' अजब ट्रेनची गजब गोष्ट : इथे प्रवाशांना चक्क धक्के मारून ट्रेनमध्ये भरलं जातं! – InMarathi

अजब ट्रेनची गजब गोष्ट : इथे प्रवाशांना चक्क धक्के मारून ट्रेनमध्ये भरलं जातं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

असं म्हणतात की गर्दी काय असते, हे मुंबईला आल्याशिवाय आणि मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून, प्रवास केल्याशिवाय कळत नाही.

काही प्रमाणात ते खरं देखील आहेच. कारण मुंबईच्या लोकलमधली गर्दी; म्हणजे श्वास कोंडून टाकणारी, अंगाची चांगलीच धुलाई करणारी, आणि कधीकधी तर मनात धडकी भरवणारी असते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असो, दादर असो, किंवा ठाणे, डोंबिवली; एका बाजूला पार कर्जतपर्यंत, तर दुसरीकडे अगदी कसाऱ्यापर्यंत, ही गर्दी पाहायला मिळते.

गर्दीने खचाखच भरलेली लोकल, हीदेखील या लाईफलाईनची एक ओळख आहे. मुंबईला पहिल्यांदा येणारे अनेकजण, केवळ ही गर्दी पाहूनच पुरते गांगरून जातात.

मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्याची, गर्दीशी जमवून घेण्याची कला, आत्मसात करावी लागते. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की मुंबई लोकमधील ही गर्दी, जगातील आणखी एका देशातील ट्रेनच्या गर्दीसमोर काहीही नाही!

कारण, या देशात लोकांना चक्क आत ढकलून ट्रेनमध्ये भरलं जातं. हा देश आहे जपान, आणि ही भयंकर गर्दी दिसते, ती या देशाची राजधानी असणाऱ्या टोकियो शहरातील रेल्वेमध्ये! चला तर जाणून घेऊया या अजब देशातील गजब रेल्वेची अनोखी गोष्ट!

 

tokyo-train-marathipizza01
farfesh.com

 

जपान रेल्वे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाबाबत जगात सगळ्यात उत्कृष्ट आहे. पण, येथील लोकसंख्या एवढी जास्त आहे, की त्या गर्दीचा परिणाम रेल्वे यंत्रणेवर हमखासपणे होतो.

जपानची राजधानी टोकियोमध्ये, रोज चार कोटींहून अधिक लोक ट्रेनने प्रवास करतात. यातील सुमारे ८० लाख लोक सबवे ट्रेनचा वापर करतात. या आकडेवारीवरून तुम्ही टोकियो सबवेमधील गर्दीचा अंदाज बांधू शकता.

 

tokyo-train-marathipizza02
pinterest.com

 

टोकियोतील सबवे ट्रेनला असलेली ही गर्दी पाहता, तेथे ट्रेनमध्ये लोकांना चढवायला पुशर्स ठेवले गेले आहेत.

लोकांना रेल्वेत चढवणा-या कर्मचाऱ्यांना, ‘सब वे पुशर्स’ म्हणतात. हे पुशर्स रेल्वेच्या दारावर उभे असतात व लोकांना रेल्वेत ढकलतात.

 

tokyo-train-marathipizza03
mkshft.org

 

टोकियो सबवेमध्ये, प्रत्येक दिशेला, एका तासात २४ ट्रेन धावत असतात. पण, एवढ्या गाड्या असूनही, तेथील प्रत्येक फेरीत, कायमच तोबा गर्दी असते. या प्रचंड गर्दीमुळे, प्रवासादरम्यान लोकांची वाईट अवस्था होते. तुफान गर्दीचा सामना करत, प्रवास करणे, हे येथील प्रवाशांच्या अंगवळणी पडू लागले आहे.

 

tokyo-train-marathipizza04
pinterest.com

 

टोकियो सबवेवर प्रत्येक ५ मिनिटाला एक ट्रेन येते. तर सर्वाधिक गर्दी असण्याच्या वेळामध्ये, दर २ ते ३ मिनिटांनी एक गाडी धावते.

असे असूनही, प्रत्येक ट्रेन अगदी खचाखच भरलेली असते. काही ट्रेनमध्ये तर, क्षमतेपेक्षा दुप्पट संख्येने, प्रवासी असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं.

ही गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात असते, की ती सावरणे जवळपास अशक्य व्हावे. या अमाप गर्दीवर ताबा मिळवण्यासाठी, जपान रेल्वे व्यवस्थापनाला अधिकृत माणसांची नेमणूक करावी लागली आहे.

ही मंडळी, गणवेश घालून प्लॅटफॉर्मवर उभी असतात. ट्रेन आल्यावर, लोकांना ट्रेनमध्ये ढकलण्याचं काम, या कर्मचाऱ्यांना नेमून दिलेलं आहे. थोडक्यात, ‘अरे चलो भाई, पुरा ट्रेन खाली हैं’ असं म्हणत मुंबईकर जसा गाडीत चढतो, तेच काम करण्यासाठी, इथे पगारी माणसं नेमण्यात आली आहेत.

 

tokyo-train-marathipizza05
magazine.nationalgeographic.nl

 

आता तुम्ही म्हणाल, की लोकांना आता ढकलण्याची काय गरज आहे… तर, त्याचे कारण म्हणजे, ट्रेनचा दरवाजा योग्य पद्धतीने बंद होणे. स्वयंचलित दरवाजे, बंद होण्यासाठी, दरवाजात काहीही असू नये, हे आवश्यक असतं.

पुशर्स, लोकांना आत ढकलतात आणि दरवाजा योग्यरीतीने बंद होईल याची काळजी घेतात.

रेल्वे गाडी वेळेत व सुरळीत चालावी, यासाठी ही खबरदारी घेण्यात येते. टोकियोमधील या रेल्वे गाडीच्या आत एवढी गर्दी असते, की प्रवाशांना श्वास घेणेही कठीण जाते. या गर्दीमध्ये, महिलांशी गैरवर्तन होण्याच्या अनेक घटना सुद्धा घडतात.

महिला याबाबत जागरूक व्हाव्यात यासाठी, टोकियो रेल्वे ऑपरेटर कॉर्पोरेशनने, व्हिडिओ आणि पोस्टर्स सुद्धा जारी केलेले आहे.

महिलांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन याद्वारे करण्यात येते. अर्थात, या तुडुंब गर्दीचा विचार करता, सुखरूप आणि कमी त्रासाच्या प्रवासकरिता, प्रत्येकानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे.

 

tokyo-train-marathipizza06
amusingplanet.com

 

ही गर्दी आणि प्रवाशांची अवस्था बघून, असचं म्हणावं लागेल की, गड्या आपला गाव बरा!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?