…तर इंडस्ट्रीतला सर्वात मोठा व्हिलन म्हणून अनुपम खेर नावारूपाला आले असते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अनुपम खेरच्या कारकीर्दीची सुरवातच चरित्र भूमिकेतून झाली. एनएसडीचा विद्यार्थी असणारा अनुपम हिंदी चित्रपटात काम करायला आला आणि त्याच्यातल्या अभिनय गुणांचा कस लागेल अशी भूमिका सारांशच्या रुपाने त्याला मिळाली.
पहिलाच चित्रपट महेश भट्ट सारख्या दिग्दर्शकाचा म्हणून त्यानं मागचा पुढचा विचार न करता ही भूमिका स्विकारली तर खरी मात्र अनेकांनी त्याला हा निर्णय आत्मघातकी असल्याचं सांगितलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जसजसा चित्रपट पूर्ण होऊ लागला तसं अनुपमलाही टेन्शन आलं. आपली कारकीर्द हंगल यांच्यासारखीच चरित्र भूमिकांतच जाणार अशी धाकधूक वाटू लागली.
मात्र नंतर त्यानं ही प्रतिमा मोडणार्या अनेक भूमिका साकारत त्याच्यातल्या हरहुन्नरी कलाकाराला सातत्यानं प्रेक्षकांच्या समोर ठेवलं. अनुपम ज्या सहजपणे विनोदी छ्टा असणार्या भूमिका साकारतो त्याच सहजपणानं खुनशी खलनायकही रंगवतो. त्याच्या फॅन्सना तो प्रत्येर्क भूमिकेत तितकाच अवाडतोही.
हिंदी चित्रपटात आजवर जे अजरामर खलनायक होऊन गेले त्यातलं एक नाव म्हणजे, मोगॅम्बो. ऐंशीच्या दशकात आलेला मिस्टर इंडिया हा बहुचर्चित चित्रपट होता. बोनी कपूरचा महत्वाकांक्षी चित्रपट म्हणून याची चर्चा तर होतीच शिवाय सायफ़ाय जॉनरमधला हा ग्लॅमरस चित्रपट असणार होता.
यातला मोगॅम्बो हा खलनायक लार्जर दॅन लाईफ़ असा असणार होता. नायकाहूनही त्याचं खलनायकीपण मोठं असणार होतं.
या भूमिकेसाठी अनुपमची निवड केली गेली. एका बहुचर्चित चित्रपटात महत्वाकांक्षी भूमिका साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी अभिमानाचीच गोष्ट असते. चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं.
–
- ‘विमा एजंट’ ते ‘मोगॅम्बो’ – वाचा बॉलिवूडच्या आयकॉनिक ‘व्हिलन’ चा रंजक प्रवास!
- अभिनय नव्हे, पॅरालिसिसचा झटका! ‘डेडिकेशन’ कशाला म्हणतात ते दाखवणारा प्रसंग!
–
तब्बल २ महिन्यांच्या चित्रीकरणानंतर बोनी कपूर आणि शेखर कपूर यांना वाटलं की मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी आणखीन भारदस्त आवाजाची आणि थरार वाटेल अशा व्यक्तिमत्वाची गरज आहे.
त्यांना अपेक्षित असा मोगॅम्बो अनुपमच्या भूमिकेतून दिसत नव्हता. अखेर दोन महिन्यांचं चित्रीकरण रद्द करून त्यांनी या भूमिकेसाठी अमरिश पूरी यांना घेतलं. त्यानंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.
कोणत्याही कलाकारासाठी एखादी अशी महत्वाची भूमिका हातातून निसटणं वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे.
मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनुपम यांनीही मान्य केलं की ही भूमिका हातून निसटल्याचं दु:ख जरी असलं तरिही पडद्यावर अमरिशजींचा मोगेम्बो बघताना ही भूमिका त्यांच्यासाठीच बनली असल्याची खात्री पटते.
एका कलाकाराने दुसर्या कलाकाराला निर्मळ मनानं दिलेली ही दाद होती. आज इतकी वर्षं अनुपम इंडस्ट्रीत आहेत याला कारण त्यांचा अभिनय हे तर आहेच पण त्यांचं मनसुद्धा निर्मळ आहे!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.