ‘या’ सुविधेनंतर आता कुठल्याही राज्यात चालवता येईल आपलं वाहन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या रोजच्या जगण्यात ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला नितांत आवश्यक्ता असते त्यातली एक मुख्य गोष्ट म्हणजे आपलं वाहन. पै पै जोडून आणलेल्या आपल्या स्वतःच्या वाहनाचा आपण अभिमान बाळगतो. आपलं वाहन मिरवतो. सणावाराला, पूजा असेल तेव्हा जशी इतर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची आपण पूजा करतो तशी आपल्या वाहनाचीही करतो. आपलं वाहन आपला रोजचा प्रवास सुसह्य करतं.

सार्वजनिक वाहनांच्या प्रवासात असणाऱ्या गर्दीपासून आणि खाव्या लागणाऱ्या धक्यांपासून आपली सुटका करतं. अधूनमधून लॉन्ग ड्राइव्हवर गेलं की ती संध्याकाळ सुंदर होते. पण कामाच्या निमित्ताने जेव्हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आपली बदली होते किंवा अन्य कुठल्या कारणासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आपल्याला आपलं वाहन घेऊन जावं लागतं तेव्हा त्या राज्यात आपल्याला आपल्या वाहनाचं पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागतं.

 

Corona Travel InMarathi

 

आपल्या राज्यात केलेलं वाहनाचं रजिस्ट्रेशन तिथे उपयोगी पडत नाही. दरवेळी दुसऱ्या राज्यात गेल्यावर हे वाहनाचं रजिस्ट्रेशन करायला सतराशे साठ उपद्व्याप करावे लागतात. केंद्र सरकारने मात्र आता यावर एक उत्तम तोडगा काढला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘भारत सिरीज’ म्हणजेच ‘बीएच सिरीज’ द्वारे आता आपल्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात गेल्यावर दरवेळी पुन्हा आपल्याला वाहनांचे रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही.

 

polluting-vehicle-inmarathi

 

‘रस्ते वाहतूक मंत्रालया’ने या ‘बीएच सिरीज’चा परिचय करून दिला आणि केंद्र सरकारद्वारे ती सूचित करण्यात आली. ‘बीएच सिरीज’ चा रजिस्ट्रेशन मार्क जर तुमच्या नव्या वाहनावर असेल तर यापुढे तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, केंद्रशासित प्रदेशात गेल्यावर वाहनाचे पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही.

‘बीएच सिरीज’ च्या रजिस्ट्रेशन मार्कद्वारे आता तुम्ही तुमचं वाहन घेऊन भारतभर कुठेही कुणाच्याही अडवणूकीशिवाय संचार करू शकता अशी ‘रस्ता आणि महामार्ग मंत्री’ नितीन गडकरी यांनी राज्यसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर लिखित स्वरूपात माहिती दिली. नव्या वाहनांसाठी आता भारत सिरीजचा नवा रजिस्ट्रेशन मार्क उपलब्ध करून दिला जाईल असं ते म्हणाले.

 

bh inmarathi

 

काही वर्षांपासून आतापर्यंत लागू केलेल्या नियमांनुसार आपण आपलं वाहन काही कालावधीपुरतंच ज्या राज्यात आपण वाहनाचं रजिस्ट्रेशन केलंय त्या राज्यापेक्षा वेगळ्या राज्यात ठेवू शकायचो. पण आताच्या नव्या नियमांनुसार ज्या राज्यात आपल्या वाहनाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यापेक्षा वेगळ्या राज्यात आपण आपलं वाहन रजिस्ट्रेशनशिवाय अगदी १२ महिनेही ठेवू शकतो. १२ महिने संपायच्या आत मात्र वाहनाच्या मालकाला पुन्हा त्या राज्यात आपल्या वाहनाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल.

‘बीएच सिरीज’ ची ही सुविधा आपल्यासाठी ऐच्छिक स्वरूपात उपलब्ध आहे. संरक्षक कर्मचारी, केंद्र सरकार, राज्य सरकारचा नोकरदार वर्ग, केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रांमधल्या उपक्रमांअंतर्गत काम करणारा नोकरदार वर्ग, ज्यांची कार्यालयं चार किंवा चारपेक्षा अधिक राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये असतील अशा खाजगी कंपन्या आणि संस्थांचे कर्मचारी या सुविधेचा लाभ उठवू शकतात.

 

White Cars IM

 

आतापर्यंत ज्या राज्यात आपल्या वाहनाचं रजिस्ट्रेशन आहे त्यापेक्षा दुसऱ्या राज्यात वाहनाचं रजिस्ट्रेशन करायचं असायचं तेव्हा वाहनमालकाला ते करण्यासाठी वाहनाचं रजिस्ट्रेशन असलेल्या राज्यातून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ घ्यावं लागायचं.

त्यानंतरच दुसऱ्या राज्यात वाहनासाठी नवा रजिस्ट्रेशन मार्क घेणं शक्य व्हायचं. आता पर्यंत १५ राज्यांमध्ये BH अंतर्गत वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे.

नव्या राज्यात ‘प्रो राटा बेसिस’वर रोड टॅक्स भरल्यानंतरच नवा रजिस्ट्रेशन मार्क मिळायचा. ज्या राज्यात वाहनाचं आधी रजिस्ट्रेशन झालं होतं तिथे जी रक्कम आधी भरलेली होती ती वाहनमालकाला क्लेम करावी लागायची. पण आता ‘बीएच सिरीज’ उपलब्द्ध झाल्यामुळे वाहनमालकांची या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेपासून सुटका होणार आहे.

जेव्हा वाहनमालक ही ‘बीएच सिरीज’ घेतील तेव्हा त्यांना २ वर्षांचा रोड टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर दर २ वर्षांनी असाच रोड टॅक्स भरत राहायचा आहे. रजिस्ट्रेशनच्या तारखेच्या १४ वर्षांनंतर हा टॅक्स दरवर्षी भरावा लागेल. पण पूर्वीपेक्षा त्यानंतर कराच्या दरात घट होईल. आधी भराव्या लागणाऱ्या रकमेच्या अर्धीच रक्कम घेतली जाईल.

 

toll plaza featuured inmarathi

सरकारच्या अधिसूचनेनुसार रजिस्ट्रेशनच्या वेळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मोटार वाहनांचा कर आकारला जाईल. जर तुमचे मोटार वाहन १० लाखाच्या जवळपासच्या किंमतीचे असेल तर ८ टक्के कर आकारला जाईल.

१० ते २० लाखांपर्यंत किंमत असलेल्या मोटार वाहनांचा १० टक्के कर आकारला जाईल, २० लाख किंवा त्याहूनही अधिक किंमत असलेल्या वाहनांचा १२ टक्के इतका कर आकारला जाईल. डिझेलच्या वाहनांसाठी २ टक्के अतिरिक्त रक्कम आकारली जाईल तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी २ टक्के कमी रक्कम आकारली जाईल.

‘बीएच सिरीज’ च्या रजिस्ट्रेशन मार्कचे स्वरूप ‘YY BH #### XX’ असे आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार यातला ‘YY’ म्हणजे पहिल्यांदा जेव्हा रजिस्ट्रेशन केलं ते वर्ष. ‘BH’ हा भारत सिरीज चा कोड. ‘####’ हा एक ४ आकडी क्रमांक आणि ‘XX’ ही दोन अक्षरं. ज्या वाहनावर हा रजिस्ट्रेशन मार्क असेल ते वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात घेऊन गेल्यानंतर पुन्हा त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही.

जर आपल्याला या ‘बीएच सिरीज’ चा लाभ घ्यायचा असेल तर आपण या वरच्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन कार्यालयाने सुरू केलेल्या आयडीद्वारे या ‘बीएच सिरीज’च्या नव्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करू शकतो. ‘रस्ता आणि राज्यमार्ग’ मंत्रालयाच्या ‘वाहन पोर्टल’वर जाऊनही आपण अर्ज करू शकतो. याखेरीज ‘डीलर’द्वारेही आपण यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी डीलर ला आपल्या वतीने ‘फॉर्म २० ‘ भरावा लागेल.

 

old pune highway inmarathi

 

खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांकरता ‘फॉर्म ६० ‘ भरणे गरजेचे आहे. यासोबत नोकरीसंदर्भातली कागदपत्रं आपल्याला द्यावी लागतील. वाहनासंबंधीची कागदपत्रं इलेक्ट्रॉनिक मार्गाने पाठवल्यावर ती योग्य ग्राह्य धरली गेली तर तपासणीसाठी ती त्यांच्या मूळ स्वरूपात मागितली जाणार नाहीत.

आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना या ‘बीएच सिरीज’ मुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.

फक्त वर दिलेल्या गोष्टी व्यवस्थित करणे, वेळेत रोड टॅक्स भरणे हे इतके मात्र आपण न विसरता केले पाहिजे. आधी कराव्या लागणाऱ्या क्लिष्ट प्रक्रियेपुढे हे इतके करणे म्हणजे फार काही नाही. आपलाच त्रास या नव्या रजिस्ट्रेशन मार्कच्या सुविधेमुळे आधीपेक्षा कमी होणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

     

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?